नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
उत्तर प्रदेश
ही गोंडस, निरागस मुले ! काळाच्या एका कठोर प्रहाराने त्यांचे सगेसोयरे हिरावून गेले। वनवासी क्षेत्रातील ही मुले, कानपूर येथील वात्सल्य मंदिरात त्यांना मातापित्यांचे प्रेम आणि आसरा मिळाला नसता, तर कदाचित आयुष्यभर दारिद्र आणि उपेक्षेच्या गर्तेत पिचत राहिली असती। आज त्यांच्या डोळ्यांमध्ये उज्वल भविष्याची सोनेरी स्वप्ने, आणि ती साकार होतील असा विश्वास तरळत आहे। आय.आय.टी.च्या प्रवेश परीक्षेत संपूर्ण देशात 320 वा क्रमांक मिळवलेला आणि सध्या एम.एन.आय.टी येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेला ब्रजेश थारु असो, कि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी (एन.डी.ए) प्रवेश परीक्षेची ची तयारी करणारा पवन पाल असो, हे दोघेही केवळ चार वर्षांचे असताना वात्सल्य विद्या मंदिरात दाखल झाले।
रा.स्व. संघाचे एक तरुण व्यवसायिक, दिवंगत स्वयंसेवक, जतींद्रनाथ सिंह यांनी अनाथ मुलांसाठी आपले घर देण्याचा संकल्प केला ,आणि त्यातूनच 2004 साली वात्सल्य विद्या मंदिराची सुरुवात झाली. येथे येणाऱ्या मुलांना कधीही ही कौटुंबिक प्रेमाचा अभाव जाणनू नये अशी यतींद्रनाथ यांची भावना होती। वात्सल्य मंदिरातील मुलींचे विवाह संस्थेतर्फे व्हावेत, आणि त्या मुलींना आयुष्यभरासाठी विद्या मंदिराकडून माहेरचे प्रेम मिळावे असे त्यांचे स्वप्न होते। त्यांचे हे उदात्त स्वप्न संस्थेने साकार केले आहे।
कानपूर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय सनातन इंटर कॉलेजच्या परिसरात वसलेल्या या संस्थेत शिक्षणा बरोबरच, मुलांच्या सर्वांगीण विकासाकरता संगणक शास्त्र, संगीत अशा विविध कला- कौशल्यांचेही प्रशिक्षण देण्यात येते। याचा सर्व खर्च यतींद्र नाथांचे पिता, पुर्व उत्तर प्रदेशाचे क्षेत्रीय संघचालक श्री वीरेन्द्र प्रताप आदित्य, हे करत आहेत। हा खर्च दरमहा ५० हजार ते ७५ हजार रुपये पर्यंत येतो, अशी माहिती
पूर्व उत्तर प्रदेशचे क्षेत्रीय सेवा प्रमुख श्री नवल किशोर जी की यांनी दिली आहे । यतींद्रनाथ यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांची पत्नी नीतू सिंह यांनी आता या केंद्राची जबाबदारी स्वीकारली आहे।वात्सल्य मंदिरात येणारी बहुतेक सर्व मुले बलरामपुर,लखीमपुर,बहराईच माणिकपूर अशा वनवासी भागातील आहेत। गोंड, कोल, थार अशा आता झपाट्याने नामशेष होत चाललेल्या जनजाति मधील ही बालके आहेत। त्यांना वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी वात्सल्य विद्या मंदिराच्या ओटीत घातले आहे। मंदिरामध्ये दाखल झालेल्या अगदी पहिल्या तुकडीतील सोनम ही मुलगी आता पदवीधर होऊन दीनदयाळ विद्यालयाच्या कार्यालयात नोकरी करत आहे। आपल्या आई-वडिलांना वन्य श्वापदांनी कधी मारून टाकले, आणि त्यानंतर आपल्या दोन लहान भावंडांना घेऊन आपण वात्सल्य विद्या मंदिरात कधी राहायला आलो, हेही तिला आठवत नाही!
रा.स्व. संघाचे एके काळचे प्रचारक श्री सुरेश अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी मीना यांनी प्रारंभी या दुर्देवी, अनाथ बालकांना आई-वडिलांचे प्रेम आणि मायेची उब दिली। त्याच बरोबर शिस्त आणि आणि कठोर प्रयत्नवादाचे संस्कारही त्यांच्यावर केले । केंद्रात रोजच्या दिनचर्येत अभ्यास, योग शिक्षण, संगीत, स्वावलंबन, स्वच्छता टापटीप त्याच बरोबर खेळ-व्यायाम यांच्याही ही समावेश असतो। त्यामुळेच जय, पवन आणि आणि साध्य यांनी 2000 मीटर धावण्याच्या शर्यती बरोरोबरच संगीताच्या स्पर्धेतही ही सुवर्णपदक जिंकून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे।
सम्पर्क:- नीतू सिंह
मोबाइल:- 8009336677
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।