नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
लद्दाख | जम्मू-काश्मीर
देवभूमी नावाने ओळखल्या जाणाऱ्या लेह लडाखमध्ये गाढ झोपेत असलेल्या लोकांवर मध्यरात्री पाऊस एखाद्या वादळा प्रमाणे कोसळला. 5 ऑगस्ट 2010 ला अचानक ढग फुटी झाल्याप्रमाणे आकाशातून, रो रो आवाज करत वेगाने जाणाऱ्या अजगरा प्रमाणे, कोसळणारा जलप्रवाह रस्ता, शेतातील उभे तयार धान्य यांचा नाश करत आपल्या बरोबर मोठे मोठे दगड वाहून नेत होता. प्रत्यक्ष पाहात असणाऱ्या लोकांना तर असे वाटत होती की पूर्ण डोंगरच्या डोंगर पाण्याबरोबर खाली येत आहे. आपापल्या घरात झोपेत असलेली कुटुंब घरासकट किती तरी अंतर वाहून गेली. त्यावेळचे संकट निवारण अधिकारी जिगमित तपका सांगतात की सहाशे कोटींचे नुकसान काही तासातच झाले होते. संकटग्रस्त लोकांचे नशीब थोर म्हणून जवळच चोगळमसर मध्ये चालू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्राथमिक शिक्षा वर्गात ही बातमी पोचली. जम्मू-काश्मीर सेवा भारती चे क्षेत्र संघटन मंत्री जयदेव सिंह म्हणतात बातमी मिळाल्या क्षणीच शिक्षा वर्ग रद्द करून स्वयंसेवक संकट ग्रस्तांच्या मदतीसाठी लडाखला निघाले. आपल्या जीवाची पर्वा न करता स्वयंसेवकांनी 27 जणांचे प्राण तर वाचवलेच पण त्याचबरोबर संकटग्रस्त कुटुंबांसाठी अन्न-पाणी, औषधे, मच्छरदाणी, अंथरूण-पांघरूण याची लगेच व्यवस्था केली. इतकेच नाही तर सेवा भारती ने लडाख कल्याण संघाच्या बरोबर संकटात सर्वस्व गमावलेल्या लोकांना स्वावलंबी करण्यासाठी रोजगार प्रशिक्षण द्यायला पण सुरुवात केली.
सर्व बाजूंनी डोंगर रांगांनी वेढलेले लडाखचे नैसर्गिक सौंदर्य प्रेक्षणीय आहेच परंतु सदासर्वकाळ बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेल्या या ठिकाणी कायम कडाक्याची थंडी असते. त्यामुळे इथे स्वावलंबन आणि लोकांचे पुनर्वसन करणे फार कठीण जाते. म्हणून मग या वेळी लहान रोजगार निर्मिती करता साहित्य उपलब्ध करून पुनर्वसनाची सुरुवात केली गेली जसे की न्हाव्यासाठी गिर्हाईकाला बसण्याची खुर्ची, शिंप्याला कपडे शिवण्याचे मशीन, खानावळ असणाऱ्यांना स्वयंपाकाची भांडी, लोहार व सुतार वगैरे काम करणाऱ्यांना आवश्यक ती हत्यारे पुरविली गेली.
लडाखमध्ये झऱ्याच्या पाण्यावर चालणाऱ्या यंत्राद्वारे गृहिणी पिठाच्या गिरण्या चालवतात .पुरामध्ये 250 अशी यंत्रे वाहून गेली होती, सेवा भारतीने नव्वद यंत्रे देवून गृहिणींना संकटातून बाहेर पडण्यासाठी मनोबल पुरवले . एकट्या चोगळमसर मध्ये 240 घरे वाहून गेली होती. अनेक स्वयंसेवी संघटना अशा होत्या की ज्यांनी मदत कार्य संपल्यानंतर तिथून काढता पाय घेतला होता. परंतु सेवा भारतीने या बेघर लोकांना घर द्यायचे निश्चित केले इतकेच नाही तर चोगमलसर मध्ये निर्वासित लोकांसाठी सरकार मार्फत हिल कौन्सिलिंग द्वारे तयार होणाऱ्या सोलर वसाहतीत सेवाभावी दवाखाना आणि मदत कार्यालय सुरू केले. एक प्रमुख अधिकारी तेनसिंग दोर्जा म्हणाले की सेवा भारतीने संकट ग्रस्तांसाठी शंभर घर तयार करून पुनर्वसनात सहभाग घेतलाच पण त्याचबरोबर सरकारी शाळांमध्ये पुस्तके, युनिफॉर्म आणि पिण्याच्या पाण्यासाठी हौद पण दिला.
सर्वनाशा
तून विकासाच्या या प्रवासात स्वयंसेवकांनी शेतात जमलेला चिखल जेसीबीने हटवण्या
पासून वेळ प्रसंगी मृतदेहांवर अंतिम संस्कार करत पुनर्वसनाची कामे योग्य पद्धतीने
हाताळली. त्यावेळेचे विभाग कार्यवाह विजय
चिगलमाता म्हणतात प्राथमिक शिक्षा वर्गासाठी आलेल्या संघ स्वयंसेवकांनी एकाही
क्षणाचा विलंब न करता वेळप्रसंगी आपल्या प्राणाची पर्वा न करता मदतीला सुरुवात
केली एवढेच नाही तर सत्तावीस लोकांचे जीवही वाचवले. फक्त शाखेत होणाऱ्या
संस्कारांमुळेच असे घडू शकते. या नैसर्गिक आपत्तीला जवळजवळ एक दशकाहून जास्त कालावधी होऊन गेला तरीही या
संकटामुळे प्रभावित कुटुंबासाठी आजही अनेक सेवा कार्य सतत चालू आहेत.
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।