सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

बालकांची आनंदी किलबिल

गुजराथ

parivartan-img

आपले मन इतके संवेदनशील आणि सृजनशील बनवा कि त्यात पडणारे दुःखाचे एकेक बीज कालांतराने फुलून त्याचां डेरेदार वृक्ष होईल, आणि राष्ट्राच्या उपयोगी पडेल! यापवित्र संकल्पाचे दृश्य स्वरूप म्हणजे राजकोट येथील "श्री पूजित रूपाणी स्मारक ट्रस्ट". एकेकाळी विद्यार्थी परिषदेचे गुजरात प्रांताचे संघटनमंत्री आणि सध्याचे गुजरात चे मुख्यमंत्री श्री विजय रूपाणी आणि त्यांच्या पत्नी श्रीमती अंजली या दोघांनी त्यांचे दिवंगत सुपुत्र पूजित यांच्या स्मरणार्थ हा ट्रस्ट स्थापन केला. पूजित केवळ तीन वर्षांचा असताना देवाघरी गेला. पुत्र वियोगाचे हे अतीव दुःख सहन करत रूपाणी परिवार गेल्या २७ वर्षांपासून उपेक्षित वंचित बालकांसाठी विविध प्रकारे मदत करत आहे. संघ संस्कारांनी पुनीत विजय रूपाणी आणि अंजली रूपाणी यांनी १७ डिसेम्बर १९९४ रोजी या प्रकल्पाची नोंदणी केली, त्यात झोपड पट्टी आणि सेवा वस्तीतील मुले व महिला यांचे साठी १२ विविध सेवाकार्य चालू आहेत.




राजकोट येथील ७६ झोपडपट्ट्यां मध्ये, मयूरनगर, लोहारनगर, मोरबी रोड इत्यादी ६ ठिकाणी बालकांसाठी "मुक्तद्वार" प्रकल्प सुरू आहे. तेथे ६ ते १४ या वयोगटातील मागास वर्गीय आणि कचरा वेचक मुला-मुलींना पौष्टिक आहार देण्यात येतो, त्याच बरोबर लिहिणे वाचणे, हस्तकला, संगणकासारखे व्यावसायिक प्रशिक्षण, धर्मग्रंथाचे ज्ञान, इत्यादी शिकवले जाते.  सर्व इतक्या प्रेमाने केले जाते जणू या प्रत्येक मुलामध्ये आपले दिवंगतपुत्र पूजित याचे दर्शन अंजली रूपाणी यांना होत असेल. या ट्रस्ट चे एक प्रमुख विश्वस्त श्री अमिनेश भाई यांनी सांगितले की आतापर्यंत ४३० बालकांना या सेवाकार्या ने लाभ झाला असून ती सर्व आपले जीवनमान उंचावत चालली आहेत. कोळशाच्या खाणीतच हिरेही असतात, गरज आहे ती त्यांना पैलू पाडण्याची! हेच कार्य संस्थेच्या ज्ञानप्रबोधिनी प्रकल्पात केले जाते.याचा प्रारंभ १५ जुलै २००० साली झाला. प्रकल्पाचे विश्वस्त श्री मेहुलभाई यांच्या म्हणण्या प्रमाणे या सेवा प्रकल्पातील अनेक बालकांनी बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त केले आहेत. आतापर्यंत २९० मुला-मुलींनी असे चमकदार यश मिळवून आपल्या परिवारांचा लौकिक वाढवला आहे. या शिवाय सध्या ९६ मुले प्रगती प्रथावर आहेत.




पहिल्या तुकडीतील एका रिक्षाचालकाची मुलगी सध्या तक्षशिला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत आहे, तर संजय आणि पूर्वीशा हे दोघे शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत. विजयचे वडील एकेकाळी चपला विकण्याच्या व्यवसाय करत असत, आज तोच विजय इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता आहे. अंकिता चे आईवडील मजुरी करून पोट भरत असत, आज तीच अंकिता डॉक्टर होऊन नाक कान घसा तज्ञ म्हणून काम करतआहे. हे सर्व सांगताना अंजली रूपाणी दीदी यांच्या डोळ्यात चमक येते अणि उर भरून येतो.

ज्ञान प्रबोधनी प्रकल्पात प्रवेश परीक्षेत गणित विज्ञान इत्यादी विषयांची चाचणी घेण्यात येते, आणि त्यात विशेष गुणवत्ता दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. त्यापूर्वी त्यांची तज्ञ व्यक्तीं कडून मुलाखत घेण्यात येते. मग त्यांची कौटुंबिक स्थिती, आर्थिक स्थिती, सामाजिक परिसर यांची पाहणी करण्यात येते, आणि गुरुजनां कडून विद्या व्रताचा संस्कार करण्यात येतो. ही हुशार मुलेमुली दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवून देशातील नामांकित विद्यापीठे आणि शिक्षण संस्थामध्ये प्रवेश मिळवतात. सध्या आठवी पासून या मुलीमुलांना दत्तक घेण्यात येते. त्यांना घरा पासून शाळेत येण्या साठी सायकल देण्यात येते. या प्रकल्पातून उच्च शिक्षण घेतलेले कित्येक हुशार युवक युवती सध्या याच प्रकल्पात आपली सेवा अर्पण करत आहेत. या मध्ये दंत वैद्य प्रिया,सिव्हिल इंजिनियर पूर्वी, बँक ऑफ बडोदातील एक अधिकारी प्रेमजोशी,यांच्या उल्लेख करता येईल.




खेळ आणि खेळणी यांच्या शिवाय आपण बालपणाची कल्पना करूशकतो का? पण या प्रकल्पा मध्ये येणारी बालके इतक्या अभाव ग्रस्त आणि खडतर परिस्थितीतीत वाढत असतात, कि ती खेळणी विकत घेण्याचे स्वप्नही बघू शकत नाही, ही बाब लक्षात घेउन या मुलांसाठी खेळण्यांचीही व्यवस्था करण्यात येते. 'बाल स्वप्नरथ' या नावाच्या या प्रकल्पा खाली एका मोठ्या गाडीत इलेक्ट्रॉनिक आणि अन्य प्रकारची विविध खेळणी पाठवण्यात येतात. दरमहिन्यातील पहिले १५ दिवस ही गाडी वेगवेगळ्या सेवावस्त्यांमध्ये फिरवण्यात येते, आणि पुढल्या १५ दिवसात वेगवेगळ्या चित्र फितीं द्वारा मुलांना मनोरंजक गोष्टी सांगण्यात दाखवण्यात येतात या प्रकल्पात सहा हजाराहून अधिक बालकांना सरस आहार देण्यात येतो,चांगल्या सवयी लावण्यात येतात, आणि त्यांच्या मनात सामाजिक भावही जागवण्यात येतो. प्रकल्पाचे संयोजक श्री नीरज भाई यांनी सांगितले की बाल सुरक्षा प्रकल्पाखाली आता पर्यंत ३५०० हून अधिक बालकांना अडचणीच्या प्रसंगातून बाहेर काढण्यात आले आहे, आणि संरक्षण देण्यात आले आहे. 

कोरोनाच्या काळात जेव्हा अन्य रुग्णालय बंद होती, तेव्हा या प्रकल्पाच्या रुग्णालयात सर्व वैद्यकीय सेवा देण्यात येत होत्या.या प्रकल्पात सर्व सामान्य व्याधीं पासून कर्क रोगापर्यंत सर्व प्रकारची शिबिरे घेण्यात येतात, आणि त्यासाठी केवळ पाच रुपये इतके नाममात्र शुल्क घेण्यात येते. या आरोग्य शिविंरामध्ये प्रख्यात कर्करोग तज्ञ डॉक्टर दुष्यंत मांडकी यांच्या सारखे नामवंत डॉक्टर आपली सेवा देतात.गोरगरीब रुग्णां साठी संजीवनी कार्ड आणि चिरंजीवी योजना राबवण्यात येतात. त्यात सर्व लहान मुलांवर विनामूल्य उपचार करण्यात येतात. घरोघरच्या महिलांना आत्मनिर्भर बनवण्या साठी राजदीपिका प्रकल्प चालवण्यात येतो, त्या द्वारे सेवावस्ती तील १५०० महिलांना रोजगार मिळाला आहे.

एकंदरित हा प्रकल्प संपूर्ण देशा साठी एक आदर्श मार्गदर्शक प्रकल्प झाला आहे.


882 Views
अगली कहानी