सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

सेवा भारती वसतिगृह.. उज्जैन(मध्यप्रदेश)

भालचंद्र जोशी | उज्जैन | मध्यप्रदेश

parivartan-img

काही काही चिवट बियाण आसपासचे पाषाण भेदूनही आपले अस्तित्व सिद्ध करतात I

संगीता मुजालदे हिचे उदाहरण असेच स्फूर्तीदायक आहे I अगदी लहानपणीच तिच्या वडिलांचे निधन झाले, आणि संगीताच्या लहानग्या कोमल हातांमध्ये खुरपे धरण्याची वेळ आली I आपल्या छोट्या भावाच्या पालन पोषणासाठी ती आपली आई कुवर सिंह हिच्याबरोबर उन्हा पावसात, शेतावर मजुरी करू लागली, परंतु तिच्या आईच्या मनात नेहमीच तिच्या शिक्षणाची चिंता असायची I सुदैवाने संगीताला सेवाभारती उज्जैन मध्य प्रदेश इथल्या कन्या वसतिगृहात, इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश मिळाला , आणि तिचा भाग्योदय झाला I वसतिगृहात निवास, भोजन , शिक्षण वगैरे सर्व सुविधा मोफत होत्या I संगीताने या संधीचे सोने करत बारावी विज्ञान ही परीक्षा यशस्वीपणे पार केली , आणि त्यानंतर परिचारिकेचे शिक्षण पूर्ण करून आपल्या कुटुंबाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि संधि प्राप्त करून दिली Iसतीगृहाच्या पूर्ण कालीन व्यवस्थापिका प्रीती तेलंग यांनी दिलेल्या माहितीनुसार या वसतिगृहाची स्थापना 2001 साली केवळ 36 मुलींना घेऊन झाली I वसतिगृहात राहून शिकलेल्या कित्येक मुली आज मोठ्या सरकारी पदांवर काम करत आहेत I आतापर्यंत 240 मुलींनी वसतिगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण केले असून त्यापैकी कित्येक जणी शिक्षिका शासकीय अधिकारी प्राध्यापिका इत्यादी पदेभूषित आहेत, तर काहीजणी या शिक्षणाचा लाभ घेऊन आपापली कुटुंबे समर्थपणे सांभाळीत आहेत I


सेवा भारती या संघटनेचे क्षेत्रीय संघटन मंत्री श्री रामेंद्र जी यांनी सांगितले की उज्जैनच्या आसपास जो वनवासी प्रदेश आहे तेथील मुली आणि महिलांच्या दृष्टीने शैक्षणिक सुविधांचा मोठाच अभाव त्यांच्या प्रगतीच्या आड येत होता, ही अडचण ओळखून कैलास कैलासवासी दत्तात्रय विश्वनाथ नाईक यांच्या कुटुंबीयांनी या वसतिगृहासाठी जमीन दान केली, शिवाय कैलासवासी जगमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी बराच निधीही दिला I

वसतीगृहात मुलींना प्रवेश देताना तीन मुद्द्यांचा विशेष विचार केला जातो I अनाथ मुली, एक पालकाच्या आधारे जगणाऱ्या मुली, आणि गरीब कुटुंबातील मुली, यांनाच वसतीगृहात प्रवेश दिला जातो I यासाठी नगर आणि जिल्हास्तरावर वेगवेगळ्या निवड समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत I या समित्यांचे सदस्य आसपासच्या 10 जिल्ह्यांमध्ये हिंडून तेथील पूर्ण कालीन कार्यकर्त्यांच्या मदतीने मुलींची निवड करून त्यांना सहाव्या इयत्तेत प्रवेश देतात I

मनीषा बामणी ही अशी एक विद्यार्थिनी I तिने आपल्या दरिद्र्यग्रस्त कौटुंबिक परिस्थितीशी धैर्याने आणि चिकाटीने लढून शिक्षण घेतले आहे, आणि दरवर्षी वार्षिक परीक्षांमध्ये ९० टक्क्यांपेक्षाही जास्त गुण मिळवून, वसतीगृहाच्या नावलौकिकात भर टाकली आहे I सध्या ती देवास जिल्ह्यात बागली तालुक्यात टपाल खात्याच्या शाखा कार्यालयात व्यवस्थापक म्हणून काम करत आहे I


रीना मुंजाल दे हिनेही वसतिगृहात राहून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले I त्यानंतर उच्च शिक्षण घेऊन ती गेल्या चार वर्षापासून खांडवा येथील महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर काम करत आहे I कधीकाळी कठीण परिस्थितीमुळे हिरमुसलेली राहणारी अंगूरबाला आज तामिळनाडू येथे पदवि परीक्षाचा अभ्यास करत आहे I

वसतिगृहाचे प्रबंधक श्री सतीश जी सांगतात, काही काही वेळा अगदी संपूर्ण निरक्षर असलेल्या मुली सुरुवातीला न्यूनगंडाने पछाडलेल्या असतात, पण वसतिगृहात आल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सर्वांगीण परिवर्तन होते, आणि त्या विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडतात I केवळ संपूर्ण वसतीगृहाची व्यवस्थाच त्या कुशल पणे करत नाही, तर वसतिगृहाच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे I दरवर्षी वसतिगृहातील मुली लोकमान्य टिळक विद्यालय, व अन्य विद्यालयांच्या विविध स्पर्धांमध्ये यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहेत I मध्य प्रदेश शासनाने वसतीगृहातील चार गुणवान मुलींना लॅपटॉप संगणक घेण्यासाठी प्रत्येकी 25000 रुपयाचे पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला आहे I एका मुलीने तर वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केल्यामुळे, तिचा वैद्यकीय शिक्षणाचा सर्व खर्च द्यायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे I


वसतिगृहाच्या मैदानात विविध क्रीडा प्रकारांसाठी अगदी अद्ययावत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत I वसतीगृहातील मुलींनी जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावरील कबड्डी खो-खो मल्लखांब हँडबॉल इत्यादी खेळांच्या स्पर्धा जिंकल्या आहेत ,याशिवाय या मुलींना संगणक, शिवणकाम, विणकाम, भरतकाम, मेंदी काढणे, आयुर्वेदिक साबण शाम्पू तयार करणे, रांगोळी चित्रकला गायन पाककला इत्यादी विविध कलाविद्यांचे प्रशिक्षण देण्यात येते I समाजात कसे वावरावे, काय करावे, काय करू नये याचेही मार्गदर्शन केले जाते I यासंदर्भात विविध सण उत्सव यांचे आयोजन करण्यात येते, त्यात समाजातील मान्यवर व्यक्ती सहभागी होऊन मुलींना चार हिताच्या गोष्टी सांगतात I समाजातील विभिन्न संघटना गट आपापल्या परीने वसतिगृहासाठी मदत करतात, उदाहरणार्थ काही कारागिरांचा एक गट दरवर्षी एकदा वसतिगृहातील फर्निचर, दार, खिडक्या इत्यादींची दुरुस्ती विनामूल्य करून देतो I त्याचप्रमाणे काही महिला येथील मुलींना विविध प्रकारची कौशल्य शिकवतात, तर काही महिला वसतिगृहासाठी निधी संकलन करतात, अशा प्रकारे वसती गृहातील मुलींवर समर्पणाचे सात्विक संस्कार होतात, अणि त्यामुळेच येथील मुली सेवाभारतीच्या किशोरी विकास प्रकल्पांमध्ये दर आठवड्याला साप्ताहिक सेवा कार्य करतात I वसतीगृहात राहून गेलेल्या माजी विद्यार्थिनी ही वरचेवर येथे येऊन मुलींना प्रोत्साहन देतात, आणि मार्गदर्शनाही करतात I त्यांच्या जिवंत उदाहरणांनीही अनेक अभावग्रस्त कुटुंबांमधील मुलींना सातत्याने प्रेरणा मिळत राहते I

संपर्क प्रीती तेलंग

मोबाईल नंबर ,91=8435826977

281 Views
अगली कहानी