सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

एकमेका साह्य करू-विवेकानंद सेवा मंडळ महाराष्ट्र

महाराष्ट्र

parivartan-img

मुंबई. स्वप्नांची नगरी. या नगरीतील जीवनही तेथील लोकल रेल्वे गाड्यांप्रमाणे भरधाव वेगाने धावत असते. मात्र, सतत पुढे पुढे धावण्याच्या या शर्यतीत काही युवक असेही आहेत, ते मागे पडलेल्या अभागी बांधवांसाठी थांबून, त्यांना मदतीचा हात देत असतात. हे उच्चविद्याविभूषित तरुण म्हणजे स्वामी विवेकानंद सेवा मंडळाचे निष्ठावान कार्यकर्ते. डोंबिवली शहरातील अभियांत्रिकी विद्याशाखेच्या काही तरुणांनी 1991 साली, गरजू विद्यार्थ्यांसाठी एक छोटेसे ग्रंथालय सुरू करून या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. यामध्ये संघाचे एक स्वयंसेवक विष्णू गजानन देवस्थळी आणि त्यांचे प्राध्यापक श्री. सुरेश नाखरे यांनी पुढाकार घेतला. सुरुवातीला त्यात 15 विद्यार्थी होते. ते सर्व जण डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये जाऊन विज्ञान आणि गणित हे विषय शिकवत असत. सलग 18 वर्षे त्यांनी हा ज्ञानयज्ञ चालू ठेवला. हळूहळू त्यांना नवीन सहकारी मिळत गेले. त्यात केतन बोंद्रे, शैलेश निपुणगे, विनोद देशपांडे, रवींद्र सारंग, प्रज्ञेश बोडासा, तृप्ती देसाई, सायली काटकर, सोनल भावसार, अनिकेत गांधी, नंदकुमार पालकर इत्यादींचा समावेश होता. या 40 ध्येयनिष्ठ तरुणांच्या गटाने ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यातील विही हे वनवासी गाव दत्तक घेतले आणि तेथे शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन या क्षेत्रात काम सुरू केले.


सुनील कुलकर्णी (नाव बदलले आहे) हा गरीब विद्यार्थी एका छोट्या खोलीत आपले आई-वडील व भावंडांसह राहात होता. त्याच्याकडे अभ्यासासाठी पुरेशी जागा नव्हती व पुस्तके विकत घेण्यासाठी पैसेही नव्हते. मात्र, अभियंता होण्याचे त्याचे ध्येय होते. त्याला विवेकानंद सेवा मंडळातर्फे ज्ञानमंदिर ग्रंथालयातून अभियांत्रिकीची महाग पुस्तके पुरवण्यात आली. महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली. त्याचप्रमाणे सकाळी सात ते रात्री दहापर्यंत सुरू असणाऱ्या अभ्यासिकेत, अभ्यास करण्यासाठी जागेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. आज सुनील टीसीएससारख्या नामांकित कंपनीत वर्षाला 22 लाख रुपये वेतनावर काम करतो. एवढेच नव्हे, तर तो स्वतः विवेकानंद सेवा मंडळात निस्वार्थ बुद्धीने काम करीत आहे.


केतन बोंद्रे हे लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक. ते विवेकानंद सेवा मंडळाचे अध्यक्ष आहेत. ते सांगतात – सुरुवातीला एका भाड्याच्या गोदामात केवळ 30 पुस्तकांसह ग्रंथालय सुरू झाले. आज तिथे आठ हजारांहून अधिक पुस्तके असून शंभर विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्याची सोय आहे. गेल्या 22 वर्षांमध्ये डोंबिवली शहर आसपासच्या गावातील दहा हजारांपेक्षा अधिक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेचा आणि ग्रंथालयाचा लाभ झाला आहे.

विही हे वनवासीबहुल खेडेगाव, वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वांत मागासलेल्या गावांपैकी एक होते. तेथे विवेकानंद सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने आरोग्य शिबिरे भरवून आरोग्याच्या क्षेत्रात मौलिक कार्य केले. त्याचप्रमाणे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी तीन बंधारेही बांधले आहेत. शेतकऱ्यांना जैविक शेतीचे प्रशिक्षण देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत केली आहे. वनवासी महिलांना आर्थिकॉदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी स्वमदत गट स्थापन करून विविध कौशल्यांचे प्रशिक्षणही दिले आहे. गेल्या वर्षीच या बचत गटाने दिवाळीत डोंबिवली शहरात उटण्याची 50 हजार पाकिटे विकण्याचा विक्रम केला आहे. यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या खरेदीपासून पॅकेजिंग करण्यापर्यंतची सर्व कामे या वनवासी महिलांनीच केली, हे येथे मुद्दाम नमूद केले पाहिजे.


विवेकानंद सेवा मंडळाने केवळ त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली. मंडळाने जेव्हा काम सुरू केले तेव्हा विही गावात दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही दुर्मिळ होते. आज तेथे प्रकाश कवठे, यशवंत, वृंदा इत्यादी अनेक पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतलेले वनवासी युवक युवती काम करत आहेत.“सत्य संकल्पाचा दाता भगवान” असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय येथेही आला. भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी विही गावाला भेट दिली. तेथील कार्य पाहून ते इतके भारावून गेले, की त्यांनी हे गाव दत्तक घेतले आणि खासदार निधीतून सर्वांगीण विकासाची अनेकविध कामे सुरू केली.

विवेकानंद सेवा मंडळाने सलग तीन वर्षे गरीब विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षेसाठी विनामूल्य प्रशिक्षण वर्ग चालवले. संघाचे एक स्वयंसेवक शैलेश निपुणगे यांनी तर नोकरी सोडून एक वर्षभर पूर्ण वेळ विही गावाच्या विकासाकरता कार्य केले. मंडळातर्फे काही वर्षे सातत्याने रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

संपर्क – केतन बोंद्रे

+91 983393003

787 Views
अगली कहानी