सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

घरोघरी नांदे गोकुळ, शबरी सेवा समिती

महाराष्ट्र

Play podcast
parivartan-img

अडीच वर्षाच्या मुलाचे वजन फक्त सहा किलो, हे बघून हृदयाचा ठोकाच चुकला.मनापासून देवा या मुलाला वाचव अशी प्रार्थना करत असतानाच,वास्तवात काय होणार आहे,ते समोर दिसत होते. आणि त्याचरात्रीतते सत्य वास्तवात आले. महाराष्ट्रातील कर्जत तालुक्यातील वनवासी क्षेत्रात, दरवर्षी 70  ते 80 मुलं कुपोषणाचे बळी पडतात . देशाचं भविष्य असलेल्या या बालकांना कुपोषणापासून कसे वाचवावे, हा एक गंभीर प्रश्न होता?? लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले प्रमोद करंदीकर  हे या प्रश्नाने इतके बेचैन झाले, की शेवटी त्यांनी याच  विषयावर गंभीरपणे काम करण्याचा निर्णय घेतला.अनेक वर्ष वनवासी क्षेत्राचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याने प्रमोद करंदीकर जीना या क्षेत्रातील परिस्थितीची जाणीव होती. स्वतंत्रपणे कुपोषणावर काम करण्यासाठी 2003 मध्ये त्यांनी शबरी सेवा समितीची स्थापना केली.आपली पत्नी श्रीमती रंजना करंदीकर बरोबर कर्जत जिल्ह्यातील काही गावात दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंतच्या 700 कुपोषित मुलांना त्यांनी सर्वेक्षण करुन चिन्हांकितकेले. लहान मुलांची स्वच्छता, नियमितपणे वैद्यकीय तपास, पौष्टिक आहाराचे (शेंगदाणे नाचणी नारियल तेल आणि गाईचं तूप यांची पाकीट करून) मोफत वाटप,त्याच बरोबर गर्भवती महिलांच्या आहारावर त्यांनी लक्ष दिले. लहान मुलांच्या  पालकांना ही यासाठी प्रशिक्षित केले. या सगळ्या एकत्रित उपाय योजनांचा परिणाम असा झाला की ज्या जिल्ह्यात सत्तर-ऐंशी मुलांची मृत्यूची नोंद 2002मध्ये होत होती ती 2008 मध्ये   वर्षाला तीन चार इतकी खाली आली याचा अर्थ जवळ जवळ 20,000 मुलांचा जीव वाचवला गेला होता.


सध्यारायगड ,पालघर ,ठाणे ,नंदुरबार ,धुळे ,जळगाव ,सेंधवा ,दादरा नगर हवेली (केंद्रशासितप्रदेश)अशा आठ जिल्ह्याच्या वनवासी क्षेत्रातील सोळाशे पेक्षा जास्त गावात शबरी समितीचे जवळजवळ 47 कार्यकर्ते काम करत आहेत.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर झगडत असताना, वनवासी क्षेत्रातील आई-वडिलांना. दुसऱ्यांच्या शेतात काबाडकष्ट करून आपल्या मुलांचे पोट भरावं लागतं, तिथे त्यांच्या शिक्षणाचा ते कुठून विचार करणार. शबरी सेवा समितीने 2006 पासून सरकारी शाळा, खाजगी शाळा आणि गावांमध्ये अनेक शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले.गोकुळ अष्टमीला पुस्तक हंडी हा उत्सव सुरू केला. मुलांना रामायण महाभारत सारख्या अनेक संस्कारक्षम कथांची पुस्तके मोफतवाटली.

कर्जतजिल्ह्यात कशेळी गावात असलेल्या वसतिगृहात 35 मुले रहात आहेत.किशोरींसाठी शैक्षणिक शिबिरांबरोबरच लहान मूल वमहिलांना शिक्षणात आवड निर्माण व्हावी, म्हणून दहा गावात निःशुल्क वाचनालय सुद्धासुरू केली.


वनवासी कल्याण आश्रमाच्या अखिल भारतीय सह महिला प्रमुख राहिलेल्या रंजनाताई सांगतात ,"दोन्ही पायांनी अपंग निर्मला चे लग्न जुळत नव्हते परंतु प्रशिक्षण घेऊन आपल्या पायावर उभी असलेली निर्मला आज नवऱ्याच्या बरोबरीने कुटुंबाचा खर्च चालवत आहे. शुरुवाणी गावातील कविता आज केंद्रात प्रशिक्षण घेऊन स्वतःच बुटीक चालवत आहे, या बुटिकमुळेच तिने आज नवऱ्याला टॅक्सीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःचे 35 हजार रुपये दिले आहेत.अशीच काहीशी गोष्ट अंजलीची. 6 वर्षांपूर्वी नवऱ्याच्या मृत्यूनंतर अंजली शिवण केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी आल.आज हीच अंजली स्वतः बुटीक चालवून शिवाय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक म्हणून काम करते.जवळ जवळ दहा प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या 750 महिलांपैकी 480 महिला आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.


आयुष्यात अपंगत्वामुळे हतबल झालेल्या व्यक्तींना, मदतीचा दिलेला थोडासा हातही स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आधारभूत ठरतो. दोन्ही हातांनी अपंग सुरेश पाडवी ला आपला स्वतःचा खर्च चालवणे पण कठीण होते, परंतु आज तो संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण करत आहे. शबरी सेवा समितीच्या मदतीने चालवायला मिळालेले धान्याचे दुकान आज त्याच्या जीवनाचा आधार बनले आहे. अशाप्रकारे 460 अपंग आणि अंध लोकांना शबरी सेवा समिती मार्फत विविध प्रकारची मदत दिली गेली आहे.


शेतीवर जीवन अवलंबून असलेल्या वनवासी डोंगराळ क्षेत्रात पाण्याचा प्रश्न भेडसावतो, हे लक्षात आल्यावर  समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या क्षेत्रात अतिशय योजनाबद्ध पद्धतीने विचारपूर्वक काम केले आहे.पालघर सातपुडा सारख्या भागात मिळून जवळजवळ 950 एकर जमीन सिंचनाखाली आणण्याची योजनाशबरी सेवा समितीने तयारकेली आहे. धडगाव जव्हार अक्कलकुवा येथील या वनवासी भागात वृक्षारोपण करत 20000 हून जास्ती आंबे आणि अन्य फळझाडे, तसेच पन्नास हजारांहून जास्त सागाची झाडे लावून लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली आहे. पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन  गावकऱ्यांच्या मदतीने बत्तीस विहिरी,कुठे पाण्याच्या टाक्या, तर काही ठिकाणी पाणी अडवण्यासाठी सिमेंट चे बंधारे बांधले आहेत.अशाप्रकारे शबरी सेवा समिती मार्फत जलव्यवस्थापन, शेती,वृक्षारोपण यांच्यामुळे पाच हजाराहून जास्त कुटुंब रोजगार मिळवून स्वतःच्या पायावर उभी आहेत.


स्वत: करता जगणे,हेतर सर्वच करतात, परंतु आपल्या देशवासियांकरता संपूर्ण जीवन वेचणे, हे इतके सोपे नाही. वनवासी बांधवांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासारखे अतिशय अवघड काम करणाऱ्या शबरी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा.

संपर्क :–प्रमोद करंदीकर जी

मो.नं. : – 91-9920516405

1204 Views
अगली कहानी