सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

एक असे गाव ज्याने आपल नशीब स्वतः घडवल

भालचंद्र जोशी | बारीपाड़ा | महाराष्ट्र

parivartan-img

ही कहाणी आहे एका कर्तुत्ववान गावाची, असे गाव, जेथील गावकऱ्यांनी आपल्या स्वतः च्या बळावर गावाच भाग्य बदलून टाकल. धुळे जिल्हातील साक्री तालुक्यातील बारिपाडा,  हे ते गाव. गावात केवल 94 कुटुंब, ती सर्व वनवासी बांधवांचीच. माणसानं निसर्गाशी नातं जोडलं तर निसर्ग कितीतरी भरभरून आपल्याला परत देतो, हे या गावानं दाखवून दिल आहे. एके काळी  पाण्याच्या एका एका थेंबा साठी तडफडणार हे गाव, आता स्वतः तर जळंस्वावलंबी आहेच, पण आसपासच्या पाच गावांनाही पाणी पुरवत आहे. एकेकाळी या गावातील केवळ 15 हेक्टर जमीन शेतीसाठी योग्य होती, आज तिथे 120 हेक्टर क्षेत्रावर वर्षातून तीन तीन पीक घेण्यात येत आहे.गावात कांदा स्ट्राबेरी विविध प्रकारांच्या डाळी इत्यादींच्या पिकामुळे गावातील प्रत्येक कुटुंब आता समृद्ध झालं आहे. बारीपाडा गावाचा हा कायापालट घडवून आणला तो तेथील एक उच्च शिक्षित तरुण चैतराम पवार यांनी. या कार्याची सुरुवात वनसंवर्धनापासून झाली. बारीपाडा गावातील गावकऱ्यांनी वनविभागाच्या सहकार्याने 450 हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं. त्यासाठी या गावाला वेगवेगळे 33 पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यात 2003 सालचा संयुक्त राष्ट्र विकास संस्थेचा पुरस्कार अणि इंडिया बायो - डायव्हर्सिटी अवार्ड यांचा समावेश आहे.


या गावात मुख्यत : कोंकणा व भिल्ल या जनजातिचे वास्तव्य आहे. 1980 च्या दशकात गावात  दिवाळीनंतर पाण्याचा खडखडाट व्हायचा. गावात केवळ दोन विहीर होत्या,  त्या डिसेम्बर येइपर्यंत पूर्णपणे कोरड्या पडत असत. गावातील लोक नाइलाजाने सहा महिन्यांसाठी स्थलांतर करत असत. गावात रहात असतानाही तेथील शेतीवर कुटुंबांच पोट भरत नसे, त्यांना लाकुडफाटा विकून, केंव्हा मोहोंच्या फुलांच्या दारूचा, बेकायदेशीर धंधा करुन पोट भरायचा प्रयत्न करावा लागत असे. या कामात मुख्यतः बायकांचाच समावेश असे.

बारिपाडापासून ५ किलोमीटर अंतरावर वार्सा नावाच गाव आहे. तिथे वनवासी कल्याण आश्रमाचे वैद्यकीय केंद्र आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक माजी प्रचारक डॉ आनंद फाटक यांनी तेथे सतत ८ वर्षे काम केल. ते सांगतात " गावकऱ्यांना दरवर्षी 6 महीने स्थलांतर कराव लागत असे, त्यामुळे मुलांच्या शिक्षणात सातत्य रहात नसे. महिलांना मैलचे मैल पायपिट करुन लाकुडफाटा आणावा लागत असे. गावापासून दूर अंतरावर असलेल्या नदीच्या आवारात खड्डे खणून त्यातून पाणी काढाव लागत असे, अणि त्या तूटपूंज्या  पाण्यावरच त्यांना सम्पूर्ण दिवस काढावा लागत असे”.

डॉ. फाटक अणि चैतराम पवार यांनी गावाच्या लोंकाना विकासाकरता काम करण्यासाठी प्रवृत  केल. वनविभागाच्या सहकार्याने वनसंवर्धन, आणि वृक्षारोपणवर भर देण्यात आला. झाडांची बेकायदेशीर कापणी होऊ नये, यासाठी गावातील प्रौढ आणि पोक्त व्यक्तींनी वनसंरक्षकाची भूमिका पत्करली. बेकायदेशीर वृक्षतोड़ीसाठी गावकऱ्यांनीच वेगवेगळ्या रकमांचे दंड वसूल करायला सुरुवात केली.

वनसंवर्धन आणि वनरक्षण यांनंतर गावकऱ्यांनी पाण्याचा मुद्दा हाती घेतला. त्यासाठीही वनविभागाच्या सहकार्याने गेल्या तीस वर्षात, जलसवर्धनाचे 600 बंधारे बांधण्यात आले आहे, त्यामुळे गावातील ४० विहिरींना बारा महिने पाणी असते. प्रत्येक मुलाने शाळेत जावे यासाठी शाळेत न जाण्याऱ्या मुलांच्या पालकांकडून दंड वसूल करण्यात येतो. त्यामुळे शाळेतील गळतीचे प्रमाण अत्यंत अल्प झाले आहे.

वनवासी कल्याण आश्रमाच्या सहकार्याने गावात महिलांचे २५ बचत गट स्थापन करण्यात आले. गावातील तळ्यात मत्स्य पालन सुरु करण्यात आले आहेत. बारीपाडा येथील तांदूळ सर्वत्र वाखाणला जातो त्याच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी एक विक्री संस्था स्थापन केलि आहे. ज्या गावात शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प होत, तेथील अभिमत पवार, सुनील पवार यांच्या सारखे तरुण उच्च शिक्षण घेऊन शिक्षक आणि अन्य प्रकारचे काम करीत आहे.


गेल्या २८ वर्षापासून बारीपाडा गावात जगावेगळा असा वनभाजी महोत्सव भरवण्यात येतो, त्यातून अनेक उपेक्षित पण बहुगुणी पालेभाज्यांची विक्री करण्यात येते. अशा पालेभाज्यांपासून वेगवेगळे खाद्यपदार्थ बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धांमध्ये रानभाज्यांपासून खाद्यपदार्थ बनविण्याबरोबरच या रानभाज्यांचे औषधी गुणही सांगणे, हे स्पर्धकांसाठी अनिवार्य असत. कॅनडा या देशात पी एच डी साठी गेलेले श्री शैलेश शुक्ल, हे बारीपाडा गावात शिक्षणासाठी आले होते, त्यांनीच हा महोत्सव सुरु केला. या उपक्रमामुळे वनवासी शेतकऱ्यांच्या रानभाज्यांना बाजारपेठ तर मिळालीच, त्याबरोबरच या वनवासी बांधवांच्या तरुण पिढयांनाही या रानभाज्यांच्या औषधी गुणधर्माची माहिती मिळाली.

गावकऱ्यांनी जे वनसंवर्धन आणि वृक्षसंवर्धन केलं आहे, त्यामुळे गावात सुमारे कोट्यवधी  रुपयांची वनसंपदा निर्माण झाली आहे, अशी माहिती श्री चैतराम पवार यांनी सार्थ अभिमानानं दिली, त्यात सागाचे शेकडो वृक्ष आहेत.

अशीच एक बाब डॉ आनंद फाटक अभिमानाने सांगतात, ती म्हणजे आजही सर्वत्र कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घ्यायची पुरुष टाळाटाळ करतात, पण बारीपाडा गावात मात्र बँव्हशी पुरुषांनीच, स्वतःहुन स्वतःवर हि शस्त्रक्रिया करून घेतली आहे.

संपर्क:-  श्री चैतराम पवार

बारीपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे

मोबाइल क्रमांक  9823642713

1105 Views
अगली कहानी