सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

एक आदर्श गाव-मोहद

मोहन बांडे | मध्यप्रदेश

parivartan-img

मोहद या लहानशा गावाची सीमा ओलांडून गावात प्रवेश करताच लक्षात, येते की आपण एका विशिष्ट गावात आलो आहोत. घरांच्या दारांवरचे स्वस्तिक, भिंतीवर लिहिलेले सुविचार, तरकाही ठिकाणी ब्रह्मांडासंबंधी सुवचने, गावाच्या चावडीवर संस्कृतमधून अभिवादन करणारे गावकरी पाहायला मिळतात. वैदिक काळातील एखाद्या गावाची आठवण करून देणाऱ्या यागावात जेव्हा आपणांस ५० प्रकारचे उद्योगधंदे, गोबर गॅसची संयंत्रे व त्यापासून निर्माण होणाऱ्या अपारंपरिक उर्जेचा वापर होताना दिसतो, तेव्हा संस्कृती अणि विकास यांचा अद्भुतसमन्वय झाल्याचे स्पष्ट जाणवते. मध्य प्रदेश राज्यातील नरसिंहपूर जिल्ह्यातील करेली या तालुक्यापासून केवळ पाच किलोमीटरच्या अंतरावर मोहद गाव वसले आहे. हे गाव म्हणजे रा.स्व. संघाचे भूतपूर्व अखिल भारतीय ग्रामविकास प्रमुख स्व. श्री सुरेन्द्र सिंह चौहान यांचे साकार झालेले स्वप्नच म्हणता येईल. ‘आदर्श ग्राम’ च्या कसोटीवर शंभर टक्के खरे उतरणारे हे गावस्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापासून लागत असलेल्या संघाच्या शाखेतील स्वयंसेवकांच्या श्रमाचे अविरत फळ आहे. गावांतील स्वच्छ रस्ते, हिरव्यागार वृक्षांच्या रांगा, खेळाची मैदाने अणिरूबाबाने डौलणारी शेते, गावाला भेट देणाऱ्या व्यक्तीला स्वत:च आपली कथा सांगू लागतात.

पंतप्रधान मोदींनी जनतेसमोर मांडलेल्या स्वच्छ भारत, शौच कूपयुक्त भारत या संकल्पना मोहद गावात पूर्वीपासूनच साकार झालेल्या दिसतात. गावातील रस्ते स्वच्छ आहेत. कारणप्रत्येक घरासमोर पाणी जमिनीत जिरण्यासाठी खड्डे खणलेले आहेत. गावात सांडपाण्याची, निकासाची व्यवस्था इतकी उत्कृष्ट आहे, की कुठेही घाण पाणी साचून रहात नाही. येथीलप्रत्येक घरात शौचालय आहे.

सेवाभारतीने या ठिकाणी 230 घरांमधे शौचालये बांधली. उरलेल्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मदतीने बांधली गेली. अपारंपरिक ऊर्जावापरात गोबर गॅसचा उपयोग जवळजवळ प्रत्येककुटुंबात केला जातो. पूर्वी मध्य प्रदेशात वीज पुरेशी नव्हती. त्या वेळी गोबर गॅसने दिवेदेखील लावले जात होते. आज त्याचा उपयोग मुख्यत्वे स्वयंपाकासाठी केला जातो.

मोहदमध्ये लघु उद्योग उदा. कापड विणणे, फोटो फ्रेमिंग, मातीची भांडी बनविणे, मशिनीने द्रोण पत्रावळी बनविणे, कुंड्या बनविणे, कापूस पिंजणे, मोटार वाइंडिंग, उद्बत्या बनविणे, पेंटिंग, खूर्च्या बनविणे, टीव्ही रेडि़यो दुरुस्त करणे, मूर्तिकला इत्यादी विकसित करून बेकारीची समस्या जवळजवळ पूर्णपणे संपवून टाकली गेली आहे. नाडेम कंपोस्ट खताचे तंत्र वापरूनशेतकऱ्यांच्या मिळकतीतदेखील बरीच वाढ झाली आहे. मोहदचे माजी सरपंच (सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये सुवर्णपदकविजेते) आणि संघाचे स्वयंसेवक जवाहरसिंह सार्थ अभिमानानेसांगतात, की आज गावातील 850 कुटुंबांकडे उपजीविकेची साधने आहेत, 90 टक्के लोक शिक्षित आहेत. 17 किलोमीटरचे पक्के रस्ते आहेत. विशेष गोष्ट ही की गावात जातिवाद किंवा स्पृश्य-अस्पृश्यता कुठेही दिसत नाही. अनेक वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या ‘आदर्श हिंदू घर’ या स्पर्धेत पहिला क्रमांक अनेकदा दलित समाजातील कुटुंबांनीच पटकावला आहे.

1442 Views
अगली कहानी