सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

निसर्गाच्या वाटे स्वावलंबनाकडे

आसाम

parivartan-img

निसर्गात हिंडत असताना आपल्याला निरनिराळे आवाज ऐकू येतात जणू की झाडाची पाने म्हणतात आमच्यापासून भांडी द्रोण चटया बनवाI  तर फुल आपल्याला सुचावताहेत की आमचा वापर करून घर मंदिर आंगण  सजवा, सणा-समारंभात सजावट कराI  झाडाच्या फांद्या बुंधे म्हणतात आमच्यापासून काष्ठ शिल्प बनवा,या जगात अशा सुंदर निर्मितीची आवश्यकता आहे, असे आवाहन करतातI  माती सांगते माझ्यापासून बनवलेल्या भांड्यात जेवून तर बघा, तर डोंगर स्वतःला कोरून उत्तम शिल्प कला निर्माण होईल असे आवाहन करतातI हा जो सुंदर निसर्ग आहे तो स्वतःच स्वयंपूर्ण आहे,स्वावलंबी आहे म्हणूनच कदाचित आपल्याला पावलोपावली आपण स्वावलंबी कसे होवू ह्याचे प्रशिक्षण हा देत असतोI

ह्याचेच एक उत्तम  उदाहरण म्हणजे आसामची बांबू कौशल्य कला


ही कला वनवासींच्या  उपजीविकेचं साधन बनवणाऱ्या सेवा भारतीच्या पांचजन्य लघु उद्योगाची 2022 पर्यंतची वार्षिक उलाढाल पन्नास लाखावर गेली आहे, तर जवळजवळ साठ हून अधिक गावांना याचा फायदा मिळाला आहेI  हजारो हात बांबूच्या कलात्मक वस्तू बनवून स्थानिक बाजारपेठ, मेळे, अपना ट्रेड फेअर, बिहू सणानिमित्त असलेल्या जत्राआसाम प्रदर्शनी अशा अनेक प्रदर्शनात भाग घेऊन आपले जीवन समृद्ध करत आहेतI

बांबू कला आसाम मध्ये प्रत्येक घरातील संस्कृती आणि परंपरेचा एक आविभाज्य घटक आहे I प्रदर्शनात विक्रीला आलेल्या बांबूच्या वैविध्य पूर्ण वस्तू बघून, आलेले लोक खूप आश्चर्य चकित होतातI

सर्जनशील कलावंता कडे कल्पनांचे भांडार असते,आणि ही गोष्ट अविनाशजींकडे बघून आपल्याला पटतेI 2009 मध्ये सेवा भारतीशी जोडले गेलेले जिल्हा संयोजक अविनाश हजारिका,जे स्वतः बांबूच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी झाले, आणि 2022 पर्यंत हजारो लोकांना यांनी वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहेI  जेव्हा हा उपक्रम सुरू झाला तेव्हा बांबूच्या सात-आठ वस्तू बनवल्या जात होत्या, परंतु आज आसाम मध्ये लागल्या जाणाऱ्या मोठ्या मोठ्या प्रदर्शनातून विसापेक्षा जास्ती प्रकार लोकांना दाखवले जातातI या उपक्रमाशी जोडल्या गेलेल्या सृजनशिल कलाकारांकडून बांबूच्या अनेक नवनवीन कलात्मक वस्तू बनवल्या जात आहेतI


सेवा भारतीच्या पांचजन्य लघु उद्योगाच्या अंतर्गत आसामच्या जोरहाट मध्ये गावागावात जाऊन बांबू कौशल्य कला प्रशिक्षण शिबिर आयोजित केली जात आहेतI अविनाशजींबरोबरच नगेन कलिता आणि  रोमन हजारिका पण शिक्षक आणि सहकारी या नात्याने या पूर्ण उपक्रमात आपली भूमिका बजावत आहेतI

डोंगराळ भागात जिथे रस्ते आणि वीज पण नाहीये, अशा ठिकाणी जाऊन लोकांमध्ये विश्वास निर्माण करून बांबू कलेचे प्रशिक्षण देणं,शिबिर लावणं हेच खरतर खूप मोठे कार्य आहेI

जेव्हा जीवनात एखादा दरवाजा बंद होतो, तेव्हा नजरपारखी दुसरा दरवाजा शोधत असतोI  नगेन कलीता सांगतात, माजली गावातील दिव्यज्योती नाथ असो किंवा जोरहाटचे प्रणव ज्योती चांगभाई असो, गरिबीशी लढून त्यांनी पदवी प्राप्त केली, परंतु नोकरीसाठी दारोदार हिंडत असताना त्यांना नोकरी काही  मिळाली नाहीI  वृद्ध आई-वडील आणि आपले कुटुंब यांच्या छोट्या छोट्या गरजा सुद्धा आपण पूर्ण करू शकत नाही, या दुःखाने त्यांचे मन आतल्या आत खात होतेI  सेवाभारतीचे प्रशिक्षण शिबिर जणू त्यांच्यासाठी एक वरदान ठरलेI  त्यांच्यातल्या सृजनतेला,कल्पकतेला जणू पंख मिळालेI जिथे त्यांना शंभर रुपये मिळवणे कठीण जात होतं, तिथे ते आज दहा हजार ते पंधरा हजार रुपये महिना मिळवू लागले आहेतI


भारतीय अर्थव्यवस्थेत महिलांचे खूप मोठे योगदान आहे, असे फक्त म्हणले जातेI  परंतु खरोखरच आज सर्वसामान्यपणे भारतीय गृहिणी कडे प्रत्यक्ष प्रमाणात काहीच मिळकत नसते, ती प्रत्येक खर्चासाठी आपल्या पतीच्या कमाई वरच अवलंबून असतेI  आसाम मध्ये घराघरातून महिलांच्या मार्फत बांबूचे सामान बनवले जाते, परंतु हे आपले सामान लोकांसमोर कसे येणार? स्थानिक बाजारपेठेत हे कसे आणता येईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सर्वसाधारणपणे महिला मिळवू शकत नाही I त्याचा परिणाम असा होतो की त्यांनी तयार केलेल्या वस्तू, त्यांचे कौशल्य या चार भिंतीच्या आतच राहतेI या अडचणीवर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून माजुली गोलाघाट सारख्या अनेक गावात जाऊन सेवा भरतीच्या मार्फत बांबू प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जात आहेतI या ठिकाणी पुरुषांबरोबरच अनेक महिलाही भाग घेत आहेतI  सेवाभारतीच्या या उपक्रमाच्या मार्फत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महिलांना सहजपणे मिळत आहेतI  आज त्यांच्यातीलच एक दीपशिखा बरंसुतिया आपल्या कौशल्यपूर्ण कामामुळे महिन्याला दहा हजार रुपये मिळवत आहे, आणि एवढंच नाही, तर त्यांनी बनवलेल्या वस्तू लोकांना खूप आवडतातI या प्रशिक्षणाने त्यांना केवळ स्वावलंबीच नाही केले तर स्वतःची एक वेगळी ओळख मिळवून दिली आहेI


एखादे चांगले कार्य हजारो लोकांना रस्ता दाखवतेI 2019 पासून मेघालयात सुद्धा सेवाभारतीचा "वेत आणि बांबू कला कौशल्य" विभाग याच धरतीवर काम करत आहेI  बांबूच्या कलात्मक गोष्टीं बनवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी नोनीपाडा गावात एक केंद्र चालवले जाते, ज्यात 250 हून जास्त लोक प्रशिक्षण घेऊन गेले आहेतI याच प्रमाणेपंधरा गावातील जवळजवळ 200 परिवार या योजनेचा  लाभ घेत आहेतI  सेवा भारतीच्या गारो हिल्स विभागाचे संघटन मंत्री जनार्दन कोच सांगतात की,बांबू क्राफ्ट ची ही संस्कृती, आणि परंपरा, संपूर्ण जगाला कशी समजेल, अणि बांबूपासून बनवलेल्या कलात्मक वस्तूंचा, आणि या निपुण कलाकारांचा सन्मान आणि एक वेगळी ओळख जगाला कशी दाखवता येईल, याच विचाराने आम्ही छोट्यागावातील लोकांना मार्गदर्शन करत आहोतI बांबू कौशल्य कलेला पुढे आणण्यासाठी अणि संपूर्ण जगासमोर याची ओळख निर्माण व्हावी यासाठी, सेवा भारती मार्फत योजना सुरू आहेI

संपर्क : अविनाश हजारिका

मो.नं.:+91 7002113491,9435897848

614 Views
अगली कहानी