सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

संघाची साथ गणितावर मात

अरुणाचल प्रदेश

parivartan-img

भारत-चीन सरहद्दीवर आठ हजार फूट उंचीवर दुर्गम स्थानी वसली आहे बोमदीला ही नगरी। तवांग पासून 56 किलोमीटर दूर महाराष्ट्रातून येथे संघाचे काम करण्यासाठी श्री राजेश जी हे प्रचारक येथे आले तेव्हा बस स्थानकावर उतरताच, त्यांना एक विचित्र दृश्य दिसले। जवळजवळ 60- 70 किशोर वईन मुले मुली खिन्न होऊन बसली होती। काही मुली तर चक्क रडत होत्या। ही सर्व मुले-मुली गणितात नापास  झाल्यामुळे उदास निराश झाली होती। एकट्या बोमदीला शहरात 300 विद्यार्थी विद्यार्थिनी गणितात नापास झाल्या होत्या। त्यांना पुढील शिक्षणात काही रसच उरला नव्हता, केवळ गणितातील अपयशाने त्यांचे संपूर्ण भविष्य धोक्यात आले होते। याप्रसंगी अरुणाचल सेवा भारती मदतीसाठी पुढे आली।




मुलांच्या मनातून गणिताची भीती नष्ट करण्यासाठी सेवा भारती ने 70 दिवसांचा विशेष अभ्यासक्रम तयार केला। सेवा भारती च्या स्वयंसेवकांनी दूरदूरच्या गावामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अत्यंत रोचक पद्धतीने गणित शिकवले। 2009 साली हा उपक्रम सुरू झाला, त्यानंतर या प्रदेशातून आतापर्यंत 8000 विद्यार्थी गणितात उत्तम गुण मिळवून 12 वीची परिक्षा उतीर्ण झाले आहेत, त्यापैकी कित्येक जणांनी नंतर उच्च शिक्षण घेऊन मानाच्या नोकऱ्या मिळवल्या आहेत।

ईशान्य भारतातील खडतर भौगोलिक परिस्थितीची कल्पना करणेही अवघड आहे। बोमदीला आणि इतर ठिकाणी वर्षाचे बाराही महिने हाड मोडणारी कडाक्याची थंडी असते, आणि 7 महिने पाऊस पडत असतो। त्यामुळे झाडे झुडपे तर गळून जातातच, पण तांदूळ आणि आणि इतर धान्य पिकणेंहि अशक्य होते। लहानमोठी खरेदी करण्यासाठी डोंगराळ भागात चढ-उतार करणे भाग पडते। बांबूच्या घरात बुखारी (शेगडी) च्या उष्णतेच्या मदतीने अवघड आयुष्य जगणाऱ्या या लोकांच्या मुलांसाठी  सरकारने शाळा तर उघडल्या, पण तेथे कधी शिक्षक येत नाहीत, तर कधी विद्यार्थी! अशा कठीण परिस्थितीत तेथील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा संकल्प सेवा भारती च्या कार्यकर्त्यांनी सोडला। बी टेक सारखे उच्चशिक्षण घेतलेला एक तरुण पुण्याहून नोकरीतून 40 दिवसांची रजा घेऊन या भागात काम करण्यासाठी आला, पण 2009 साली त्याने नोकरी सोडली, आणि तो कायमचा त्याच अरुणाचल प्रदेशात राहून सेवा कार्य करू लागला। दरवर्षी तो 5 ते ८ ठिकाणी 70 दिवसांचा गणिताचा अभ्यासक्रम शिकवत असतो। 

सेवा भारती ने केलेल्या आवाहनांनुसार  काही विद्यार्थी तेथे 6 महिने ते 1 वर्ष अशा मर्यादित कालावधीसाठी विस्तारक म्हणून काम करत आहेत। स्थापत्य  शास्त्रा तील पदवीधारक हर्षदा, बायोमेडिकल इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतलेली राधिका, आणि आणि एम.एस.सी. ही पदव्युत्तर पदवी घेतलेली स्नेहा, या महाराष्ट्रातील युवतींनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर 6 महिने अरुणाचल प्रदेशात राहून तेथील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले। आता इंग्रजी आणि राज्य लोकसेवा संघाच्या स्पर्धा परीक्षां साठीही सेवाभारती तर्फे मार्गदर्शन केले जाते । सरकारी शाळांच्या  इमारतीमध्येच प्राचार्यांच्या परवानगीने हे वर्ग चालत असतानाच, विद्यार्थ्यांवर राष्ट्रभक्तीचे संस्कार ही केले जातात। आठवड्यातून एक दिवस देशभक्तीपर गाण्यांचे गायन केले जाते, आणि महापुरुषांच्या जीवनगाथा सांगितल्या जातात। वेळोवेळी व्यवसाय मार्गदर्शनाचे (करियर गायडन्स) वर्गही आयोजित करण्यात येतात, त्यात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात येते। या सर्व कार्यात सेवा भारती या संस्थेच्या पुण्यातील ज्ञान प्रबोधनी या संस्थेचेही मोठे सहकार्य लाभले आहे। प्रबोधिनीच्या मध्यमातून आतापर्यंत साडेचारशे सेवाभावी तरुण-तरुणींनी कमीअधिक काळासाठी अरुणाचल प्रदेशात कार्य केले आहे ।

1375 Views
अगली कहानी