नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
मध्यप्रदेश
जन्म आणि मरण ह्यांना जवळून पहाण्याऱ्या डॉक्टर मंडळींना रोजच नवनवीन परीक्षांना सामोरे जावे लागते. परन्तु आज तर डॉक्टर ऋषि ह्यांच्या जीवनाची सर्वात मोठी परीक्षा होती. २३ नवजात बालकांचे आयुष्य पणाला लागले होते. वॉर्ड मध्ये आग लागली होती आणि अग्निशामक सिलिंडर मधील गॅस वापरून आग विझवण्याचे प्रयत्न ही निष्फळ ठरले होते. मध्य प्रदेश मधील छतरपूर जिल्हा हॉस्पिटल येथील ही घटना. नवजात बाळांच्या गहन चिकित्सा वॉर्ड मधील एसी ला आग लागली, आणि सर्व नवजात बालकांचे जीवन धोक्यात आले. त्यावेळी ड्यूटी वर हजर होते संघाचे प्रथम वर्ष शिक्षित डॉक्टर ऋषि द्विवेदी. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अतिशय धाडसाने व हुशारीने त्वरित निर्णय घेऊन बाळांना आगीपासून वाचवले.
११ जुलै संध्याकाळी ७ वाजेपर्यंत छतरपूर जिल्हा चिकित्सालयात सर्व कही ठीक-ठाक होते. बाळांच्या वार्ड मधून बाळांच्या रडण्याचा आवाज ही अधुन मधून ऐकू येत होता. त्याचवेळी वॉर्ड मधील एसी ला आग लागली. एसी ला आग लागल्याने विद्युत प्रवाह बाधित झाला आणि मिट्ट काळोख पसरला. आग विक्राळ रूप धारण करण्याअगोदरच तीथे हज़र असलेल्या चिकित्सा अधिकारी डॉक्टर ऋषि द्विवेदी ह्यांनी अग्निशामक सिलेंडर नी आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. परन्तु सिलिंडर मधील गॅस संपल्यावर देखिल आग विझू शकली नाही, आणि वार्ड मध्ये जीव गुदमरून टाकणाऱ्या धुराचे साम्राज्य पसरले. ड्यूटी वर असलेल्या परिचारीका संगीता आणि जया ह्या पण घाबरल्या आणि धीर सोडून आपला जीव वाचवण्याचा विचार आणि प्रयत्न करू लागल्या. परन्तु डॉक्टर ऋषिमधील स्वयंसेवक बाळांना धोक्यात सोडून जायला तयार नव्हता. शाखेत म्हटलेली गीतं त्याला आठवत होती.... "जीवन बन तू दीप समान, जल-जल कर सर्वस्व मिटा दे बन कर्त्तव्य प्रधान." अखेर त्यांनी त्वरित निर्णय घेउन परिचारिकांच्या मदतीने बाळांना कडेवर उचलून दुसऱ्या वार्ड मध्ये न्यायला सुरुवात केली. तोपर्यंत ईतर लोकं ही मदतीला आले आणि सर्व नवजात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।