सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

शिक्षणाद्वारे विणलेले यश

श्रीमती वंदना पूणताम्बेकर | तामिळनाडू

parivartan-img

ते सर्व अशिक्षित होते. दिवसभर आपल्या मुलांनाहि या कामात नाईलाजाने गुंतवणे, ही त्यांची गरज होती. सम्पूर्ण कुटुंब जेव्हां काम करीत होते, तेव्हां कुठे दोन्ही वेळेची भाकरी मिळत  होती. हे त्रासदायक होते, रेशमी विणकाम सारख्या चांगल्या कामात गुंतलेली असताना पगार घेण्याची पाळी आली की, हे विणकर अनेकदा फसवले जायचे. ज्याला स्वाक्षरी कशी करावी हे देखील माहीत नव्हते, ते कमाई ची नोंद आणि हिशोब कसे ठेवू शकतात...? कांचीपूरमच्या विणकर समाजात पिढ्यानपिढ्या हेच घडत होते. निरक्षरतेने त्यांच्या विकासाचे सर्व दरवाजे बंद करून ठेवले होते . हे दरवाजे तेंव्हा उधडले, जेव्हां  थिरुवल्लरवुर या ठिकाणी रात्रीची शाळा सुरू झाली. 1981मध्ये जेव्हां संघाच्या सेवाविभागाची रचना देखील झाली नव्हती, तेव्हां तामिळनाडूमधील कांचीपुरमचे विभाग प्रचारक धनुष्य जी यांच्या प्रयत्नाने विणकर समाजासाठी संध्याकाळी 6:30 ते रात्री 9:30 पर्यंतचे  रात्रीचे वर्ग सुरू केले गेले होते. सलग 35 वर्षा पासून चालत आलेल्या या वर्गांमुळे या कुटुंबांच्या 4000 विणकारांना शिकण्यास, वाचण्यास आणि वाढण्यात मदत झाली , एवढेच नव्हे तर स्वयंसेवकांच्या या अक्षरा मोहिमेद्वारे प्रेरित हून तामिळनाडूच्या सरकारने सुद्धा या वस्त्यांसाठी 33 रात्रशाला सुरू केल्या. 

चिन्ना कांजीपुरममध्ये राहणारा प्रकाश अजूनही तो दिवस आठवतो जेव्हां तो प्रथम रात्रीच्या वर्गात आला होता. 11 वर्षाचे वय असलेले प्रकाश आणि त्यांचे दोन्ही भाऊ रमेश आणि बालाजी  येथे अभ्यासासाठी येत होते. ह्या रात्रीशाळेत येण्यापूर्वी,  हे तिन्ही भाऊ त्या दिवसा पर्यंत कधीही शाळेत गेले नव्हते. या वर्गामध्ये तेथील शाखा कार्यवाह मूर्तीजी तमिळ, इंग्रजी व गणित, हे तीन विषय शिकवायचे, याशिवाय गीत, प्रार्थना, मंत्रोच्चार शिकवले जायचे, आणि कधी-कधी नैतिक कथा देखील वाचून दाखविल्या जायच्या . ह्या कामासाठी मूर्ती जी यांनी आपल्या आयुष्यातील 20 अनमोल वर्षे दिली. त्यांच्या सारख्या स्वयंसेवकांच्या निस्वार्थ सेवाभावाचा  चा हा परिणाम आहे, की आता इथला  विणकर समाज प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. प्रकाश आणि त्यांचे कुटुंब व्यवसायातच नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे गेले आहेत. पूर्वी जेथे तो इतरांसाठी विणकाम करीत असे, आता  ते स्वत:चे मालक आहेत,  आणि त्यांच्या व्यवसायातून दरमाह 30 ते 35 हजार रुपये कमवतात. प्रकाश राधाकृष्णन आता  उत्तर तामिळनाडू प्रांत सहप्रमुख ची महत्वपूर्ण जबाबदारी निभावत आहेत,  त्यांचा असा विश्वास आहे की या छोट्याशा सेवेमुळे शेकडो कुटुंबांचे जीवन बदलले आहे. 

जेव्हां चेन्नई पासून फ़क्त 72 कि.मी च्या अंतरावर वसलेल्या या शहरात अक्षरा मोहीमेचा  प्रारंभ झाला, तेव्हां  या भागातील साक्षरतेचे प्रमाण फक्त 15 टक्के एवढे होते,  म्हणजे येथील 85 टक्के लोकसंख्या साक्षर नव्हती. आज येथील 60 टक्के लोकं साक्षर आहेत. या मोहिमेच्या  वेळी तमिळनाडू प्रांतीय सेवा प्रमुख आणि सध्या संघाचे अखिल भारतीय अधिकारी सुंदर लक्ष्मण जी मानतात, की येथील विणकर समाजाच्या दुसऱ्या पिढीमध्ये आता बरेच तरुण पदवीधर झाले आहेत, ते आनंद व्यक्त करतात की आता हि लोकं आपल्या मुलांना देखील शाळेत  पाठवत आहे.

677 Views
अगली कहानी