सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

अनघड हिऱ्यानां पैलू पाडणारी संस्था कल्पतरु

भालचंद्र जोशी | झारखंड

parivartan-img

ती मुंले वर्गात मागच्या बाकावर कायम बसणारी , फळ्यावर काय लिहिले आहे ते त्यांना कळत नसे, अणि समजुन घ्यायची इच्छाही नसे, गणित, इंग्रजी हे विषय त्यांच्या डोक्यावरुन जात। पण अभ्यासात फारशी गती नसलेव्या या मुलांमधील अन्यान्य गुण लक्षात घेऊन त्यांना प्रगतीच्या वाटा मोकळ्या करून देत आहे कल्पतरू! कल्पतरू हे नाव आहे एका प्रशिक्षण संस्थेचे। झारखंडची राजधानी रांची पासून 35 किलोमीटर वर असलेल्या हेचल पंचायती मध्ये एक हेक्टर क्षेत्रावर ही संस्था  वसली आहे। तेथे मॅट्रिक आणि इंटर परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते। पुस्तकी शिक्षण हीच यशस्वी जीवनाची एकमेव गुरु किल्ली नव्हे, ही या संस्थेची ठाम धारणा आहे। माजी क्षेत्र संघचालक आणि राष्ट्रीय सेवा भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री सिद्धनाथ सिंह यांच्या प्रयत्नांनी 2009 मध्ये ही संस्था सुरू झाली। संस्थेनि कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांद्वारे हजारो ग्रामीण युवकांना नवी आशा आणि मार्ग दाखवला आहे।


सोनभद्र जिल्ह्यातील अंतरा या गावातील एका शेतकरी कुटुंबातील रामचंद्र सिंह हा युवक शिक्षणात सतत अपयशी होत होता। उच्च शालेय शिक्षणात अपयशी झाल्यावर त्याला आयुष्यात केवळ निराशा आणि अंधार दिसत होता, पण कल्पतरू या संस्थेच्या संपर्कात तो आला, आणि त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले। तेथे त्याने वेल्डिंग आणि मशीन मेकिंग, याचें प्रशिक्षण घेतले, अणि आज तो मास्टर वेल्डर म्हणून दर महिन्याला  जवळ जवळ 40,000 हजार रू मिळवत आहे। शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनि पैसेही मिळवावेत या संस्थेच्या तत्वानुसार कल्पतरू संस्थेतील विद्यार्थी शिकत असतानाच पैसेही मिळवत आहेत। दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी दरवर्षी 15,000 हजार रुपये शिक्षण शुल्क असून त्यापैकी बराच मोठा भाग, विद्यार्थी विविध उद्योगांमध्ये कामाचा अनुभव घेत  असतानाच  मिळवतात।




कल्पतरू संस्थेचे वेगळेपण येथेच उठून दिसते। हफूआ  या मुस्लिम बहूल गावाचा चेहरामोहराच संस्थेने बदलून टाकला आहे। एकेकाळी हे गाव गुंडगिरी आणि मारामाऱ्यासाठी खूप प्रसिद्ध होते, आता तेथील बावीस तरुण वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घेऊन दुबई आणि आणि सौदी अरबस्तानमध्ये वेगवेगळ्या उद्योगांमध्ये काम करत आहेत। आलिम अन्सारी आणि त्याच्या दहा मित्रांनी कल्पतरू संस्थेत फिटर होण्याचे  प्रशिक्षण तीन वर्षांमध्ये पूर्ण केले, आणि आज ते ओमान मध्ये एका खाजगी कंपनीत नोकरी करत आहेत। 


जेव्हां जवळपासच्या गावा मधून  मॅट्रिक आणि इंटर अनुत्तीर्ण विद्यार्थी मिळणे बंद झाले, तेव्हा कल्पतरू या संस्थेने पदवीधारकांनाही प्रवेश द्यायला सुरुवात केली, एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष व्यवसायिक प्रशिक्षण मिळावे या हेतूने काही पदवीधारक  अभियंते ही या  संस्थेमध्ये दाखल झाले। असाच एक अभियंता म्हणजे आदित्य सिंह, तो सांगतो की "व्यवसायिक अनुभवाची ”  कमतरता मला अभियांत्रिकी च्या शिक्षणातही  सातत्याने जाणवत असे, पण ती न्यूनता कल्पतरू संस्थेने पूर्ण केली "। आता आदित्य सिंह हा स्वतःच त्या संस्थेत अध्यापनाचे कार्य करत आहे। आपल्याला  येथे पगार  भलेही कमी मिळत असेल, पण काम केल्याचे समाधान लाभणार आहे, अशी त्याची भावना आहे। 




संस्थेत वेल्डर, फिटर, मेंकेनिक, इलेक्ट्रॉनिक, फिटिंग, असे अनेक उद्योगांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम घेण्यात येतात। त्या बरोबरच जैविक शेती, कंपोस्ट खत निर्मिती, गोमूत्रापासून कीटकनाशके तयार करणे, बैलाद्वारे चालवण्याची पिठाची गिरणी, मधाचे उत्पादन, इत्यादी कौशल्येही शिकवण्यात येतात। संस्थेतर्फे ग्रामीण महिलांना शिवण काम शिकवण्यात येते। महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्रीही करून देण्यात येते। संस्थेतून प्रशिक्षण घेतल्याघेतल्याच विद्यार्थ्यांना  नोकऱ्या मिळाव्यात यासाठी अनेक उद्योगांबरोबर करार करण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य आणि  संघाचे स्वयंसेवक श्री संजीव यांनी पुरविली आहे। येथील विद्यार्थी आयुष्यभर संस्थेशी निगडित राहतात, असे त्यांनी सांगितले। थोडक्यात म्हणजे कल्पतरू ही संस्था अनघड हिऱ्यानां पैलू पाडण्याचे महत्वाचे काम करत आहे।

717 Views
अगली कहानी