नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
सौ प्रगती शीरपूरकर | मध्यप्रदेश
असे रम्य परिदृश्य मातृछायाच्या अंगणात बघून साक्षात गोकुळात आल्यासारखे वाटले पण त्याच वेळी सगळ्यांची नजर एक बेवारस बैग वर पडली आणि जीवाची धडधड वाढली, व शंकेचे वादळ पसरले। मनात विचार येऊ लागला कि ह्यात विस्फोटक वस्तू तर नाही, म्हणून मातृछायाची मातृशक्ती आपला जीव धोक्यात टाकून चपळपणे तो बैग बाहेर दूर फेकण्यास निघाली, तर त्यातून तान्या बाळाचे रडणे ऐकू आले, अणि मग चालते पाऊले तिथेच थांबले।तर हे काय ! असाह्य आईचे दोन दिवसाचे बाळ दुधाच्या बाटली सोबत त्या बैग मध्ये होते।
असो पण ह्या बाळाच्या येण्याने होळीचा आनंद मात्र व्दिगुणीत झाला। आज मातृ छायेच्या ह्या कुटुंबात अजून एक सदस्य सामील झाला होता। भोपाळ सेवाभारती मार्फत बेवारस मुलांसाठी संचालित होणाऱ्या मातृछाया शिशुगृहामध्ये आज ही छकुली आली होती, जिथे तिला नवीन आयुष्य मिळणार होते।
संघप्रचारक व सेवाभारतीचे जन्मदाते स्वर्गीय विष्णूजींच्या प्रेरणेने सन १९९७ मध्ये सुरु झालेले हे, मध्यप्रदेशातिल पहिले मान्यता प्राप्त इंटरनॅशनल अडॉप्शन सेंटर आहे। आकडेवारी बघितली तर ४०० पैकी ३५० मुलं आज पर्यंत देशाच्या वेग – वेगळ्या भागात आपआपल्या घरी सुखान नांदत आहेत । इथे प्रत्येक बाळाचा सांभाळ करण्यास सेवा कार्यात समर्पित असलेल्या यशोदा माउली आहे, ज्या बाळांच्या बारीकसारीक गरजांचे लक्ष ठेवतात, आणि त्यामुळे हे सगळे नात्यांच्या माळेत ओवले / बांधले गेले आहे । हे मातृमंडळ ह्या बाळगोपाळां चे काकू , मावशी, आत्या अश्या रेशीमगाठित विणले गेले आहे।
आपल्या आयुष्याचे १५ वर्षे मातृछाये ला देणारे पांचखेडे जोडपं, जो पर्यंत इथे राहिले, ह्या मुलांचे आई बाबा बनून राहिले । ह्या दोघांना इथल्या मुलांची इतकी ओढ लागली कि जेव्हा कोणी मुलांना दत्तक घ्यायचे, तो क्षण, ह्या जोडप्यासाठी फार त्रासदायक असायचा. एकीकडे मुलाचे उर्वरित आयुष्य सुखी होणार हा आनंद , तर दुसरी कडे त्या मुलाचा दुरावा अश्रू देऊन जायचा । पुढे सुधाताई सांगतात कि ३ वर्षाचा अविनाश जेव्हा आपल्या नवीन आईबाबां सोबत आस्ट्रेलियाला जाणार होता, तेव्हा तो सगळ्यांना, त्याच्या स्वागतासाठी सजवलेल्या खोलीचे फोटो दाखवत होता । तसेच जेव्हा कावेरी ला दत्तक घेण्यास तिचे आईवडील स्पेन हुन आले, तेंव्हा तिने त्यांना स्पॅनिश मध्ये नमस्कार करून चकित केले, कारण कावेरी ला स्पेन मध्ये सहज वाटावे, म्हणून दत्तक देण्याच्या सगळ्या औपचारिकता पूर्ण होई पर्यंत, तिला मातृछाया मध्ये २ महिने स्पॅनिश शिकवली गेली। भूतकाळात गेले तर मातृछायाच्या प्रबंधन समितीला आज पण ती रात्र आठवते जेव्हा हमीदिया दवाखान्याच्या कचरा पेटीतुन दोन दिवसाच्या अविनाश ला आणले होते व अतिशय जपून ह्या प्री मैचोर बाळाचा जीव वाचवला होता।
मध्यप्रदेशाचा पहिला लीगल अडॉप्शन सेंटर मातृछाया, फक्त एक शिशुगृह नसून एक पूर्ण परिवार आहे, जिथे हिंदू संस्कृती प्रमाणे मुलांचे सगळे संस्कार सोहळे, उदाहर्णार्थात बारस ,उष्टावण पासून कर्णछेदन पर्यंत पूर्ण जल्लोषात साजरे केले जातात । मातृछाया समितीच्या उपाध्यक्ष व सेवाभारतीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष अमिता जैन सांगतात, कि इथे बाळांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या जातात, व सुरक्षे च्या दृष्टीने परिसरात सीसीटीव्ही केमरे पण लावले आहेत । बाळांची दोन वेळेची मॉलिश व त्यांच्या पोषक आहाराचे पण लक्ष ठेवले जाते । मोठ्या मुलांसाठी शाळेनंतर च्या अभ्यासाची काळजी घेणारे शिक्षक, ह्या मुलांचा अभ्यास घेतात ज्यांना मात्रुछाया मानधन सुद्धा देते। संध्याकाळी मुलांना अतिरिक्त क्रियाकलाप, म्हणून ड्रॉईंग , कार्ड मेकिंग व संगीत पण शिकवले जाते।
वर्षभर सगळे सण साजरे करण्यासाठी सेवाभारती कुटुंब मातृछायाच्या अंगणात एकत्र येतात । प्रत्येक महिन्यात ह्या मुलांना शहरातील प्राणिसंग्रहालय , म्युजियम ,शॉपिंग मॉल दाखवायला भटकंतीवर नेतात । दत्तक गेलेल्या मुलांची काळजी असते, म्हणून मातृछाया प्रबंधन सतत फॉलोअप घेत असते । मातृछाया च्या बाळांमुळे ज्या कुटुंबात गोकुळ नांदू लागले, ते सगळे दंपति मातृछायाशी अश्याप्रकारे जुडली गेली आहे कि जणू तेही मातृछाया कुटुंबातलेच असावेव ते मुलांचे यश, प्रगतीची खुषाली मातृछायाला सातत्याने कळवत असतात.
मातृछायाच्या अंगणांतला पाळणा प्रत्येक बाळाचे स्वागत करण्यास नेहमीच आतुर असतो, तरीही काही लोक बाळाला झाडेझुडुपात, तर काही बैग मध्ये, मरण्यासाठी सोडून का जातात? आणि मग अश्या बाळांचा जीव वाचवणे मातृछायाच्या टीम साठी कठीण होऊन जाते।
मातृछाया परिवाराचा हा प्रश्न समाजाची विसंगति दाखवणारा आहे ज्याच उत्तर अद्याप तरी मिळालं नाही।
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।