नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
देविदास देशपांडे | महाराष्ट्र
हनुमान मंदिराच्या दारात आपल्या दोन छोट्या भावा-बहिणींसोबत ती थंडीची रात्रही रेखाने तिला घेण्यासाठी काही भली माणसे आली नसती तर कदाचित कंबळ न घेता व उपाशीपोटी घालवली असती. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील किनवटजवळ पाटोदा नावाचे एक छोटे खेडे आहे. तेथे रेखा आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. पारधी जमातीच्या या कुटुंबाचा व्यवसायच चोरी, दरोडा किंवा लूटालूट होता. पारधीच कशाला, डोंबारी, कोल्हाटी, गोंधी अशा काही जमाती गुन्हेगार मानल्या जातात. त्यामुळेच रेखाचे आईवडील वारले तेव्हा या मुलांना स्वीकारण्यासाठी नातेवाईक किंवा समाज यांपैकी कुणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही.
मात्र, आज सर्व काही बदलले आहे. रेखाने बुद्धिबळात राज्य पातळीवर यश मिळवले आहे. रेखा आज मुंबईतील फोर्टिज रुग्णालयात काम करत असून तिच्या छोट्या भावाने, अर्जुनने, इयत्ता 10 वीत 85 टक्के मार्क मिळवले आहेत. रेखा व अर्जुन प्रमाणेच 350 मुले-मुली भटके विमुक्त विकास परिषदेच्या शाळेत शिकून खेळ, अभिनय इ. सर्व क्षेत्रांत उत्तम कामगिरी करत आहेत. गेल्या 25 वर्षांपासून परिषदेचे कार्यकर्ते या भटक्या जमातीच्या मुलांवर मेहनत घेत आहेत.
संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी प्रचारक गिरीश प्रभुणे यांच्या प्रयत्नांतून 23 ऑगस्ट 1993 रोजी यमगरवाडी येथे विहिरीजवळ झाड कापून उभारलेल्या एका झोपडीत सहा मुलांच्या या वसतिगृहाची सुरूवात झाली. समाजाचे सहकार्य आणि महादेव गायकवाड, चंद्रकांत गाडेकर व रावसाहेब कुलकर्णी यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची मेहनत फळाला आली आणि आज संस्थेकडे आपले स्वतःचे वसतिगृह आहे. केवळ इतकेच नाही, तर एक शाळासुद्धा आहे. तिथे मुलांना शिक्षणासोबतच व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाते
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असलेले, व संघाच्या कार्यकर्त्यांनी या गुन्हेगार मानल्या गेलेल्या भटके विमुक्त मुलांसाठी उभी केलेली यमगरवाडी, आता संपूर्ण देशात या अनोख्या सेवाकार्यासाठी ओळखली जाते. ज्या भागात हत्या व लुटालुटीच्या कोणत्याही घटनेबाबत पोलिस सर्वांत आधी पारधी व कोळी समाजाच्या लोकांना उचलून नेत असत, तिथे आज या कुटुंबांतील 32 मुली वेगवेगळ्या रुग्णालयांत नर्स आहेत. परमेश्वर काळे यांचे आई-वडील याच पारधी समाजातील (जो अशा प्रकारे दर महिन्यांनी वेगळ्या ठिकाणी झोपडी टाकतो आणि नंतर ती जागा सोडून इतरत्र जातो) होते. त्यांच्या मते, ते या वसतिगृहात आले नसते, तर शिक्षण तर दूर, एखाद्या शाळेत त्यांची नावनोंदणीही झाली नसती. आज ते शिक्षक म्हणून स्वतः मुलांना शिकवतही आहेत आणि आपल्या समाजातील मुलांना पुढे आणण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून कामही करत आहेत.
हे सगळे एवढे सोपे नव्हते. रावसाहेब यांच्या म्हणण्यानुसार, येथे येणारी मुले संस्कार व शिस्तीपासून दूर होते. दररोज आंघोळ करण्यास व ब्रश करण्यासही ते आढेवेढे घेत असत. मांस-मासे नसलेले शाकाहारी जेवण त्यांना अजिबात आवडायचे नाही. इतके, की संधी मिळताच ते पळून जात असत. दिवसभर शेळी घेऊन तासनतास जंगलात फिरणाऱ्या आणि गुल्लेरने कबुतरांना मारणाऱ्या मुलांना योग, व्यायाम व मंत्र शिकवणे अत्यंत अवघड होते.
आज तर त्यांच्यासाठी एक वेगळी एकलव्य व्यायामशाळा आहे. तेथे ते नियमितपणे व्यायाम करतात. एक मोठे ग्रंथालय आहे, तेथे ते रेल्वे, बँक इत्यादी परीक्षांची तयारी करतात. आपल्या आवडीनिवडीनुसार मुलांना प्लम्बर, इलेक्ट्रिशियन इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. येथील मुलांचे सायंस मॉडेल दर वर्षी विज्ञान प्रदर्शनात पहिल्या स्थानी येतात.
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।