नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
महाराष्ट्र
रेल्वे स्टेशन वरील कचरापेटी कडे सतत टक लावून बघत असलेल्या बबलूच्या डोळ्यातील एकदमच वाढलेली चमक बघून असे वाटायचे, कि जणू त्याला कोणता खजिना दिसला असावा, आणि मग तो त्या वाटेने धावत जायचा, व कचरा पेटीतील पाण्याच्या बॉटल व इतर वस्तू निवडू लागायचा। आपली भूख भागवण्या साठी बबलू ह्या कचरा पेटी वरच अवलंबून होता। 12 वर्षाच्या बबलूला घरातून पळून एक महिना होण्यात होता। आता मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशन हेच त्याचे घर होते। इथेच राहायचे व कचरा पेटीतील उष्ट अन्न खाऊन पोट भरायचे, हीच त्याची दिनचर्या असे, पण त्याहून ही वाईट गोष्ट म्हणजे बबलू कफ़ सिरप व स्पिरिट च्या व्यसनात अडकला होता। आई वडिलांचा चिमुरडा बबलू अश्या नरकात आयुष्यभर अडकून राहिला असता, जर त्याच्या वर समतोल च्या कार्यकर्त्यांची नजर पडली नसती। बबलू व त्याच्या सारख्या कितीतरी मुलांचे आयुष्य, प्लॅटफॉर्म च्या अश्या काळोखात हरवून जावू नयेत, म्हणूनच समतोल फॉउंडेशन चे कार्यकर्ता अतोनात प्रयत्न करून, अश्या मुंलांना त्यांच्या घरी परत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत।
संघाच्या मदतीने चाललेल्या ह्या संस्थेच्या प्रयत्नाने आता पर्यंत जवळ जवळ 8000 मुलांना त्यांच्या स्वतः च्या घरी परत पोहोचवण्यात आले आहे। विजय रामचंद्र जाधव आणि त्यांचे काही समविचारी सहकारी यांनी ज्या वेळेस घाटकोपर मध्ये समतोल ची सुरुवात केली, त्या वेळेस पैसा व जागा ह्या सारख्या अडचणी त्यांच्या समोर आ वासून उभ्या होत्या। त्याच वेळेस ठाणे येथील संघाचे स्वयं सेवक माधव जोशी ह्यांच्याशी झालेली भेट, त्यांना तिथे असलेले प्रांत प्रचारक श्री जयंत सहस्रबुद्दे यांज पर्यंत घेऊन गेली, आणि तेव्हा पासून संघ व समतोल हे दोघे एकत्र येऊन काम करू लागले।
संघाचे आनुशांगिक संगठन "हिंदू सेवा संघ" ह्याने ठाणे जिल्ह्यातील मामणोल गावात मन परिवर्तन शिबिरा साठी एक एकड जमीन दिली। तसेच संघाचे विभाग सहकार्यवाह महेश जी देशपांडे यांनी पश्चिम दादर ला असलेली आपली जमीन समतोल च्या कार्यालया साठी दान केली।
त्याच बरोबर महेश जी च्या सहयोगाने समतोल ला काही ट्रस्टी पण मिळवून दिलेत। मन परिवर्तन शिबिरा साठी, संस्कारमय शिक्षण, योग अणि देशप्रेम वाढविणारी अशी संघानुरूप पद्धति संघाचे प्राथमिक वर्ग शिक्षित विजयजी यानीं निवडली ।
बबलू मध्ये मन परिवर्तन शिबिरा मुळे बदल घडून आला होता पण त्याला ह्या साठी तयार करण्यात व त्याच्या कडून आई वडिलांचे नाव व इतर माहिती काढण्यात समतोल च्या कार्यकर्त्यांना खूप घाम गाळावा लागला। संस्थेच्या सक्रिय कार्यकर्ता सुप्रिया ताईंच्या सांगण्यावरून कळले, कि ह्या मुलांना समतोलच्या वसती गृहात ठेवणे व् त्यानंतर 45 दिवसांच्या शिविरा साठी तयार करणे, फारच कठीण असते। वाईट सवयी व व्यसनांनी झपाटलेल्या या मुलांचा सांभाळ करणे सोपे नाही। हे मुलं खोटं बोलून कार्यकर्त्यांना आपल्या कह्यात आणायचा प्रयन्त करीत असतात। अश्या कितीतरी अडचणींना तोंड देत ह्या मुलांचे मन जिंकणे, आणि मग त्यांना मन परिवर्तन शिबिरात आणणे, गढ जिंकण्या सारखे आहे।
2008 पासून काम करत असलेल्या लक्ष्मी मुकादम यांच्या आठवणीत बबलूची व इतर मुलांच्या कहाणीची नोंद झाली आहेच। तसे त्या पुढे सांगतात कि कसा 15 वर्षाचा सद्दाम मोहम्मद मुंबईच्या प्लेटफॉर्म वर सापडला। सद्दाम उत्तर प्रदेशच्या गाजियाबादहुन पळून मुंबईत आला होता कारण त्याचे वडील त्याला मारहाण करायचे। पांच वर्षे मवाली सारखा राहणारा सद्दाम सिगरेट व तंबाकूच्या नादी लागून व्यसनी झाला होता। अश्याच परिस्थितीत अडकलेला यु पी मधील आजमगढचा 11 वर्षाचा विजय उर्फ मुन्ना समतोल च्या कार्यकर्त्यांना स्टेशन वर सापडला। ह्याच प्रमाणे कामासाठी बिहारहून पळून आलेला 8 वर्षाचा जाहिद असो, किंवा उंच इमारती व विमाना मध्ये बसण्याचे स्वप्न बाळगून आलेले दोन मित्र. वीर आणि शक्ती असो ,ही सगळी मुले समतोलच्या कार्यकर्त्यानां प्लॅटफॉर्मच्या काळोखात आपले जीवन घालवतांना दिसली ।
विजय जी जाधव सांगतात कि समानत्व, ममत्व, देणगी व ध्येयाच्या संयोगाने आयोजित केलेल्या 45 दिवसांच्या मन परिवर्तन शिबिरा नंतर जेंव्हा मुलांना त्यांच्या आई वडिलांशी भेटवण्यात येते, तेंव्हा सगळे दृश्य खुपच भारावलेले असते। सद्दाम ची आई जेंव्हा आपल्या मुलाला भेटली तेंव्हा तिचे आनंदाश्रू थांबत नव्हते, आणि ती सतत समतोल च्या कार्यकर्त्यांचे आभार जाहीर करत आशीर्वाद देत होती। पंचेचाळीस दिवसांच्या वर्गा नंतर त्यांना सांगितलेल्या नैतिक कथा व दिलेले समुपदेश त्यांचे मानसिक बळ वाढवते, त्याच बरोबर खेळ ,योग व संस्कारित जीवन पद्धती, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवते, आणि ही मुलं प्लॅटफॉर्मच्या काळोखातून बाहेर पडून वास्तव जगात वावरण्यास खंभीर पणे उभे असतात।
कधी कधी खूप प्रयत्न करून सुद्धा काही मुलांच्या बाबतीत हवी तेव्हडी माहिती मिळत नसल्याने, अश्या मुलांना घरी पोहोचवणे अशक्य असते। आता पर्यंत अशी 70 मुलं जी घरी परत जाऊ शकली नाहीत, त्यांना त्यांच्या मायबोली प्रमाणे त्या त्या राज्यातल्या संघाच्या शिक्षा प्रकल्पांमध्ये पाठविण्यात आले।
दर महिन्यात सुमारे 100 ते 150 मुलं घरून पळून मुंबईत येतात, अणि समतोल च्या द्रष्टिस पडतात, आणि मग पुन्हा सुरु होतो, प्लॅटफॉर्म वरून घराची वाट दाखवण्याचा समतोल च्या टीम चा प्रवास ।
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।