सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

यशाची नवीन शैली स्वरूपवर्धिनी

महाराष्ट्र

parivartan-img

पुण्यातील बजबजलेल्या वस्त्यांच्या झोपड्यांमध्ये वाढलेला नेत्रहीन चंद्रकांत आज त्याच ब्लाईंड-स्कूलचा प्रिन्सिपल आहे जिथे त्याने शिक्षण घेतले होते. त्याच्याच सारखी कथा संतोषची आहे. मलखांबातील राष्ट्रीय पातळीवरचा खेळाडू आणि पुणे पोलिसात हवालदार असलेल्या संतोषचे बालपणसुद्धा, तो जर स्वरूपवर्धिनीच्या संपर्कात आला नसता तर घोर गरीबी आणि अभावाचे बळी ठरले असते.  इतकंच नाही तर गावातील रूढीवादी वातावरणात मुलींवर असणाऱ्या सगळ्या बंधनांशी सामना करत करत पुण्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये गेल्या 16 वर्षांमधे 3000 मुली परिचारिकांच्या स्वरूपात स्वावलंबी आणि सन्मानजनक जीवन जगत आहेत. पुणे आणि आजूबाजूच्या भागांमध्ये होणारे हे व्यापक सामाजिक परिवर्तन समजून घ्यायचे असेल सेवाभारतीशी संबंधित बहुआयामी प्रकल्प ‘स्व-रूपवर्धिनीला समजून घ्यावे लागेल. संघाचे स्वयंसेवक स्वर्गीय किशाभाऊ पटवर्धन यांनी गरीब व प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे जीवन सावरण्याचे जे स्वप्न 1970 मध्ये स्वरूपवर्धिनीच्या रूपाने पाहिले होते, ते आता 200 क्लास वन व क्लास टू अधिकाऱ्यांच्या रूपाने पूर्ण होताना दिसत आहे.


आता बोलूया चंद्रकांत भोसलेंबाबत. अंध असल्यामुळे तो स्व-रूपवर्धिनी शैक्षणिक शाखेतही जाऊ शकत नव्हता आणि शाळेतही जाऊ शकत नव्हता. त्याचे शिक्षण सुरु करण्यासाठी स्व. किशाभाऊजी यांच्या प्रेरणेने नि;शुल्क कोचिंग सेंटरमध्ये येणाऱ्या 11वीच्या एका हुशार विद्यार्थ्याने रिकाम्या वेळेत भीमनगर वस्तीत जाऊन चंद्रकांत ला शिकवण्यास सुरुवात केली , तो दिवस चंद्रकांत आजही विसरलेला नाही. काही वर्षे शिकवल्यावर विश्वासच्या मेहनतीला फळ आले, आणि चंद्रकांत 70% गुणांनी मॅट्रिकमध्ये उत्तीर्ण झाला. आपले इंजीनियरिंगचे शिक्षण चालू असतानासुद्धा विश्वासने चंद्रकांतला शिकविणे चालू ठेवले. यानंतर चंद्रकांतने मागे वळून पाहिले नाही. तो बी.ए व मग एम.ए आणि बी.एड करून त्याच  ब्लाईंड-स्कूलचा प्रिन्सिपाल झाला, जिथे तो कधी विद्यार्थी होता. 

तसाच सेवावास्तीतील अत्यंत खोडकर संतोष, त्याला शिक्षणापेक्षा खेळांमध्ये जास्त रस होता. एका क्रीडा शिबिराच्या वेळेस वर्धिनीच्या कार्यकर्त्यांची नजर त्याच्यावर पडली. त्यांना संतोषमध्ये एक चांगला खेळाडू होण्याची पूर्ण शक्यता दिसली. वर्धिनीने त्याच्या शुल्क इत्यादीचा खर्च करत त्याला एका दर्जेदार क्रीडा अकादमीत प्रवेश घेऊन दिला. आज संतोष अखिल भारतीय पातळीवरचा मल्लखांब खेळाडू आहे आणि महाराष्ट्र पोलिसात भरती होऊन आपल्या विभागाचे नाव वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये उंचावत आहे. ही तर केवळ एक वानगी झाली. चंद्रकांत, विश्वास आणि संतोष यांच्यासारखे शेकडो बालक आहेत, जे वर्धिनीच्या संपर्कात आले आणि आज समाजासाठी एक उदाहरण बनले आहेत.

स्व-रूपवर्धिनीचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय सेवा भारतीच्या केंद्रीय गटातील सदस्य शिरीष पटवर्धन सांगतात, की पुण्यातील सेवावास्ती भागांमध्ये राहणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना शोधून त्यांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्याचे लक्ष्य बाळगत 1979 साली हा प्रकल्प अस्तित्वात आला. अत्यंत छोट्या उपक्रमाच्या रूपात सुरु झालेल्या  या प्रकल्पाला आज एक विस्तृत आयाम मिळाला आहे. शिरीषजींच्या म्हणण्यानुसार, वर्धिनीच्या माध्यमातून राज्य पातळीवरच्या स्पर्धा परीक्षांसाठी किमान शुल्क घेऊन चालवण्यात येणाऱ्या कोचिंग सेंटरमधून अभ्यास करून 200 पेक्षा जास्त निर्धन मुले आता क्लास वन किंवा क्लास टू अधिकारी बनले आहेत.
 

दुसरीकडे गावोगावी जाऊन मुलांना विज्ञानाचे प्रयोग दाखवून विज्ञानात रस निर्माण करणारी मोबाईल प्रयोगशाळा. मागील 17 वर्षांपासून चालू असलेल्या या प्रयोगशाळेने सुमारे 100 गावांतील हजारो मुलांमध्ये विज्ञानाबद्दलची ओढ़ अणि चिकित्सक दृष्टी विकसित केली आहे. याशिवाय महिला स्वावलंबन केंद्र, काऊंसलिंग सेंटर, पाकोळी मोंटेसरी स्कूल आणि कौशल्य विकासाचे अनेक आयाम आज या प्रकल्पाच्या माध्यमातून चालू आहेत.

1031 Views
अगली कहानी