सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

मी तुळस तुझ्या अंगणी

कर्नाटक

parivartan-img

घोड्यावर बसून येणाऱ्या स्वप्नातल्या राजकुमाराशी विवाह ठरल्यावर प्रत्येक मुलगी संसाराची सोनेरी स्वप्ने रंगवते, परंतु ती स्वप्नें  सत्यांत उतरण्याआधीच धुळीला मिळण्याचा योग काहींच्या नशिबी येतो. पुन्हा त्याच चाकोरीत जाऊन दुसऱ्या कुणाच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवावी, तर तिथेही पदरी निराशा! अशा क्रूर आघाताने कुटुंबाचा भरभक्कम पाठिंबा असलेल्या मुली देखिल  निराशेच्या गर्तेत जातात, मग असे प्रसंग ओढवलेली सुनिता (बदललेले नाव) तर अनाथ, पोरकी होती पण हार न मानता परिस्थितीशी दोन हात करत ती लढली, आणि आज अमेरिकेत पति व मुलीसह सुखाने संसार करते आहे. मनिषा  (बदललेले नाव) ही तर दुसरी "निर्भयाच" होती फरक इतकाच की तिला मारून टाकले नव्हते. मात्र  कुमारी मातृत्व लादले गेल्यामुळे समाजाकडून रोजच अवहेलनेचे मरण ती अनुभवत होती. कोणाशी बोलण नाही, कशालाही प्रतिसाद नाही, सतत शून्यात नजर! नैराश्यात खोल बुडालेली! पण आज ती तिला आसरा देणाऱ्या अबलाश्रमात आत्मविश्वासाने कार्यालयीन कामांत मग्न असतें. ही दोन  वानगीदाखल उदाहरणे झाली.अशा कितीतरी सुनिता,गीता,मनिषा,कल्पना,विमल,आशा ताठ मानेने उभ्या आहेत कारण त्यांच्यामागे संघाच्या स्वयंसेवकांनी चालविलेला बंगळुरूच्या बसवनगुडी नगर येथे असलेला अबलाश्रम पहाडासारखा उभा आहे. 




 

१२० वर्षांपूर्वी म्हणजे सन १९०५ मध्यें आर्यसमाजी असलेले तरुण,उत्साही व तडफदार असें  चक्रवर्ती वेंकट वरदा आयंगार ह्यांनी प्रथमत: विधवांच्या पुनर्वसनासाठी ह्या आश्रमाची पायाभरणी केली. परंतु येथेच न थांबता स्वत: विधवा विवाह करून त्यांनी समाजापुढे आदर्श ठेवला. त्याकाळी हे मोठे धाडसच होते. नंतर संस्थेमध्यें विधवांसमवेत अनाथ, परित्यक्ता, निराधार अशा स्त्रियांना आधारमिळू लागला आणि अबलाश्रमाच्या रूपाने आज  हा वटवृक्ष कर्नाटकात छाया देत उभा आहे.

 

आज बसवनगुडी नगरचे संघचालक आणि अबलाश्रमाच्या सचिवपदाची धुरा समर्थपणे संभाळणारे श्रीयुत बी. बी. शेषाजी, अगदी पहिल्यांदा आश्रमात आले तेंव्हा संघाचे कार्य पाहून इतके प्रभावित झाले, की ते आश्रमाचेच होऊन गेले. या आश्रमाचे वेगळेपण सांगताना ते म्हणतात की येथे फक्त १६ ते २५ वयोगटातील मुलींनाच प्रवेश दिला जातो. याची कारणमीमांसा करताना श्री. शेषाजी सांगतात लहान बालिकांना वाढिवणें  त्यामानानें  सोपें असते, कारण लहान बालिका म्हणजे ओल्या मातीचा गोळा असतो, आणि त्याला आकार देऊन घडविणें शक्य असतें. संस्कारक्षम वय असल्यामुळें आपण देऊ तें  आत्मसात केलें जातें.  दुसरें महत्वाचे म्हणजे युवावस्थेतील मुलींची जबाबदारी घ्यावयाला कोणी तयार नसतें. कारण किशोरावस्था तें युवावस्था हा प्रवास अतिशय नाजूक असतो. तिथे खरी कसोटी असतें. ह्या  अनाथ, असहाय्य, दुर्बळ व  मनानें खचलेल्या स्त्रियांना हवी असतें, ती आईची ममता, आईचें प्रेम आणि वडिलांचा भक्कम आधार! ह्या दोन्ही उणीवा संघ स्वयंसेवक आणि स्वयंसेविका समर्पित वृत्तीने भरून काढतात, त्यांच्यावर सुसंस्कार करतात,  देशप्रेम जागिवतांत आणि सुसंस्कृत नागरिक घडिवतांत. 

 

आज अशा शेकडो गीता, मनिषा, सुनिता आहेत की ज्या अतिशय भेदरलेल्या अवस्थेत आश्रमात आल्या, परंतु माता-पित्याचे प्रेम आणि संस्कार लाभल्यामुळे जणूं  खाली ठेवलेली शस्त्रे हाती घेऊन त्या परिस्थितीशी खंबीरपणें लढल्या. गीता सातासमुद्रापार गेली,  मनिषा ऑफिस संभाळते आहे. दोन पोरक्या सख्या बहिणीच्या पैकी  रश्मी प्रख्यात होमिओपॅथी डॉक्टर आहे, तर राम्या बायोटेकनोलोजीचे शिक्षण घेउन एका बहुराष्ट्रीय कम्पनी मधे मोठ्या पदाची जबाबदारी समर्थपणे पेलते आहे. अनेकजणी वनवासी दुर्गम भागांत कार्य करत आहेत. इथल्या मुली घरच्या सुना म्हणून केव्हां कुठल्याही व्यवसायाच्या जबाबदारीच्या पदावर अधिकारी म्हणून स्वत:ला सिद्ध करीत आहेत. या मुलीना घडविण्यासाठी शिक्षणा बरोबरच त्यानां व्यावसायिक प्रशिक्षण सुद्धा दिले जाते, याच बरोबर त्यांच्या योग्यते प्रमाणे नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन अणि प्रयत्न ही केले जातात.  

          

संस्कृती,सहायता, स्वाभिमान, सेवावृत्ती, समन्वय आणि मुख्य म्हणजे आत्मसन्मान ह्या  पायांवर उभ्या असलेल्या आश्रमातील सुसंस्कारीत मुलींसाठी चांगल्या, संपन्न आणि कुलीन अशा नामवंत घरांमधून लग्नासाठी मागणी येतें, ह्यापेक्षा दुसरी पावती ती काय असू शकेलअर्थात्  हे सर्व शक्य होतय कारण ह्या कार्यासाठी संघाचे कार्यकर्ते सेवाभावी, अणि निरालस वृत्तीने वर्षानुवर्षे काम करीत आहेत.

1287 Views
अगली कहानी