सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

धैर्याची वाटचाल

गोवा

parivartan-img

सगळ्यांच्या नजरा टीव्हीच्या पडद्यावर खिळल्या होत्या. 1000 मीटर रोलर स्केटिंग स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात येणार होता. वर्ल्ड समर गेम्स 2015, लॉस एंजेलेस येथे सुवर्ण पदाकासाठी 14 वर्षिय कुशल रेशमचे  नाव घोषित करण्यात आले आणि केशव सेवा साधना येथे सर्व लोक आनंदाने उड्या मारू लागले. गोव्यातील डीचोली येथे  संघाच्या सहकार्याने मतिमंद मुलांसाठी चालणाऱ्या ह्या विशेष शाळेतील सेवाभावी कार्यकर्त्यांसाठी कुशलचे सुवर्ण पदक म्हणजे एका कठीण परीक्षेची  सुखकारक सांगता होती.




संस्थेचे सचिव आणि संघाचे विभाग संचालक नानाजी बेहरे सांगतात की जेंव्हा मुले येथे आली तेंव्हा ईजा होईल ह्या भीतीने मुलांचे पालक त्यांना खेळू देण्यासाठी सुद्धा तयार नव्हते. स्केटिंग सारख्या धोकादायक स्पर्धेसाठी कोचकडून ट्रेनिंग देणे, आणि मग मुलांना परदेशात खेळण्याकरता पाठवण्याची परवानगी मिळवणे खूपच कठीण होते. कुशलचा हा विजयाचा प्रवास मात्र येथेच थांबला नाही. ह्या प्रतिभाशाली पोराने ह्याच समर गेम्स मध्ये 200 x 2  मीटर (रीले) मध्ये सुवर्ण, आणि 300 मीटर मध्ये कांस्य पदक जिंकले. ह्याच शाळेतील 13 वर्षाच्या रीया गावड़ेने 1000 मीटर आणि 300 मीटर रिंक आणि रिले रेसमध्ये रौप्य, 100 x 2 मीटर( रिले) स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आणि त्याचबरोबर शाळेतील उर्मिला परब नावाच्या आणखीन एका मुलीने 300 मीटर रोलर स्केटिंगमध्ये कांस्य पदक जिंकले. ह्या विजयाचा  आणि त्या नंतरच्या आनंदाचा  जितका हक्क मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा होता तितकाच त्यांचे कोच प्रेमानंद नाईक आणि संस्थेतील त्या सर्व समर्पित कार्यकर्त्यांचाही होता, ज्यांनी मुलांचे आत्मबळ आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली  होती. 

संस्थेने गोव्यामध्ये सेवा कार्याची सुरुवात दुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या गरीब मुलांना वसतिगृहात ठेऊन शिक्षण देण्यासाठी केली  होती. परंतू 2004 मध्ये संस्थेच्या नियमीत सर्वेक्षणांत असें लक्षात आले की, केवळ डिचोली मध्येच 300 मतिमंद मुले आहेत आणि त्यांच्याकरिता एकही शाळा नाही. तेंव्हा त्या मुलांच्या पालकांच्या विनंतिवरून प्रथम 2004 साली डिचोली येथे आणि 2011 साली वाल्पोंई येथे विशेष शाळेची स्थापना करण्यात आली. आज ह्या दोन्ही शाळांमध्ये मिळून जवळजवळ 160 मुले शिक्षण घेत आहेत. अभ्यास आणि खेळासोबतच येथे मुलांना राख्या बनवणे, दीवे बनवणे, पेपर आर्ट अशा अनेक कला शिकवल्या जात आहेत. अशा  विविध कलांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या विभा अजित काणेकर ह्या मुलीला  2010  साली बालश्री पुरस्कार मिळाला. 

केशव सेवा साधना येथे अनेक वर्षें  मुलांना फिजियो थेरपी देत असलेल्या डॉक्टर लॉरेन्स सल्डाना म्हणतात की जे ह्या मुलांना दुर्बल समजतात त्यांना कदाचित ह्यांच्या क्षमतेची पारखच नाही. त्यांचे म्हणणे आहे की, ह्या मुलांमध्ये अनन्य साधारण क्षमता आहे फक्त त्यांना मार्ग दाखवण्याची गरज आहे, आणि हेच काम केशव साधना सेवा, गोवा.  ही संस्था करत आहे.  त्या  म्हणतात खालील ओळी  ह्या मुलांकरीता अगदी योग्य व सार्थक आहेत.

“धारदार कात्र्या आम्हाला रोखतील कशा, आम्ही पंखाने नाही तर धैर्याने उडतो”

1052 Views
अगली कहानी