सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

जीवनाला दिले नविन वळण

सौ प्रगती शीरपूरकर | जम्मू-काश्मीर

parivartan-img

लद्दाखच्या रम्य दर्यां मध्ये जेव्हा २०१० साली ढग कोसळले तेव्हा बऱ्याच लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले। नीरज पण ह्या अपघाताला बळी पडला, व त्याचे सुख ,आनंद सगळे काही त्याच्यापासून हेरावून गेले होते । ह्या दुःखाचा ठसा नीरजच्या आयुष्यावर नेहमी साठी उमटला असता, जर सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांनी नीरजला छात्रावासात आणले नसते। नीरज ह्या अपघातांच्या आठवणी सुद्धा टाळतो व त्यांच्याकडे मागे वळून बघत नाही। राष्ट्रीय पातळीवर खेळून आलेल्या ह्या हुशार मुलाला दहावीमध्ये गणितात शंभर टक्के गुण मिळाले। नीरज सारख्या आणखी ३६ मुलांच्या आयुष्याला वेलजी विश्राम पोपट दिशा छात्रावास यशस्वी वळणावर घेऊन गेले आहे। इथे शिकणाऱ्या मुलांमध्ये बहुसंख्य अशी मुले आहेत ज्यांची कुटुंबे दहशतवादी हल्ल्यात बळी पडली होती । संघाचे प्रचारक व राष्ट्रीय सेवाभारती उत्तर क्षेत्राचे संघटन मंत्री जयदेवजींच्या प्रयत्नाने २००५ मध्ये २ खोल्यांनी अणि ९ मुलांपासून ह्या छात्रावासाचा श्रीगणेश झाला । सध्या इथे मुलांना शाळेय शिक्षणाबरोबरच ड्रॉईंग , संगीत ,कॅम्पुटर अश्या इतर विषयातही पारंगत करण्यात येते।




जेव्हां १३ वर्षापूर्वी दिशा छात्रावासचा श्रीगणेश झाला तेव्हा सेवाभारती जवळ पायाभूत गोष्टी व कोणाची मदत पण नव्हती । अश्या विषम आर्थिक परिस्थितीत मुलांचे शाळेचे व जेवणाचे खर्च काढण्यात सुद्धा कार्यकर्त्यांची तारांबळ व्हायची । त्यावेळीच बोस्टन मध्ये राहणारे नरेंद्र पोपट मदतीस पुढे आले, व त्यांनी आपले वडील वेलजी विश्राम पोपट ह्यांच्या स्मुतीप्रित्यर्थ २२ लाख रुपये ह्या प्रकल्पासाठी देणगी म्हणून दिले।

जम्मू काश्मीर सेवाभारतीच्या अध्यक्षा अनुष्या खोसा सांगतात, कि इथे मुलांना शिक्षणा सोबत संस्कार व कडक शिस्त पण शिकवण्यात येते। बागेतील कामे असो, वा छात्रावासा चे प्रबंधन, सगळी कामे येथील मुले फार चोखपणे पार पाडतात। सध्या छात्रावासाजवळ ५ खोल्या , १ कॉम्पुटर रूम ,४ गेस्टरूम व प्रार्थनेसाठी हॉल आहे, जिथे सगळी मुलं सोबत अभ्यास करतात। मोठी मुलं आपापल्या आवडी प्रमाणे कौशल विकास कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या इलेकट्रिशिअन , सुतार , जैविकशेती सारखी कामे पण शिकत आहेत।

त्रिकूटा पर्वत श्रेणी जिथे साक्षात वैष्णो देवीच मंदिर आहे, त्याच्या पायथ्याशी असलेल्या  कडमाळ गांवात पाण्याची खुपच टंचाई आहे । ३०० फूटापर्यंत खोदूनही पुरेसे पाणी मिळत नव्हत , अश्या ठिकाणी छात्रावास प्रबंधकांनी पारंपरिक उपाय अंगीकृत करून नेहमी साठी हा प्रश्न सोडवला, व त्याच बरोबर पाण्याच्या टँकर्सवर होणारा खर्चही वाचवला। जलप्रबंधनासाठी बनवलेल्या पाण्याच्या तीन टाक्यांनी उन्हाळ्यातही हॅन्डपम्पला भरपूर पाणी येते । पाण्याच्या  प्रत्येक थेंबाचा उपयोग व्हावा, म्हणून कपडे अणि भांडे धुण्याचे पाणी, बागेच्या सिंचना करीता वापरले जावे अशी सोय करुन घेतली आहे।

नैसर्गिक आपदा व दहशतवाद ह्यांच्याशी लढा देणाऱ्या जम्मू काश्मीर साठी दिशा प्रकल्पा सारखे प्रकल्प आशेचा नवा प्रकाश घेऊन येणारे ठरले आहे।

943 Views
अगली कहानी