सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

आम्ही ही जिंकणारच

पश्चिम बंगाल

parivartan-img

रीता करमाकर, रूमा हजारा, आणि रुकसाना खातून या तिघिंची पार्श्वभूमी वेगवेगळी असली, तरी त्यांनी जे यश मिळवले त्यात एक विलक्षण सारखेपणा आहे। एकाच सेवा रुपी शाईने त्यांची ही यशोगाथा लिहिली गेली आहे, जी पश्चिम बंगाल मधील अनेक मागास गावांमधील हजारो भगिनींना प्रेरणा देत आहे।

पश्चिम बंगालमध्ये सेवा भारतीशी संलग्न विवेकानंद परिषद द्वारे अनेक व्यवसायिक प्रशिक्षण वर्गशाळा चालवण्यात येतात। रिता, रोमा आणि आणि रुखसानाने तेथेच प्रशिक्षण घेऊन आपल्या जीवनात परिवर्तन अडवून आणले आहे । रीता झारखंडमध्ये सरकारी नोकरी करत आहे, रोमा बुटिक  चालवते आहे, तर रुखसाना ही परिषद द्वारे चालवण्यात  येणाऱ्या एका प्रशिक्षण संस्थेत अध्यापनाचे कार्य करत आहे।




कोलकाता पासून २१४ कि. मी. दूर असलेले आसनसोल जिल्ह्यातील इच्छापुर हे गाव, अति मागास विभागात येते । त्या गावात विवेकानंद विकास परिषद द्वारे ६ प्रशिक्षण केंद्रे, १० बालसंस्कार केंद्र, ३ विनामूल्य औषधालये, २ न्यूरोपैथी सेंटर्स,  ५ महिला बचत गट आणि अनेक व्यवसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवण्यात येतात। विवेकानंद विकास परिषदेची ची स्थापना १९८९ साली तत्कालीन जिल्हा संघचालक कै. मलय राव यांच्या प्रयत्नांनी करण्यात आली। तेव्हापासून संस्थेने ग्रामविकासाच्या क्षेत्रात अभिमानास्पद कार्य केले आहे । परिषदेच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे आतापर्यंत ग्रामीण भागातील 200 महिला आर्थिक दृष्टीने स्वावलंबी झाल्या आहेत। संगणक वर्गांमधील विद्यार्थ्यांनी विविध उद्योगांमध्ये चांगल्या नोकरया मिळवल्या आहेत, अशी माहिती, पश्चिम बंगाल प्रांताचे सेवा प्रमुख मनोज दा यांनी दिली आहे।

सेवा भारतीच्या माँ शारदा ग्राम विकास समितीने तारकेश्वर जिल्ह्यातील तेजपूर या  गावाचा जणू काही कायापालटच घडवून आणला आहे। संस्थेतर्फे पाचवी ते आठवी पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य प्रशिक्षण वर्ग, डॉक्टर हेडगेवार धर्मादाय दवाखाना, पुस्तक पेढी, धर्मजागरण केंद्र, मां शारदा भगिनी मंडल आणि महिला बचत गट इत्यादि प्रकल्पांमुळे तेजपूर गावाचा सर्वांगीण विकास घडवून त्या गावाला आदर्श गावाचा दर्जा मिळवून दिला आहे। याच प्रमाणे पैली या नदीच्या किनाऱ्यावरील पिचखली या अत्यंत मागास गावाचे ही रंग-रूप पालटण्यात आले आहे। सुंदरबन जिल्हा सेवा सह प्रमुख श्री सृजन हजारे यांनी या गावात सेवाकार्य करण्यासाठी आधी स्वतः होमियोपैथीचा अभ्यास केला , आणि नंतर पिचखली या गावात होमिओपॅथीचा विनामूल्य दवाखाना सुरू केला। आता त्या भागातील एक प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर श्री गोपाल हेही महिन्यातून एक दिवस येथे येऊन गरीबांबर विनामूल्य उपचार करू लागले आहेत । माँ अन्नपूर्णा ग्राम विकास समिती द्वारे तेथे महिला-शिशु संस्कार वर्ग, पुस्तकालय, भजनी मंडळ आणि गांडूळ खत प्रशिक्षण केंद्र ही चालवण्यात येते । संघ स्वयंसेवकांनी केलेल्या प्रयत्नामुळे जेमतेम 800 एवढीच लोकसंख्या असलेल्या या गावात 250 कुटुंबांनी, ग्राम पंचायतीच्या मदतीने पक्के संडास आपल्या घरांमध्ये बांधून घेतले आहेत। ह्या सर्व प्रकल्पांमुळे पिचखली हे गाव सुद्धा आदर्श गाव म्हणून प्रस्थापित झाले आहे।

953 Views
अगली कहानी