सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

आपले हक्काचे घर हक्काचा निवारा

मध्यप्रदेश

parivartan-img

ही गोष्ट आहे, मध्य प्रदेशातील माळवा भागातील भटक्या पारधी समाजातील परिवर्तनाची प्रगतीची. याच समाजातील शरीराने अपंग असलेला विक्रम, त्याची पत्नी, आणि त्यांची तीन कच्चीबच्ची उकीरडयावर प्लास्टिकचा कचरा आणी बाटल्या वेचून कसेबसे आपले पोट भरत होते. धूळ भरलेल्या लक्तरांनी आपले अंग कसेबसे झाकणारी दहा वर्षांची चिमुरडी गीता, सामोसे विकणारया एका हातगाड़ी जवळ ऊभी राहून सामोसे खाणान्या लोकांकडे आशाळभूतपणे बघत अभी होती, तिला सामोसे कुठून मिळणार. शेवटी वैफल्याने चिडीला येवून तिने एकाएकी एका ग्राहकाच्या प्लेटमध्ये धूळ टाकली. त्या माणसाने संतापाने गीताच्या गालफडावर एक चपराक ठेवून दिली ,आणी प्लेटमधील सामोसे कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला. तोच सामोसे गीताने (नावात बदल केला आहे ) उचलून खाल्ला, तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा तिने सामोसाच्यी चव बघितली. असे ती वारंवार करू लागली. 




हा काही काल्पनिक प्रसंग नाही तर मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातील पारधी समाजातील लोकांच्या दुरावस्थेची कल्पना देणारा एक ओझरता देखावा होता. गावोगाव भटकंती करत, प्लास्टिकचा कचरा गोळा करून त्यावर जगणारा, ना हाताला काम ना डोक्यावर छप्पर, ना समाजात कसलेही स्थान, असे अत्यंत ओढ़गस्तीचे जीवन जगणारा असा हा पारधी समाज! त्यांच्या विकासाकरता रा.स्व.संघाचे सेवाभावी कार्यकर्ते निस्वार्थभावाने पुढे सरसावले. त्यांनी भटके समाज संघटना स्थापन करून 50 पारधी कुटुंबासांठी काम सुरू केले. या संघटनेचे माळवा प्रांत प्रमुख श्री रवि बुंदेला सांगतात की या पारधी लोकांकड़े कोणतीही ओळखपत्रे व अन्य कागदपत्रे नव्हती, त्यामुळे त्यांना कुठल्याही सरकारी योजनेचा फायदा मिळत नसे. संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांना आधार कार्ड आणि शिधापत्रिका मिळवून दिल्या, त्यामुळे सरकार दरबारी प्रथमच त्यांची नोंद झाली. नंतर त्यांना मनरेगा आणि ग्रामपंचायतीच्या योजनेखाली मजूर ओळख पत्र मिळवून दिले, त्यामुळे या पारधी बांधवांना सरकारी दरानुसार मजुरी मिळू लागली.




नंतर स्वयंसेवकांनी पारधी  कुटुंबांमधील मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिला. पण या सर्वांवर कळस चढला, तो प्रधानमंत्री आवास योजनेमुळे. या योजनेखाली सर्वच्या सर्व 50 पारधी कुटुंबांना स्वतःच्या हक्काची घरं मिळवून देण्यात आली, पिढ्यानपिढ्या सतत भटकंती करत जगणाऱ्या या वंचित बांधवांना त्यांचे स्वतः चे असे घर मिळणे ही एक क्रांतीच होती. पण हे सर्व सहजासहजी झाले नाही,त्यामागे संघ स्वयंसेवकांची सचोटी, निरपेक्ष सेवा भावना, अपार परिश्रम, आणि चिकाटी यांची ताकद होती। भटके समाज संघटनेचे आगर माळवा येथील जिल्हा संयोजक श्री हर्ष तिवारी सांगतात की कित्येक पिढ्या सर्व समाजाकडून तिरस्काराची आणि तुच्छतेची वागणुक मिळाल्या मुळे, पारधी लोकांच्या मनात इतरांविषयी अविश्वास आणि संशयाची गडद भावना होती, त्यामुळे ते सुरुवातीला संघाच्या स्वयंसेवकांवरही विश्वास ठेवायला तयार नव्हते, त्यामुळे मोठ्या प्रयत्नांनी सुरू केलेले बालसंस्कार केंद्रही तीन वेळा बंद पडले।




पण संघ स्वयंसेवकांनी अतिशय चिकाटीने संयमपूर्वक पारधी बांधवांच्या विश्वास संपादन केला, आणि त्यातूनच या समाजात विकासाचे प्रकाश पर्व उदयाला आले. कालबेलिया, पारधी गाडोलिया,  इत्यादी विविध उपजातींनी बनलेला हा भटका समाज आता आत्मविश्वासाने परिपूर्ण असे सुखी-समाधानी आयुष्य जगत आहे. त्यांची लहान लहान  मुले  ऐटीत गणवेश घालून शाळेत जावू लागली आहेत। आणि या बांधवाच्या मनाची श्रीमंती एवढी मोठी आहे की कोरोनाच्या संकटकाळात संघाचे स्वयंसेवक त्यांच्यासाठी मदत घेऊन गेले, तर त्यांनी ती मदत तर स्वीकारली नाहीच, उलट त्यांच्यातील काही तरुण मदत कार्यात संघ स्वयंसेवकांच्या खाद्याला खांदा लावून उभे राहिले। परिवर्तन परिवर्तन म्हणतात ते यापेक्षा वेगळे का्य असेल ।

संपर्क :श्री रवी बुंदेला

8770119986

723 Views
अगली कहानी