सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

आनंदपूर भाली युवा शक्तीचे अद्वितीय प्रतीक

भालचंद्र जोशी | हरियाणा

parivartan-img

आनंदपूर भाली, हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील हे गाव - तेथे राजकारणातील वैरभावनेने सर्व वातावरण विषारी झाले होते, गावातील सर्व तरुण या ना त्या कारणाने पोलीस चौवकी आणि  तुरुंगाच्या वाऱ्या करत होते,  बस मध्ये त्यांना प्रवेश देण्यास बसचे वाहक नाखूष असत , आणि प्रवेश दिलाच तरी त्यांना तिकीट काढायला सांगायची त्यांना हिम्मत होत नसे । पण आता तिथल्याच काही तरुणांच्या प्रयत्नांमुळे गावचे चित्र पालटले आहे । गावाच्या मध्यभागी केशव भवन हि तिमजली देखणी वास्तू  उभी राहिली आहे । तेथे तक्षशीला विद्या मंदिर , आर्यभट्ट अध्ययन केंद्र , लेफ्टिनेंट अतुल पवार संगणक केंद्र , हुतात्मा पायलट संदीप पलडवाल वाचनालय असे विविध विधायक उपक्रम चालू आहेत । या परिवर्तनाचे श्रेय प्रामुख्याने रा, स्व , संघाचे हरियाणा सह प्रांत ग्राम विकास प्रमुख, श्री अनूप सिंह आणि त्यांच्या सहकार्यांना द्यावे लागेल.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने आणि सेवा भारतीच्या सहकार्याने त्यांनी हे परिवर्तन घडवून आणले ।



या सेवायात्रेचा प्रारंभ गावातील वडीलधाऱ्यांच्या चौपाल बैठकांमध्ये वर्तमानपत्रे टाकण्या पासून झाला । नंतर ‘हुतात्मा चंद्रशेखर आजाद सेवा समिती ‘ स्थापन करण्यात आली । गावातील वेगवेगळ्या गरजा लक्ष्यात घेऊन सेवा कार्याचे वेगवेगळे उपक्रम वेळोवेळी सुरु करण्यात आले अशी माहिती प्रांत सेवा प्रमुख श्रीकृष्ण कुमार यांनी दिली। ६ वर्षां पूर्वी इयत्ता तिसरी ते बारावीतील मुलांसाठी विवेकानंद संस्कार केंद्र सुरु करण्यात आले। त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलामुलींसाठी एक वातानुकूलित अभ्यासिका उभारण्यात आली, तेथे गड्डी, खेडी, बनियान ,डोभ इत्यादी आसपासच्या गावातील तरुण सुद्धा अभ्यासासाठी येतात।





हुतात्मा पायलट संदीप पडलवाल ग्रंथालयात ५ हजार पुस्तके असून त्याचा लाभ गावातील सर्व मुलामुलींना होतो। या ग्रंथालयात सर्व प्रमुख वर्तमानपत्रे आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सर्व नियतकालिकेही येतात । सध्या बरेली या स्थानकावर स्टेशन मास्टर म्हणून काम करत असलेले श्री मोनू रोज असोत वा CISF मधले सब इंस्पेक्टर सुनीत रोज असोत, या सर्वांच्या यशामधे अध्ययन केंद्राचा मानाचा वाटा आहे. अध्ययन केंद्राच्या यशाचे मोजमाप या गोष्टी वरुन करता येइल की तक्षशिला अध्ययन केंद्रात स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण घेऊन यशस्वी झालेले ४८ तरुण आज शासनामध्ये विविध अधिकार पदांवर काम करीत आहेत।





हरियाणातल्या मुलींनी अथेलेटिकस पासून मल्ल विद्या पर्यंत विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्तुंग यश मिळविले आहे । आनंदपूर भाली येथील मुलीही दुर्गा क्रीडा केंद्रात प्रशिक्षकांच्या मार्गदर्शना खाली फुटबॉल व इतर खेळ खेळत असतात । या केंद्रातील निषु, मंजू  व काजल यांच्यासह ५ मुलींची निवड राष्ट्रीय क्रीडा संघात झाली आहे। गावात संघाच्या आणि राष्ट्रसेवीका समितीच्या शाखा आज अनेक वर्षांपासून नियमित पणे चालू आहेत त्यामुळे समरसतेचा भावना दृढ झाली आहे। २३ जानेवारी २०१३ रोजी गावात हुतात्मा सेकंड लेफ्टिनंट अतुल पवार संगणक केंद्र सुरु करण्यात आले त्यासाठी  काही संगणक सेवाभारती या संस्थेने तर काही गावकऱ्यांनी दिले । केशव भवनासाठी जमीनही पंचायत समितीनेच दिली । जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी बलराम किसान सेवा केंद्र सुरु करण्यात आले। त्याद्वारे घरोघर जैविक खते तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते । महिलांसाठी राणी लक्ष्मीबाई शिवण केंद्र आहे त्याद्वारे महिलांसाठी शिवण प्रशिक्षण वर्ग चालवण्यात येतात. या केंद्राचे वैशिष्ट्य असे की एक गटाच्या प्रशिक्षणा नंतर या केंद्राची जागा गावाच्या वेगवेगळ्या भागांमधे हलवली जाते त्यामुळे त्या त्या भागाच्या महिलानां प्रशिक्षण घेणे सोपे जाते. 




लाभार्थींच्या मनातही सेवाकार्य करण्याची प्रेरणा निर्माण करणे हा संघाच्या सर्वच सेवाकार्याचा विशेष गुण आणि वेगळेपण आहे । आनंदपूर भाली येथील रेल्वेतील कर्मचारी समुंदर गिल्लोड असो कि मुलींचे क्रीडा प्रशिक्षक नरेंद्र पडवळ असो , गावातील सर्व तरुण या सेवाकार्यामध्ये आपापला वाटा उचलीत आहेत ।

जनसंवर्धना पासून वृक्षारोपणापर्यंत सर्व कामांमध्ये गावकऱ्यांचे सहकार्य मिळते असे समाधानाचे उद्गार अनुपसिंहजी यांनी काढले आहेत । गेल्या ५ वर्षांपासून तेथे ग्रामोत्सव होत असून त्यामुळे संपूर्ण गावात ऐक्याची भावना निर्माण झाली आहे असेही त्यांनी म्हटले आहे 


संपर्क -  अनुपसिंहजी — 9034729351        

910 Views
अगली कहानी