सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

अवघे विश्वचि घेऊ कवेत

श्रीमती वंदना पूणताम्बेकर | मध्यप्रदेश

parivartan-img

जोरदार धक्याने विमानतळाच्या धावपट्टी वरून विमानाने आकाशात झेप घेतली, तेव्हा पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणान्या सोनूला थोडीशी भीती वाटली . एक विचित्र कंप त्याला त्याच्या पाठीच्या कण्यामध्ये जाणवला. मध्य प्रदेशातल्या ग्वालियर जिल्हया मधील सिरोल नावाच्या एका छोट्याशा गावातला हा होतकरू तरुण मुलगा, आज भारताच्या बेस बॉल संघाकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जात होता . विमानाने जेव्हा वादळाला चिरून आकाशात वर जाण्याचा प्रवास सुरू केला, तेव्हा सोनूच्या मनात त्याच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या . लहानपणी आकाशात विमान पाहून सोनू खूप आनंदी व्हायचा अणि जोपर्यंत जहाज दृष्टी पासून डोळ्याआड होत नाही, तोपर्यंत त्यांच्या मागे त्याची दृष्टी धावत रहायची. शासकीय शाळेत शिक्षण घेतल्यानंतर ही वडिलांसोबतचे अंगमेहनतीचे ते कठीण दिवसही त्याच्या डोळ्या पुढे चमकले . आयुष्यभर सर्व त्रासाला सामोरे जाऊन स्वतः चे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद, तो विमानात असताना अनुभव करीत होता . त्याला असे कही वाटत होते जणू काही सारे जग त्याच्या मुठीत आहे. 


असेच काहीसे शेतमजूरांच्या कुटुंबात जन्मलेल्या भानसिंगलाही वाटले होते, जेव्हां मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी २६ जानेवरी २०१६ रोजी , दहावी वर्गात जिल्यात सर्वाधिक गुण मिळविल्या बद्दल त्याचा सन्मान केला होता . सोनू प्रमाणेच सहारिया जमातीतील १७१ मुलं आज डबरा येथील सेवा भारतीच्या बोर्डिग शाळेमध्ये शिक्षण घेऊन यशाच्या मार्गावरून चालत आहेत. राज्यातील सर्वात मागास जमातीच्या पैकी एक असलेली सहारिया ही जमात आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे . या लोकांची स्वतः ची जमीन किंवा इतर कोणतेही रोजगाराचे साधन त्यांच्याकडे नाही . पिकाची काढणी किंवा शेतात कष्ट करून ही लोक आपल्या कुटुंबाचे संगोपन करतात . 

 

सहारियातील साक्षरतेचा दर १० % पेक्षा सुदधा कमी असेल, अणि हा दर आजही तेवढाच राहिला असता. जर संघ प्रचारक आणि सेवाभारतीचे संस्थापक विष्णूजी यांच्या प्रेरणेने १० जुलै २००३ रोजी ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी भाइयाच्या इमारतीत एक अशी वनवासी निवासी शाळा सुरू केली गेली नसती, जेथे व्यवस्थापन समितीने विध्यार्थ्यांच्या राहण्यापासून गणवेश व फी पर्यंत चे सर्व खर्च उचलले नसते . सेवाभारती चे प्रांत उपाध्यक्ष निर्मलदासजी जे सुरुवाती पासूनच या शाळेचे प्रभारी होते, ते सांगतात की, शाळेत अभ्यासा बरोबरच मुलांना बेसबॉल आणि थ्रो बॉल अशा खेळांचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकाद्वारे दिले जाते . शाळेमध्ये अद्ययावत दर्जाची कम्प्युटर शिक्षणाची देखील व्यवस्था आहे . कोणे एके काळी ३५ मुलांपासून सुरुवात केल्यावर जेव्हा या शाळेतील विध्यार्थ्यांची संख्या १७१ वर पोहोचली तेव्हा मग शाळेला स्वतःच्या इमारती ची गरज भासली . अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या प्रवासी भारतीय अभियंता पंकज माहेश्वरी हे या सहकार्यासाठी पुढे आले. त्यांनी आपले वडील आणि ग्वाल्हेर चे प्रख्यात चिकित्सक डॉ के.जी. माहेश्वरीजी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ इमारती साठी २० लाख रुपये दिले . या मुलांच्या उत्कृष्ट निकालामुळे आणि खेळातीत जबरदस्त कामगिरी मुळे प्रभावित झालेल्या समाजातील इतर लोकांनी सुद्धा शाळेसाठी मोकळ्या मनाने सहकार्य केले . कितीतरी कुटुंब येथे शाळेत येऊन आपल्या मुलांचा वाढदिवस किंवा पूर्वजांचा स्मृतिदिन या प्रतिभावान मुलांबरोबर साजरे करतात . 

 

शाळेचे मुख्याध्यापक संजय रजक सांगतात की, येथे राहून १२ वी पास झालेले रामरस, सुनील सिंह व अमरसिंह या मुलांची पैरामेडिकल मधे निवड झाली आहे . तर १२ मुले आयकर विभागात आणि ४ वन्यविभागात नोकरी करत आहेत . या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन वर्गांचा पुरेपूर फायदा घेतला . क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर बेसबॉल मधे इंदरसिह आणि थ्रो बॉल मध्ये अनिल कुमार यांची निवड झाली . संघ स्वयंसेवकांच्या समर्पण, सेवाभाव आणि उदात्त हेतूंच्या सामर्थ्याच्या आधारावर आज या वनवासी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये स्वप्नातील जगाला आपल्या मुठीत कैद करण्याची ताकद निर्माण झाली आहे..।

994 Views
अगली कहानी