नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
श्रीमती वंदना पूणताम्बेकर | महाराष्ट्र
तुमची निवृत्ती योजना काय
आहे.? अजून विचार केला
नाही? मग विचार करा!! कारण
समाजाला आणि देशाला तुमची खूप गरज आहे। भेटू या विचारधारेवर विश्वास करणारे अणि महाराष्ट्रातील
ठाणे येथे राहणारे, संघाचे स्वयंसेवक श्री.रवि कर्वेजी यांना। ठाण्याच्या टी. जे.
एस. बी सरकारी बँकेतून सन्मानाने निवृत्त झाल्यानंतर गेली दहा वर्षे त्यांनी
आपल्या चार मित्रांसह महाराष्ट्रातील अनेक लहानमोठ्या खेडे, शहरे, झोपडपट्ट्यांतील
जवळ जवळ 2500 मुलांना यशोगाथा लिहिण्याची संधी दिली। तसेच या समाजाकडून घेण्यास, व
त्यानंतर एकत्र करून द्यायला सुद्धा शिकवले. त्यानी 2010 ते 2022 च्या दरम्यान विद्यार्थी
विकास योजनेंतर्गत 10 कोटी 95 लाख रू सहयोग राशि मधून 2500 पेक्षा जास्त मुलांचे
इंजिनीअरिंग, मेडिकलसह इतर
व्यावसायिक अभ्यासक्रमांची फी भरली आहे, एवढेच नाही तर रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील
6 जुन्या जीर्ण शाळांच्या इमारतीचें नूतनीकरणही केले।
पैशाची चणचण हुशार विद्यार्थ्यांच्या बेड्या बनू नयेत यासाठी गरीब मेधावी मुलांच्या, व मनात सेवाभाव ठेवणाऱ्या समृद्ध कुटुंबांमधील पुला चे काम संघ स्वयंसेवक कर्वे जी आणि त्यांची टीम यानीं केले.
ढग सूर्याला किती काळ झांकून ठेवू शकतात। स्वाती सिंह यांना भेटल्यानंतर
तुम्हीही हाच विचार कराल। एकेकाळी घाटकोपरमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या स्वातीचे घर पावसाळ्यात 3 महिने तलावच असायचे,
परंतु तरी देखिल नेहमीच ती अभ्यासात पहिलीच रहायची, आणि 12वी नंतर
विद्यार्थी विकास योजनेंतर्गत मिळालेल्या सहकार्याने बीएससी आणि एमएससी करून आज ती
एका बँकेत वार्षिक 19 लाखांचे पॅकेज घेऊन काम करत आहे। आता भेटूया अंजली
लोखंडेला, जी सोलापुरात एकटेपणी राहणाऱ्या आपल्या आईच्या कष्टाचे आणि दृढ़जिद्दीचे
जिवंत उदाहरण बनली आहे। टीन शेडमधील एका छोट्या झोपडीत आपली पदके अणि बक्षीसे एका
टोपलीत ठेवणारी अंजली, आज मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये टॉप करून आपल्या आईसोबत
नागपुरात राहते, आणि इन्फोसेप्ट्स तंत्रज्ञान प्रा.लि मध्ये काम करते। अंजली
आपल्या कुटुंबाला गरिबीच्या पाशातून बाहेर काढण्यात यशस्वी झाली, आणी त्याचबरोबर तिच्या
आईने तिच्यासाठी योजलेले भविष्य देखील जगते आहे। ती ते करू शकली कारण तिच्या
अभियांत्रिकी शिक्षणाची फी विद्यार्थी विकास योजनेशी जुळून एक समृद्ध व्यक्ती ने
भरली.
लहान-लहान गाँव, खेडे, शहरे, झोपडपट्ट्यांमधे राहणाऱ्या अणि मोठ्या-मोठ्या आयटी कंपनीत त्याचप्रमाणे मेडिकल
लाइन अणि इंजिनीअरिंग क्षेत्रात आपली ओळख नोंदवणाऱ्या या मुलांच्या अद्भुत परिवर्तनाच्या प्रवासाचा आधार काय आहे.??? मुले कशी निवडली
जातात ? विद्यार्थी विकास
योजना काय आहे? तुम्ही सगळे असाच
विचार करत आहात ना?
सुरुवातीपासूनच या कामात
जुळलेले स्वयंसेवक अरुण करमारजी सांगतात की 2010 मध्ये सर्वप्रथम अशा ५ हुशार
मुलांची निवड करण्यात आली, जे प्रतिभावान असूनही त्याच्या स्वप्नांपासून दूर होते,
कारण ते मेडिकल किंवा इंजिनीअरिंग कॉलेजची फी भरू शकत नव्हते. असे बहुतांश गरीबच
नाहीत तर निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांमधील मुंलाबरोबर सुद्धा घडते. या मुलांची फी
बँकेत रवीजींच्या संपर्कात आलेल्या काही देणगीदारांनी भरली। इथूनच हा प्रवास सुरू
झाला व लोक भेटत गेले, अणि कामाचा ओघ वाढत गेला। 2017 मध्ये ह्या कामाला संस्थात्मक
स्वरुप देण्याकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून चालणारी सेवा सहयोग
संस्था पुढे आली।
आज जवळपास 80 स्वयंसेवक या कामात सहभागी आहे। जे रात्रंदिवस अशा विद्यार्थ्यांचा शोध घेतात, ज्या मुलांचा दहावीचा निकाल 90% च्या वर आहे, पण त्याचे कुटुंब त्यांची पुढील शिक्षणाची फी भरण्यास अक्षम आहेत। आधी या कुटुंबांच्या आर्थिक स्थितीबद्धल माहिती काढली जाते। त्यानंतर दहावी-बारावीनंतरच्या त्यांचा शिक्षणासाठी कॉलेज, हॉस्टेल, ट्रेनिंग इत्यादीसाठी 4 वर्षांची फी वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाते। येथे हे जाणून घेणे महत्वाचे आहे की पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी जी रक्कम वाचवली आहे, आणि चांगल्या कॉलेजमध्ये 4 वर्षे शिकण्यासाठी लागणारी शैक्षणिक फी, या दोघांमधील जो फरक असतो तेवढीच रक्कम विद्यार्थी विकास योजना पूर्ण करते।
सेवा सहयोग मुंबईच्या
संचालक मंडळापैकी एक किशोर मोघेजी सांगतात की, विद्यार्थी विकास
योजनेमुळे अनेक देणगीदारांच्या माध्यमातून हजारो मुलांचे सुंदर भविष्य तर घडत आहेच, पण येत्या काळात
एक सुंदर समाजही घडत आहे। कारण समाजाच्या मदतीनं पुढे जाणारी ही मुलं हळुहळू
देणगीदारांच्या यादीत सामील होऊ लागली आहेत। याचे उत्तम उदाहरण म्हणजे शास्त्रज्ञ
सचिन सूर्यवंशी। सचिन हे आज फार्मसी क्षेत्रातील एक नावाजलेले नाव आहे। विद्यार्थी
विकास योजनेच्या मदतीने शिक्षण घेतलेल्या सचिनने बँकेकडून 1.4 लाखांचे कर्ज
घेतले, आणि दोन मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली, आणि हे कर्ज त्यांच्या
पगारातून बँकेला परत केले। सचिनप्रमाणेच संस्थाशी जुळलेल्या प्रत्येक
विद्यार्थ्यावर समाजाच ऋण परतफेडीची भावना जागृत होते। या मुलांना कधीच कळत नाहीत
कि त्यांची फी कोण भरत आहे। फक्त येवढच माहीत आहे, कि आज समाज त्यांच्या पाठीशी
उभा आहे, आणि भविष्यात त्यांना पण ही भूमिका पार पाडायची आहे।
माणसाच्या विचारसरणीवर वयाचं बंधन कधीच नसतं, जिथे पहिल्या डावात माणूस आपल्या जबाबदाऱ्या, घर, कुटुंब, नाती सांभाळतो, त्याच आयुष्य दुसऱ्या डावात तितकं काही अवघड नसतं। तर तो
ठरवतो की त्याने समाजासाठी काहीतरी केले पाहिजे। जे
समाजाकडून घेतले आहे ते समाजाकडे परत करायचे आहे। आज 10 कोटी रुपयांनी 2500
मुलांचे भविष्य सुधारले आहे, कारण समाज आणि देशासाठी तुमचे योगदान महत्त्वाचे आहे,
हे समजुन घेण्यासाठी आयुष्याच्या दुसऱ्या डावात तुम्ही खूप सक्षम आणि अनुभवी असता।
रवींद्र कर्वे, अरुणजी
कर्माकर, शरदजी
गांगल, राजू
हेंबर्डे आणि अभिजीत फडनिस, यांनी भारताच भविष्य सोनेरी बनवण्यासाठी ही सोनेरी
लेखणी सर्वांच्या सुपूर्द करून दाखवून दिले आहे।
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।