सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

संकटग्रस्तांसाठी आशेचा किरण ओडिशा-फणी चक्रीवादळ

के. प्रसाद | ओरिसा

parivartan-img

देशामध्ये निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच पूर्वेकडे फणी चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला. एकीकडे कुणाला किती जागा मिळणार याची चर्चा होत असताना साधारणतः तासाला दोनशे किलोमीटर इतक्या वेगाने ‘फणी’ चक्रावादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले. या वादळामुळे जे नुकसान झाले, त्याची आपल्या कुणालाही कल्पना येणार नाही. कटक, भुवनेश्वर, खुर्दा, पुरी यांच्यासह पाच जिल्ह्यांतील बहुतांश गावांमध्ये विजेशिवाय अंधार पसरला आहे. एक लाख 56 हजार विजेचे खांब उखडले आहेत. नारळाच्या जवळपास दीड कोटींहून अधिक झाडांची पुरती वाताहत झाली आहे. गावातील शेतकरी बेघर झाले आहेत. त्यांच्या शेतीचेही पुरते नुकसान झाले आहे. या वादळामध्ये 64 नागरिक आणि तब्बल 65 हजार जनावरे मृत्युमुखी पडली. या संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सर्वांत पहिल्यांदा पोहोचले, ते संघाचे स्वयंसेवक.




ओडिशामध्ये संघाच्या स्वयंसेवकांकडून उत्कल विपन्न सहायता समितीचे काम चालते. या समितीचे दीड हजारांहून अधिक स्वयंसेवक 5 मेपासून आजपर्यंत रात्रंदिवस संकटग्रस्तांना मदत करीत आहेत. समितीकडून पंधरा ठिकाणी संकटग्रस्तांसाठी छावण्या उभारल्या आहेत. त्याचा लाभ आतापर्यंत 96 हजारांहून अधिक लोकांनी घेतला आहे. तात्पुरते छत म्हणजेच तारपोलिन येथील नागरिकांना देण्यात आले आहे. 1.2 लाख नागरिकांना तारपोलिन देऊन येत्या मान्सूनमध्ये त्यांना पावसाचा फटका बसू नये, याची काळजी घेण्यात आली आहे. समितीचे सदस्य बिजाय स्वाइन सांगतात, की येथील नागरिकांच्या गरजा खूप आहेत आणि संसाधने कमी आहे. साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी चार लाख मच्छरदाण्यांचे वाटप केल्यानंतरही आतापर्यंत केवळ चार टक्के लोकांपर्यंतच आम्ही पोहोचलो आहेत. दुर्गम भागातील गावे, पुरी, कटक, भुवनेश्वर येथील झोपड्यांपर्यंत सौरदिवे पोहोचवायचे आहेत.




भुवनेश्वरपासून 25 किलोमीटर अंतरावरील बालीपटना या छोट्याशा गावात विड्याच्या पानांची शेती चालते. येथील हेच मुख्य पीक आहे. वादळामुळे या पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे. मुस्लिमबहुल असलेल्या गावावर वादळाच्या रूपात मोठे संकट कोसळले. या गावातील लोकांना घराच्या छतासाठी तारपोलिन, कपडे, मच्छरदाणी देण्यासाठी समितीचे लोक आले, तेव्हा येथील लोकांना खूप मोठा दिलासा मिळाला. सैफुद्दीन खान या व्यक्तीला तर अश्रू अनावर झाले. संघाबाबत त्यांच्या मनामध्ये असलेला दृष्टिकोन या वेळी पूर्णपणे बदलला. समितीने केलेली मदत पाहून सैफुद्दीन यांना गहिवरून आले आणि ते म्हणाले, आजपर्यंत संघाला मी माझा शत्रू समजत होतो. पण, संकटाच्या वेळी सर्वांत पहिल्यांदा संघाचेच लोक आमच्यापर्यंत पोहोचले.




या संकटकाळात नागरिकांना केवळ आवश्यक ते साहित्य देणे पुरेसे ठरणार नाही. या वादळामुळे झालेले नुकसान केवळ या साहित्याने भरून निघणार नाही, तर पीडितांसाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने काम करावे लागणार आहे. संघाचे पूर्व क्षेत्रातील क्षेत्र सेवा प्रमुख जगदीशजी आगामी योजनेसंबंधी सांगतात, की आम्ही या ठिकाणी रोजगारनिर्मितीवर भर देत आहेत. येथील नागरिकांना नारळ, सुपारी, काजू यांची झाडे लावून दिली जातील. त्याद्वारे नागरिकांना उत्पन्नाचे साधन मिळेल. सरकारच्या मोकळ्या जमिनींवर चंदनाची झाडे लावली जातील. पाऊस येण्यापूर्वी प्रत्येक घराला प्लास्टिकचे छप्पर दिले जाईल. समुद्रकिनाऱ्यावरील उंच झाडे फणी चक्रीवादळामुळे नष्ट झाली आहेत. या झाडांमुळे मोठी वादळे थेट शहरामध्ये येण्यास प्रतिबंध होतो. मात्र, आता ही झाडे नष्ट झाल्यामुळे मोठे वादळ आल्यास ते थेट शहरात येऊ शकते. उंच झाडांच्या या जंगलांना पुनरुज्जीवित करण्याची योजनाही संघाने तयार केली आहे. येथील 50 कुटुंबांना रोजगारासाठी छोटी बोट देण्यात आली आहे. आणखी बोटी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. विड्याच्या पानांच्या शेतीवर गुजराण करणाऱ्या सहाशे कुटुंबांना मदत देण्याचेही प्रयत्न केले जातील. या ठिकाणी यूबीएसएस डॉक्टर, आरोग्य कार्यकर्त्यांची पथके, 14 अम्बुलन्सच्या मदतीने साथीच्या आजारांना रोखण्यात यश आले; पण प्राथमिक उपचार कायमस्वरूपी करता यावेत, यासाठीदेखील आरोग्य केंद्रे उभारली जातील.

नैसर्गिक संकटाने झालेली हानी मोठी आहे. मात्र, आपण सर्वांनीच शक्य तितकी मदत करणे गरजेचे आहे.

1341 Views
अगली कहानी