नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
महाराष्ट्र
ढगेवाडी - महाराष्ट्रातील एक छोटेसे खेडे. तुमच्यापैकी बहुतेक जण ढगेवाडीला गेला नसाल आणि बहुधा त्याचे नावही ऐकले नसेल. परंतु 32 वर्षांपूर्वी एक जोडपे तिथे पोहोचले आणि आपल्या संकल्पशक्तीने त्यांनी या अज्ञात अशा गावाचे चित्र पालटले. ही गोष्ट आहे 1985 ची. महाराष्ट्रातील अकोला जिल्हा अहमदनगरपासून 35 कि.मी. अंतरावर असलेल्या 55 उंबरठ्यांच्या छोट्याशा खेड्यात सगळी जमीन पडीक होती. तिथे पाण्यासाठी फक्त एक छोटसं तळं होतं आणि तेही गावापासून 5 किमी अंतरावर. तेव्हा मोहनराव घैसास आणि त्यांची पत्नी स्मिता यांनी या गावाला आपली कर्मभूमी बनविली. ढगेवाडीत त्याकाळी ना उगवण्यासारखं काही होतं ना उत्पन्नाचे अन्य दुसरे साधन नव्हते. परिस्थिती अशी होती, की सगळे पुरुष रोजगारासाठी वर्षातील 9 महिने बाहेर जात असत. गावात मागे राहत फक्त म्हातारे-कोतारे, मुले आणि स्त्रिया. पण आज इथे सगळीकडे हिरवळ आहे. एकेकाळी पाण्याच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या या गावात आता 26 विहिरी, 35 बंधारे आहेत आणि ज्या लोकांनी कधी कोबी, टोमॅटो पाहिले नव्हते तिथून आता दर आठवड्याला कोबी आणि टोमॅटोने भरलेले टेम्पो शहरात विकण्यासाठी जातात.
हा चमत्कार खरं म्हणजे सुयश चॅरिटेबल ट्रस्टने विकसित केलेल्या प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. त्याने हजारो शेतकऱ्यांचे भाग्य बदलले. घैसास दाम्पत्याने ट्रस्टमार्फत वनवासी विद्यार्थ्यांना प्रगत शेतीचे प्रशिक्षण देऊन सुरुवात केली. जेव्हा या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना वर्षाकाठी एक एकर ओसाड जमिनीतून 40,000 उत्पन्न मिळू लागले, तेव्हा त्यांनी आजूबाजूच्या इतर खेड्यांमध्ये सेंद्रिय शेतीवर आधारित हे मॉडेल राबवले. मेळघाट गावचे बापू काळे आणि श्याम बेलसरे यांनी आपल्या शेतात 10 क्विंटल सोयाबीन आणि 1 क्विंटल ज्वारीची मिश्र लागवड करून एकूण 47000 हजारांचे उत्पादन मिळवले. बापू काळे सांगतात, की आज त्यांची ओसाड जमीन सुपीक झाली आहे. बीबा गावातील मोतीलाल बावणे यांनी बंधारा बांधला, आणी चार शेतकऱ्यांनी मिळून त्याचा सिंचनासाठी वापर केला आणि रब्बीचे एकरी 18000 किमतीचे बंपर पीक घेतले. विहीर गावचे दादाराव खंगारे म्हणतात की नाविन्यपूर्ण शेतीच्या माध्यमातून त्यांनी प्रति एकर 10.5 क्विंटल कापसाचे विक्रमी उत्पादन घेतले. आज ट्रस्टच्या प्रयत्नाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि ओरिसामधील 2600 गावांमधील एक लाख लोक गरीबीच्या शापातून मुक्त झाले आहेत.
एक स्वयंसेवक म्हणून अकोला येथील वनवासी कल्याण आश्रमातील मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी आपल्या आयुष्याची दिशा बदलेल, हे इलेक्ट्रिकल तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेणाऱ्या मोहनरावांना त्यावेळी स्वप्नातही वाटले नव्हते. अनेक वर्षांपासून पुणे नगराचे संघचालक असलेल्या मोहनरावांच्या वनवासी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याच्या विचारांनी हळूहळू खेड्यांच्या विकासाचा पाया रचला. ट्रस्टचे कार्यकर्ता शेतक-यांना प्रगत बियाणे व सेंद्रिय शेतीच्या प्रशिक्षणासोबतच गोमूत्रापासून खत बनवण्याची पध्दतदेखील शिकवतात. या संपूर्ण प्रकल्पांतर्गत ट्रस्टमार्फत छोटे बंधारे बांधून, विहीरी खोदून पारंपरिक जलसंधारणाच्या माध्यमातून गावात पाणी संग्रहीत केले जाते. मात्र हे सर्व इतकं सोपं नव्हतं – नाशिकमधील उंबरपाडा गावाचीच घटना घ्या. पहिल्यांदा तर ग्रामस्थांनी ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना बसविण्याससुद्धा नकार दिला होता. गावकऱ्यांचं म्हणणं होतं, की तुम्ही गावात पाणी आणू शकत असाल तरच आम्ही तुमचे ऐकू. आज त्याच खेड्यातील एकनाथ गायकवाड यांनी 3 एकर जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड करुन वर्षाला 1,60,000 रूपये मिळवण्याचा विक्रम केला. त्यानंतर त्यांची मुलाखत घेण्यासाठी टीव्ही वाहिन्यांचीसुद्धा येथे गर्दी झाली.
अनेक वर्षे तर बियाणे खरेदी करण्यापासून विहिरी खोदण्यापर्यंत ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना पैसे पुरवण्यात येत असत. ते पिकाच्या उत्पन्नातून हे पैसे फेडत असत. आता हे काम गावोगावी बचत गटांमार्फत केले जात आहे. शेतकरी स्वत:च्या बचतीतून स्वयंपूर्ण होत आहेत. प्रथम नानाजी देशमुख पुरस्काराने सन्मानित पुण्यातील सुयश चॅरिटेबल ट्रस्टने गो-आधारित प्रगत शेतीचे एक नवीन मॉडेल विकसित करून लाखो वनवासी कुटुंबांना स्वावलंबी केले. त्यांच्या जीवनात समृद्धीचे नवे रंग भरण्याचे काम ते करत आहे.
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।