सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

मुलांमधली निरागसता

सतीश कुंटे | दिल्ली

parivartan-img

कोरोना काळामध्यें जेंव्हा सगळ्या शाळा बंद झाल्या आणि मुलांना घराबाहेर जाऊन खेळण्याची देखील सोय राहिली नाहीं, तेंव्हा मोबाइल हातामध्यें घेऊन वेळ विनाकारण फुकट घालविण्यापेक्षा दिल्लीमधील कांहीं मुलांनी आपला वेळ सत्कारणी लावण्यासाठी जो मार्ग काढला त्या मार्गानें त्यांना आयुष्यभरासाठीं एका वेगळ्याच बंधनामध्यें अडकविले. लॉकडाउनच्या काळामध्यें सुरु झालेल्या दिल्ली सेवा भारतीच्या "ईच वन टीच वन" ह्या उपक्रमाअंतर्गत डीपीएस,जीडी गोएंका, मॉडर्न स्कूल सारख्या प्रतिष्ठित शाळांच्या बाराशे पेक्षा अधिक मुलांनी आंबेडकर वस्ती, वाल्मिकी वस्ती, रविदास कॅम्प, कालकाजी संजय कॅम्प वस्ती मधील मुलांना ऑनलाइन शिक्षण दिले, छान छान गोष्टी सांगितल्या, नृत्यकला शिकविली व  हस्तकलेमधील कागदाच्या केलेल्या फुलदाण्या, पेन्सिल पेन ठेवण्याचें स्टॅंड इत्यादि सुंदर सुंदर गोष्टी बनविण्यास देखील शिकविले.




सुस्थितीमध्यें असणाऱ्या व सर्व सोयीं सुविधा उपलब्ध असलेल्या कुटुंबामधील मुलांना झोपडीमध्यें राहणाऱ्या गरीब व असहाय्य मुलांशी जोडणारी ही जणु एक सेवा यात्राच होती. ह्या यात्रेनें ह्या दोन विभिन्न गटांमधील दुरावा संपुष्टात आणून दोन्ही गटांमधील मुलांच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा दिली ह्यांत शंका नाहीं. दिल्ली सेवा भारतीचे प्रांत प्रचार मंत्री भुपेंद्रजी सांगतात कीं, कोरोना काळ ओसरल्यानंतर "ईच वन टीच वन" ह्या उपक्रमानें आतां "टीन सेवा" हें रुप धारण केले आहे ज्यामध्यें आतां सेवेबरोबर राष्ट्रभक्ती देखील जोडली गेली आहे. ही गोष्ट आहे मार्च २०२० मधील जेंव्हा कोरोनाने भारतभर हातपाय पसरलें आणि सगळ्या शाळा बेमुदत काळासाठीं बंद केल्याची घोषणा करण्यांत आली. तेंव्हा दिल्ली सेवा भारतीचे प्रांत संपर्क प्रमुख निधी आहुजा ह्यांना पन्नास अशा मुलांनी फोन करुन सेवा कार्यामध्यें संलग्न होण्याची इच्छा व्यक्त केलि. ही मुलें आधीपासूनच सेवा भारती तर्फे आयोजित केलेल्या उन्हाळी व हिवाळी शिबिरांमार्फत गरीब वस्ती मधील मुलांशी जोडली गेली होती. हा तोच  काळ होता जेव्हां आपले प्रधान मंत्री नरेंद्र मोदीजी स्वतः मुलांना व जेष्ठांना घराबाहेर न पडण्याचें आवाहन करीत होते.




मुलांच्या पालकांच्या मनामध्यें भिती तर सेवा भारतीच्या कार्यकर्त्यांच्या मनांत चिंता होती कीं अशा बिकट परिस्थितीमध्यें मुलांना ह्या पवित्र कार्यामध्यें कसें जुंपावे? त्याचवेळी निधीजींनी "ईच वन टीच वन" उपक्रमामधील मुलांकडे गुगल फॉर्म मार्फत विचारणा केली कीं गरीब वस्तींमधील मुलांना ऑनलाइन शिकविण्यास कोण तयार आहे? जेंव्हा एक हजारापेक्षा जास्त मुलांनी ऑनलाइन शिकविण्याची इच्छा व्यक्त केली तेंव्हा निधीजींचा आनंद गगनांत मावेनासा झाला. मग काय, सेवा भारतीने संस्कारकेंद्रांमधील निरीक्षक व शिक्षकांच्या सहाय्यानें वस्ती मधील अँड्रॉइड फोनचा वापर करुन वस्ती मधील एकेका मुलाला सधन वस्ती मधील एकेका मुलाच्या संपर्कात आणले. शिकविणाऱ्या मुलाला स्वयंसेवक व शिकणाऱ्या मुलाला सखा(बड़ी) असें नांव दिले गेले. आठवड्यामधून एकदा चालणाऱ्या ह्या शिक्षणवर्गानें असें कांहीं सार्थ मैत्रीचें धागें गुंफले कीं ज्याने दोन समाजांमधील सर्व सीमा पुसून टाकल्या.  




सध्या ह्या उपक्रमाच्या कार्यवाह असलेल्या दीप्ती दीदी सांगतात कीं, हे शिक्षण सत्र बडी म्हणजे सखा, स्टोरी टेलिंग, हॉबी आणि बुकबॅंक अशा चार स्तरांवर चालते. बडी म्हणजे आपापसामधील मैत्री दृढ करणे. स्टोरी टेलिंगमध्यें स्वयंसेवक मुले कांहीं नैतिक व विज्ञानाच्या गोष्टी आपल्या बडीला सांगत असत. हॉबी सत्रा मधें चित्रकला, पेंटिंग व भरतकाम अशा विविध कला शिकविल्या जात आणि बुकबॅंक मार्फत मुलांना चांगली उपयुक्त पुस्तके दिली जात असत. ह्या उपक्रमाअंतर्गत ११ ते १९ वयोगटामधील सुमारे अडीच हजार मुलांना प्रेरित करण्यासाठीं व त्यांचें मनोबल वाढविण्यासाठीं भारतीय क्रिकेट संघाचे कप्तान श्री विराट कोहली, प्रमुख फलंदाज श्री शिखर धवन, स्वतःच्या व्याख्यानाने सर्वांना प्रेरणा देण्यासाठीं प्रसिद्ध असलेले वक्ते श्री शिव खेरा ह्यांच्यासह अनेक थोरामोठ्यांनी व्हिडिओ क्लिप पाठवुन मोलाचे सहकार्य केले, व शुभेच्छा दिल्या. कोरोनाकाळामध्यें सुरु झालेले दिल्ली सेवाभारतीचे हे शिक्षणसत्र आतां ह्या मुलांचा आयुष्यभराचा "बडी" झाले आहे. डिसेम्बर महिन्यामध्यें जेंव्हाही मुलें प्रथमच प्रत्यक्ष भेटली तेंव्हा ते दृश्य राम व भरताच्या भेटीप्रमाणे सर्वांनाच भारावून टाकणारे होते. आरके पुरम सेवावस्ती मधील नीरज चे एक वाक्य आज देखील सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांना नेहेमी आठवते. नीरज म्हणाला होता, आमची मैत्री आतां एलआयसी सारखीआहे. "जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी".

762 Views
अगली कहानी