सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

माये ची सावली-सुरमन

श्रीमती वंदना पूणताम्बेकर | राजस्थान

parivartan-img

तस तर कुंगफू आणि क्रिकेट यांच्यात कोणतंही सामंजस्य नाही, पण पूजा, राहुल, अमन, आणि गुड्डू मध्ये आहे. जरी पूजाने ज्युनियर आलिंपियाडमध्ये कुंगफूमध्ये सुवर्णपदक जिंकले असले, तरी चेन्नई येथील राष्ट्रीय पातळीवरच्या कबड्डी स्पर्धेत भाग घेऊन राहुल, अमन आणि गुड्डूनेही नाव कमावले आहे. ह्या भिन्न-भिन्न खेळांच्या उदयोन्मुख  तारकांना जी  एकत्र बांधून ठेवते..ति आहे सुरमन. हे नाव संगीताच्या स्वरां सारखे वाटते . सुरमन कितीतरी अनाथ आणि निराधार मुलांसाठी त्यांचे स्वतःचे घर आहे, जे गेल्या १८ वर्षा पासून गुलाबी नगरी जयपूर मध्ये सुरू आहे. या संस्थेने बऱ्याच निरागस लोकांचे हसू परत केले आहे. संघाचे स्वयंसेवक सुरेंद्र चतुर्वेदी आणि त्यांची पत्नी मनन यांच्या प्रयत्नांनी १९९८ मध्ये अवघ्या दोन मुलांसह हा बाल आश्रम सुरू करण्यात आला. आज सुरमन परिवारामध्ये ११० मुले आणि ८ महिला आहे. 




मुलांच्या अधी  मनन ची ही कहाणी ही समजून घ्यावी लागेल. फेशन च्या जगात प्रत्येक गोष्ट वास्तविकते पेक्षा मोठी आणि फसवी असते . त्या जगात मनन फेशन डिझाइनिंगमध्ये सर्वाधिक गुण मिळवल्यानंतर नाव कमवण्यासाठी तयार होती. अमेरीका आणि लंडन मधील टॉप फेशन हाऊसेस चे ऑफर लेटर तिच्या हातात होते, पण मना पासून भावुक असलेली मनन स्वयंसेवक आणि पत्रकार असलेल्या सुरेंद्र चतुर्वेदी शी लग्नानंतर समाज आणि देश यांच्यासाठी असलेल्या स्वत: च्या भूमिके बद्दल विचार करण्यास प्रवृत्त झाली . मग ती गौरी ला भेटली आणि सर्व काही बदलले, जखमी गौरीची मलमपट्टी करुन तिला वस्तीत परत सोडायला गेलेल्या मननला   कळाले, की गौरीला भिख मिळावी महणून, अम्लीय पदार्थांची चटक असलेल्या तिच्या आईने स्वत: तिला जखमी केले होते. गौरीला परत आणताना त्या बस्तीची दुर्दशा पाहून मननने त्या काही क्षणातच अवघ्या एका आयुष्याचा अनुभव घेतला. लंडन जाण्याचा विचार सोडून देऊन तिने या निराश मुलांच्या जीवनाची रचना पुन्हा सुरू केली. हा मार्ग इतका सोपा नव्हता. 

जेम्हां मुले वाढली तेव्हां मननने त्यांचा खर्च भागवण्यासाठी चित्रकला , लेखन आणि थिएटरद्वारे पैसे मिळवले. देशात आणि परदेशात 24 तास सतत पेंटिंगचे शो केले. 2000 मध्ये संस्थेची नोंदणी झाल्यानंतर समाज ही सहकार्यासाठी पुढे आला. सुरवातीला बालाश्रय गृह नावाने सुरु झालेल्या या संस्थेनी, कोशिशच्या नावानी सोडलेल्या महिलांना देखील आसरा दिला. या बायकाही आता या मुलांच्या प्रेमाच्या बंधनात बांधल्या गेल्या आहेत. ही संस्था आता ७८७ गरीब मेघावी  मुलांना  शिष्यवृत्ती देखील देत आहे. कधी पांचजन्यासाठी राजस्थानचे संवाददाता राहिलेले सुरेंद्र, आता आपला पूर्ण वेळ सुरमन ला देतात. योग, संस्कार, अनुशासन व देशभक्ती या संघाच्या शैक्षणिक प्रणालीला सुरमन यांनी ही आत्मसात केले आहे. अभ्यासाबरोबरच चित्रकला, संगीत, थिएटर, गायन, वगैरे सर्व मुलांना त्यांच्या आवडीनुसार शिकवले जात आहे. जयपूरच्या चित्रकूट स्टेडियमवर दरवर्षी सुरमन च्या माध्यमातून दसऱ्याच्या जत्रेत मुले हजारो लोकांच्या समोर बाल रामायणाची संगीतमय प्रस्तुति सादर करतात. आपण संस्थेच्या "बोगन बेलिया" या पत्रिकेत मुलांच्या कथा, कविताही वाचू शकता. 

संस्था शासनाकडून सवलतीच्या दरात मिळालेल्या जमिनीवर आनन्दलोक नावाने 1500 मुलांसाठी एक निवारा गृह बनवित आहे, सीकर रोडवर बनणारे हे सुरमनचे नवीन घर खूप मोठे असेल. कधी येथे अभ्यागत म्हणून आलेले आणि मग आपले सम्पूर्ण आयुष्य समर्पित केलेले , संघाचे स्वयंसेवक नरेंद्र शेखावत(नन्द) हे म्हणतात की सुरमन ही एक सम्पूर्ण कुटुंब संकल्पना आहे. शिकवणी, गृहपाठ, खेळ सर्व काही घरा सारखे आहे. मनन आणि सुरेंद्र ह्यांची तिन्ही मुलेही या मुलांबरोबरच राहतात. मनन चतुर्वेदी आज राजस्थान बाल संरक्षण आयोगाची अध्यक्षा आहेत, आणि आता त्यांना सम्पूर्ण राज्यातील मुलांची चिंता आहे।

संपर्क सूत्र- नरेन्द्र शेखावत (नंद) 

संपर्क नं. – 9829322232

733 Views
अगली कहानी