सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

नवनिर्माणाची अंकुर

भालचंद्र जोशी | महाराष्ट्र

वीडियो देखिये

parivartan-img

बळी राजा......  आपल्या धामाचे शिंपण करून जमीन भिजवतो ती फळते – फुलते. पण कोरोनाच्या आपत्तीमध्ये आपण मात्र या बळीराजाला, 'काळ्या आई' च्या लेकराला विसरून गेलो होतो, त्यामुळे सगळ्या जगाचा अन्नदाता स्वतः मात्र भुकेला, अर्धपोटी राहिला. शेतात पिकून तयार झालेलं पीक बाजारापर्यंत पोहोचू शकलं नाही. रांची आणि आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी जवळपास तीन वर्षे श्रम  करून,  जैविक खतं वापरून, जैविक धान्य, फळ, भाज्या यांचं उत्पादन केलं, परंतु कोरोनामुळे अचानक लॉकडाउन लागला, आणि सर्व शेतमाल शेतातच पडून राहिला. तो बाजारापर्यंत नेताच आला नाही. दोन पैसे कमावण्याच शेतकऱ्यांच स्वप्न उध्वस्त झालं, आणि सर्व भाजीपाला गुरांना खावू घालण्याची पाळी आली,




पण यावेळी मात्र शेतकऱ्यांचा मदतीला रा.स्व. संघ. धावून आला. संघाच्या "फॅमिली फार्मर प्रोजेक्ट" शी संलग्न शेतकऱ्यांना राष्ट्रीय सेवा भारतीच्या विश्वस्त रमा पोपली दीदी, आणि संघ- स्वयंसेवक सौरभ भैया यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी सलग तीन महिने, रोज पहाटे ४ ते सकाळी ९ पर्यंत मोटारीतून या वनवासी क्षेत्रात फिरून वनवासी शेतकऱ्यांचा ताजा जैविक शेतमाल, त्यांना योग्य तो भाव देऊन गोळा केला आणि विकण्यासाठी शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवला. या उपक्रमाचा फायदा सध्या नवागढ, कुच्चू आणि बीसा येथील १२ गावामधील वनवासी शेतकरी आणि शहरांमधील सुमारे ५०० ग्राहक कुटुंबाना मिळत आहे. 




मुख्याध्यापक रमा दीदी आणि त्यांच्या सहकारी शिशिकांतनी ऑनलाईन क्लास झाल्यावर रसायनादिरहित कारली, फणस यांचे चिप्स, टोमॉटोची पावडर, कारले-कमरक इत्यादींची चटणी, फळांचे जॅम, जेली इत्यादी उत्पादने तयार करून ग्राहकांमध्ये लोकप्रिय केली, आणि आज शेतकऱ्यांचा शेतमालावर प्रक्रिया करून केलेले हे पदार्थ आपापल्या ब्रँड नावाने दिमाखात बाजारपेठांमध्ये नाव मिळवत आहे.

शेतकऱ्यानंतर आता जरा वीणकरांचा विचार करु या. कर्णाटकात वीणकरांनी मोठ्या प्रमाणावर साड्या विणून ठेवल्या होत्या, पण कोरोनामुळे या साड्यांच्या ढिगाची मोठी अडचणच जणू वीणकऱ्यांच्या मार्गात उभी राहिली. त्यांचा मदतीला सेवा भारतीशी संलग्न जागृती महिला स्वावलंबन केंद्रातील भगिनी धावून आल्या. कविता कलिमने, विनिता हट्टिकाटाग, रेणुका ढेज इत्यादींनीं  एक हजार विणकर कुटुंबांना समुपदेशन करून धीर तर दिलाच, पण ऑनलाईन साडी विक्रीसाठी 'सेवाकर्ता' हे  संकेतस्थळही  सुरु केलं. सध्या या आस्थापनात सुमारे ५० टक्के मजूर  या महिला आहेत. याशिवाय संस्थेने ९ लाख मास्क आणि १५ हजार राख्यांची निर्मितीही केली. ही माहिती राष्ट्रीय सेवा भारतीच्या दक्षिण क्षेत्र प्रमुख भानुमती दीदी यांनी  दिली आहे. तिकडे केरळमध्ये कोरोनाकाळात महिलांचे मनोबल टिकून राहावे यासाठी सेवा भारती पुंजरानी परामर्श केंद्रातर्फे १४ समुपदेशन केंद्रे चालवण्यात येत आहेत. या केंद्रांमध्ये नैराश्य, तणाव ,घरगुती मारहाण आणि दारूची लत यासारख्या वेगवेगळ्या मानसिक त्रासांवर  उपचार केला जातो आणि त्यामुळे या भागातील महिला, मुले, वृद्ध, अशा सर्वांना याचा लाभ होत आहे.




२४ मार्च २०२० रोजी रात्रीचे ९ वाजलेले असतांना देहरादून येथील मातृमंडळ या संगठनेच्या क्षेत्रीय संघटन मंत्री रिता गोयल यांना माहिती मिळाली कि, त्यांच्या घरापासून तीन कि.मी. दूर  एका अर्धवट बांधलेल्या इमारतीत सात बिहारी मजुरांची कुटुंब उपाशी  बसून आहेत. ताबडतोब घरातील शिजवलेले अन्नपदार्थ, आणि  कोरडा  शिधा दोन मोठया पिशव्यांमध्ये भरून स्कूटीवरून त्या तेथे गेल्या, आणि त्यांनी त्या भुकेल्या जीवांना खावू  घातले. रिता  गोयल यांनी  सुनीता, मालिनी आणि सपना या आपल्या सहकारी महिलांसमवेत मास्क तयार करून ते गरजूंना विनामूल्य वाटले, त्याचबरोबर मणिपूर येथील विद्यार्थ्यांसह ५००० कुटुंबांना रेशनचा पुरवठा केला.  हरीद्वार येथील मातृमंडळाच्या राखी जी यांनी कुष्ठरोगी आणि झोपडपट्टीतील रहिवाश्याना जेवणावी पाकिटे वाटली तर ऋषिकेश येथील यज्ञीका दीदी यांनी हर्बल सेनिटाइजर, तर अंशुलजी यांनी गोमयापासून तयार केलेत्या उद्बत्या आणि धूपकांड्या यांचे वाटप केले.

या सेवागाथेतील काही प्रसंग  तर हृदयाला  पीळ पडणारे आहेत.  कानपुर शहरात पनकी  मंदिर येथे भोजन पाकिटे वाटण्यात येत आहे, हे पाहून रस्त्याचे दुसऱ्या बाजूला उभी असलेली, भुकेने कासावीस झालेली १३ वर्षांची एक पोर, आजूबाजूच्या रहदारीची पर्वा न करता बेभान होऊन धावत आली तर कल्याणपूरी या भागात साठ वर्षांची एक वृद्ध महिला अशीच धापा टाकत आली. दादानगर येथेही भुकेने व्याकुळ झालेल्या काही नजरा भोजन पाकिटांची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होत्या. लहान असो,




तरुण असो कि वृद्ध- सर्वांना भुकेचे चटके बसत होते।  लॉकडाउनच्या काळात कानपुर किशोरी केंद्र प्रमुख पूजा दीदी, आणि मातृ मंडळ महानगर प्रमुख क्षमा मिश्रा, आपल्या सहकाऱ्यांसह एकागाडीमध्ये भोजनाचे डबे घेऊन, रेल्वे स्थानक, बस स्थानक, झोपडपट्ट्या येथे वाटप कार्यासाठी जात असत, तेंव्हा त्यांना त्याचा पुरेपूर प्रत्यय येत असे, त्यांनी सलग २१ दिवस रोज ३०० भोजन पाकिटांचे वाटप केले. आपल्या देशावर असे संकट पुन्हा कुठे येहू नये एवढी एकच प्रार्थना त्या परमेश्वराच्या चरणी आहे. जेंव्हा हृदयात सेवाधर्माच्या सूर्याचा उदय होतो, तेव्हाचं कीतीही कठीण संकटाचा घनघोर काळोख  असला, तरी तो टिकून राहत नाही, हेच या काळात रा. स्व. संघ. स्वयंसेवकांनी आणि महिला कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. अशाच सेवाकार्यांबद्धल आणिक काही कथा पुढच्या अंकात ---------

1250 Views
अगली कहानी