सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

गौमुखी सेवाधामचा विकासाचा मार्ग

छत्तीसगड

parivartan-img

छतीसगढ़ कोरबा जिल्ह्यापासून साठ किलोमीटर अंतरावर देवपहरी हे एक छोटेसे खेडे आहे. अठरा वर्षांपूर्वी देवपहरीला जाणे म्हणजे हिमालय चढून जाण्यासारखे कठीण होते. येथे पोहोचण्यासाठी तीन डोंगर चढून जावे लागत असे. त्यासाठी कधी कधी दोन दिवससुद्धा लागायचे. देवपहरीच नाही, तर लेमरू, डिडासराय, जताडाडसह कोर्बा जिल्ह्याच्या चाळीस खेड्यांपर्यंत जाण्यासाठी कुठलाही रस्ता नव्हता किंवा ना सार्वजनिक वाहन.





शिक्षणासाठी शाळा नव्हत्या, ना आरोग्य सेवेसाठी डॉक्टर व हॉस्पिटल. सध्याचा जो वीजपुरवठ्याचा प्रश्न आहे, त्यावर नुसती चर्चाच सुरू होती . वनशेती व वन उत्पादनांवर जीवन जगणाऱ्या पंडो, बिरहोर, कोरबा, कंवर या समाजातील रुग्ण ईश्वराच्या भरवशावर दिवस काढायचे. त्यात भर म्हणून नक्षलवाद्यांचा त्रास कायम पाठीशी लागला होतो. विळ्याच्या पात्यांनी उभे शेत कापून ते कापून घेऊन जायचे. त्यामुळे जीवन जगणे कठीण झाले होते. अशा विषम परिस्थितीशी लढा देणाऱ्या या वनवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्याचे कार्य करण्याचा निर्धार येथील संघाच्या स्थानिक स्वयंसेवकांनी उचलला. अठरा वर्षांपूर्वी पंधरा डिसेंबर रोजी पूज्य नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेने देवपहरीमध्ये गौमुख सेवाधामची स्थापना झाली.




देवपहरीला केंद्रस्थानी ठेवून आसपासच्या चाळीस गावांच्या विकासासाठी योजना बनू लागल्या. बनवारीलाल अग्रवाल, किशोर बितोलीया, डॉ. ध्रुव बॅनर्जी, पी. एन. शर्मा यांसारखे संघाचे स्वयंसेवक व इंदू दीदींसारख्या सेवाभावी महिलांनी आपल्या जीवनाची काही वर्षे येथील सेवा कार्यासाठी दिली आणि चाळीस गावांचे विकासकार्य सुरू केले. संस्थेने झूम शेती करणाऱ्या या वनवासींना केवळ आधुनिक शेतीचे ज्ञान दिले नाही, तर त्यांना उत्पन्नवाढीचे अन्य मार्गही दाखविले. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या व आजारी व्यक्तींसाठी हॉस्पिटल. युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षम दिले, तर महिलांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला.


जताडाडचे सरपंच अमृतलाल राठी यांनी अथक प्रयत्न करूनही आपल्या गावात प्राथमिक शाळा सुरू करू शकले नाहीत. जवळच्या खेड्यांमधून चालणाऱ्या शाळांमधून शिक्षकांचे दर्शनही दुर्लभ होते. अशी शिक्षणाची अवस्था होती. पण जेव्हा त्यांचे सुपुत्र ज्ञान राठी याने रायपूर विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली, तेव्हा ते सर्वप्रथम मिठाई घेऊन गौमुख कार्यालयात आले. या सेवाधामच्या कार्यकर्त्यांनी तेथील विपरीत व प्रतिकूल परिस्थितीशी लढून आपले ध्येय कसे पूर्ण केले, याचे श्री अमृतलाल साक्षीदार आहेत. सेवाधामद्वारा सुरू केलेल्या एकलव्य विद्या मंदिरात ज्ञान राठीसारखे शेकडो विद्यार्थी शिक्षित झाले व पुढे आले आहेत. विद्यालयाच्या ममत्व मंदिर छात्रावासात आजही तीनशे विद्यार्थी तेथे राहून शिक्षण घेत आहेत. शाळेतून आतापर्यंत एक हजाराहून अधिक विद्यार्थी शिकून गेले आहेत. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव वृत्ती जागृत केली जाते. येथेच शिक्षण घेऊन श्री. पुरुषोत्तम उराव आज येथील प्रिन्सिपल आहेत आणि आपल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पुढे नेत आहेत.




डॉक्टर देबाशिष मिश्र आणि त्यांची पत्नी डॉक्टर सरिता यांचे उदाहरण घेऊ. लोक त्यांना आता आपले दैवत मानतात. सोळा वर्षांपासून येथील छोट्या आरोग्य मंदिरामध्ये शेकडो रुग्णांचे त्यांनी प्राण वाचवले आहेत. या आरोग्य सेवेद्वारे दर वर्षी लाखो रुपयांची औषधे निःशुल्क उपलब्ध केली जातात. संस्थेचे सचिव व संघाचे स्वयंसेवक श्री. गोपाल अग्रवाल यांनी सांगितले, की पूर्वी रुग्णांना खाटेवरून किंवा सायकलवरून उपचारासाठी आणले जात असे. पण, आता त्यासाठी चोवीस तास अॅम्ब्युलन्स उपलब्ध असते. इतकेच नाही, तर दर पंधरा दिवसांनी येथील गावात मेडिकल कॅम्प केले जातात. त्यामुळे कुपोषण समस्येचे निवारण झाले व जनन-मृत्यू दरातही घट झाली आहे.




गौमुखीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे स्वतःचे वीजनिर्मिती केंद्र आहे. चोरनई नदीवर छोटा बांध बांधून जलविद्युत पद्धतीने रोज पाच किलोवॅट विजेचे उत्पादन केले जाते. त्यामुळे छात्रावास, हॉस्पिटल व प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी वीजपुरवठा केला जातो. येथे अजूनही ना सरकारी वीज आली आहे, ना बीएसएनएलचे टॉवर. संस्थेच्या अध्यक्ष इंदू दीदींनी सांगितले, की परिस्थितीमुळे जे लोक नक्षलवादी बनविले जातात, अशांना आत्मनिर्भर व सुखी जीवनाचा मार्ग दाखवून, सेवाधामने कोरबाला बस्तर (नक्षलवादाचा किल्ला) होण्यापासून वाचविले आहे.

1189 Views
अगली कहानी