सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

आशेचे सृजन

देवीदास देशमुख | दिल्ली

parivartan-img

नैराश्याची वाढती सावट अणि धूसर होत चाललेल्या आशेच्या आधारावर कोणी कसे का्य आयुष्याची वाटचाल करू शकेल. पण असेच आयुष्य जगण्याचा अभिशाप लॉक डाउन च्या काळात राजधानी दिल्लीहुन फार दूर नसलेल्या पाकिस्तानी हिन्दू शरणार्थी शिविरात राहण्याऱ्या लोकांच्या नशिबी होता. 

रामूचे कुटुंबीय दोन दिवसांपासून भाकरीचे पाच तुकडे करून कसेबसे पोट भरत होते. शेजारीच सहा महिन्यांच्या बाळाच्या आईने काही खाल्ले नव्हतेअणि आता तर शरीरातील दूधही सुकत आले होते, त्यामुळे बाळाला पाजणेही शक्य नव्हते. ही काही कपोलकल्पित  गोष्ट नाही, तर राजधानी दिल्लीतील यमुना खादरच्या त्या भागाचे वास्तव आहे, जिथे  आजही लोक वीज आणि पाण्यासारख्या मूलभूत सोयींच्या अभावात , शहरापासून दूर यमुना नदीच्या बेटावर आपले जीवन जगत आहेत. पिण्याचे पाणीदेखील 5 किलोमीटर दूर वरून कंटेनरमध्ये भरून आणले जाते. मुले शिक्षणासाठी शाळेत नावेने जातात. मासे आणि भाजी विकण्याऱ्या  या मजुरांसाठी दिल्लीतील टोटल लॉकडाऊन तर उपासमारीच  घेऊन आला.



सेवा भारतीचे प्रांत संघटनमंत्री शुकदेवजी, स्वयंसेवक सहकारी व बहिणींसोबत नावेत शिधा साहित्य, कपडे, सॅनिटरी नॅपकिन, औषधे, पिण्याचे पाणी वगैरे घेऊन यमुना खादरला पोचले. सेवादूतांची नाव आता किनाऱ्याला लागलीच होती, की लहानांपासून मोठ्यांपर्यंत जवळपास 60-65 लोकांचे डोळे काही तरी मिळण्याच्या आशेने त्यांच्याकडे पहात होते. वस्तीतील झोपड्यांमध्ये रोजच्या कमाईतून पेटणाऱ्या रित्या चुली, रिकामी भांडी सगळी कहाणी सांगत होती. चिमुकले जीवांचे डोळे म्हणत होतेसंयमाचे अश्रू सुकले, आज तरी द्या फक्त दोन घास खायला” .हे सगळ पाहून प्रत्येकाचे डोळे ओले झाले होतेस्वयंसेवक बंधू-भगिनींना पश्चात्ताप होत होता, की आपण इतक्या उशीरा इथे का आलो ? दुसरीकडे 3 दिवसांपासून भुकेल्या असलेल्या वस्तीतील लोकांच्या डोळ्यांत दिलासा होताकी देवाच्या दरबारात उशीर आहेपण अंधार नाही...

आश्चर्य म्हणजे नावेवर सवार होऊन 5-6 शिवणकामाची मशीने या वस्तीत पोहोचली, आणि दिल्ली सेवा भारतीचे प्रांत कार्यालय मंत्री अंजू दीदी, आणि उपासना दीदी, यांनी स्वत: स्त्रियांना हातांनी मास्क शिवण्यास शिकवले. पाहता पाहता त्या वस्तीत प्रत्येक घराच्या चूलीतून स्वाभिमानाच्या भाकरीचा वास येऊ लागला. अडचणी अजूनही खूप आहेत, पण सेवेला सौभाग्य मानणाऱ्या या सेवादूतांच्या मदतीने, या वस्तीच्याच लोकांनी नाही तर दिल्लीतील झंडेवालान मंदिराभोवती भीक मागणाऱ्या लोकांनीसुद्धा स्वावलंबनाची कला आपल्या हातात रुजवून माती व शेणाच्या इको-फ्रेंडली गणपतीबाप्पांच्या मूर्तींमध्ये रंग भरले. दररोज 200 ते 300 रुपायाच्यी भिक मागणारे ते हात आज आपल्या मेहनतीचे पैसे घेण्यासाठी उठत आहेत. तसेच एकेकाळी भीक मागून गुजराण करणाऱ्या 57 महिला लोकल टू व्होकल कॅम्पमध्ये आता करवाचौथच्या थाळ्या सजवताना दिसतात.




सेवाभारती दिल्ली प्रांताचे प्रचारमंत्री भूपेंद्रजी म्हणतात, की केवळ दिल्लीतच 12500 पेक्षा अधिक स्वयंसेवक आणि सेवा भारती कार्यकर्त्यांनी 1,91000 शिधा पाकिटे आणि 91 लाख लोकांना तयार अन्नाची पाकिटे वाटली. ज्यांच्या वेदना सुसंस्कृत समाज कधीच समजून घेऊ इच्छित नाही, अशा देहविक्रयाच्या दलदलीत अडकलेल्या, कोरोना काळात अन्नाला महाग झालेल्या, दिल्लीच्या जीबी रोड रेडलाईट भागातील 986 महिलांनी स्वयंसेवकांच्या तोंडातून जेव्हां बहनजी व माताजी असे संबोधन ऐकले, तेव्हा त्या रडायलाच लागल्या व रेशन किट घेऊन विनंती करू लागल्या, की इतका आदर देऊ नका. त्याचबरोबर मयूर विहार कॉलनीत वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या किन्नर समाजाने कार्यकर्त्यांना केवळ आदरपूर्वक वागणूकच दिली नाही, तर अनेक आशीर्वाद दिले आणि रेशन उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.




ते हिंदू आहेत, पण त्यांच्याकडे भारतीयतेची ओळख नाही. पाकिस्तानमधील या शरणार्थींच्या दु:खाचा अनुभव यमुनेच्या काठी असलेल्या दाट जंगलातील छावण्यांमध्ये गेल्यास सहज येऊ शकतो. सेवा भारती मातृमंडळाची टीम जेव्हा रेशन किट घेऊन तेथे पोहोचली तेव्हा असे दिसून आले की त्या शिबिरांमध्ये सुमारे 20 ते 25 महिला गर्भवती आहेत. रूग्णालयात ओपीडी बंद आहेत. आपत्कालीन सेवा देखील क्वचितच सुरू आहेत. साधे भोजनदेखील जिथे अवघड होते, तिथे  गर्भवती महिलांसाठी पौष्टिक आहार तर केवळ अशक्यच होता. भूतकाळातील चाबूकांच्या खुणा भविष्यावरही स्पष्टपणे दिसत होत्या. मातृमंडळाच्या भगिनींचा ऊर भरून आला. त्यांनी या महिलांसाठी खास डिंकाचे लाडू, ड्राय फ्रूट्स, डाळीचे पीठ, हरभरा, देशी तूप, दुधाची पावडर आणि इतर आवश्यक पदार्थ मिसळून खास पौष्टिक आहार किट तयार केले अणि वाटले . आता सेवाभारतीद्वारे चालवली जाणारी व्हॅन दर 15 दिवसांनी डॉक्टरांसोबत तिथे जाते आणि या महिलांची काळजी घेते. त्या कुटुंबातील मुले व वयोवृद्धांनादेखील योग्य औषधे व सल्ला हे लोक देत आहेत.

एखादी भक्कम संघटना कठीणातील कठीण परिस्थितीतही हार मानत नाही, किंबहुना जितक्या समस्या तितके उपाय या आधारावरच काम करते . हृदयातील सेवेची ज्योत प्रज्वलित ठेवत निरंतर पुढे जाणारी ही पावलेप्रत्येक अडथळा पार करत पुढे जात आहेत. अडचणींशी स्वयंसेवकांच्या संघर्षाची नवीन कहाणी पुढल्या अंकात.. . . .

856 Views
अगली कहानी