सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

देवदूतानंच अवतरण

प्रदीप पाटिल | राजस्थान

parivartan-img

चमचमणारे वाळूचे डोंगर पाहणे, हे पाहणाऱ्यांसाठी खरोखरच एक विलोभनीय दृष्य असते. पण जेव्हा तेच वाळूचे डोंगर पुराच्या पाण्याबरोबर एखाद्या घरामधे संकट बनून शिरतात, तेंव्हा एका क्षणात होत्याचे नव्हते करून टाकतात. १४ ऑगस्ट २०२० चा दिवस असंच काहीसं संकट घेऊन आला. जयपूर येथील गणेश पुरी अणि जवळच्या दोन वसाहतींमध्ये या संकटाने हाहाकार उडवला. या दिवशी पडलेल्या  प्रचंड पावसामुळे पूराची  स्थिती निर्माण झाली. या पावसाने गणेश पुरी वसाहतीच्या नावाने अशी एक विचित्र कहाणी लिहून ठेवली की ती  कहाणी, ना ते वसाहतीतील बांधव विसरू शकतील ना, आपण. वसाहतीच्या जवळ असणारे व एरव्ही दुरून चमचमणारे वाळूचे ते ढीग पुराच्या पाण्याबरोबर गणेशपुरी वसाहतीत शिरले. आयुष्य भराच भांडवल असलेली गरीब लोकांची ती माती विटांची घरे, त्या रेतीमुळे पाच ते सहा फूट गाडली गेली.





घरातील सर्व सामान त्यात गाडले गेले. कपडे, भांडी-कुंडी, पोटाची आग विझवणारे स्वयंपाकाचे साहित्य आणि चुली तसेच शाळकरी मुलांची वह्या पुस्तके ,शाळेचे साहित्य इतकंच नाही तर उदर निर्वाहाचे साधन असलेले, घरासमोर लावलेले ई रिक्षा व आटोरिक्षा हेही त्यात गाडले गेले. सर्वत्र हाहाकार उडाला होता. लोक सैरभर होऊन जिवाच्या आकांताने ओरडत होते. जयपूर शहराच्या खालच्या बाजूला असलेल्या या तीन गरीब वसाहती मधील शंभर ते दीडशे बांधवांचे जीवन नैसर्गिक आपत्तींने काही मिनिटात होत्याचे नव्हते केले होते. या घनघोर संकटात सापडलेल्या वसाहतीतील बांधवांच्या मदतीसाठी अंधकारमय परिस्थितीत संघाचे स्वयंसेवक देवदूतांसारखे धावून आले. संघ स्वयंसेवकांनी सर्वात पहिल्यांदा येथील बांधवाना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर तात्काळ त्यांच्या भोजनाची सोय ही करणे आवश्यक होते, कारण त्यांचे स्वयंपाकाचे सर्व साहित्य रेतीच्या खाली गाडले गेले होते.






जयपूर नगराच्या प्रौढ शाखेचे कार्यवाह श्री राजकुमार गुप्ता म्हणाले की, या आपद कालीन घटनेची माहिती स्वयंसेवकांना संध्याकाळी ३.३० ते ४ च्या सुमारास कळली, त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत सुमारे २८०० भोजन पाकिटे स्वयंसेवकांच्या घरांमधून उपलब्ध करण्यात आली होती . टॉर्चच्या उजेडात या पाकिटांचे वाटप बाधित कुटुंबियांना करण्यात येत होते. आपत्तीमुळे रडून रडून थकलेल्या बंधू भगिनींचे डोळे टॉर्चच्या उजेडात पाहताना, सर्वांचीच मने खिन्न झाली होती. वसाहतीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका मंदिरात सर्वांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करून स्वयंसेवक आपापल्या घरी परतले. परत जाताना स्वयंसेवकांनी  बाधित कुटुंबियांना या संकटातून पूर्णपणे बाहेर काढण्याचा संकल्प केला.

 

त्या विनाशकारी घटनेची सुरुवात १४ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी झाली. कोपलेल्या इंद्र देवांनी जयपूर परिसरात अतिवृष्टीला सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही तासातच गुलाबी शहर म्हणून सर्व जगाला परिचित असलेल्या जयपूर शहराच्या अनेक भागात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने शहराला तलावाचे स्वरूप आले होते. चारचाकी गाड्या खेळण्यातील गाड्याप्रमाणे पाण्यावर तरंगू लागल्या. त्याचा सर्वात जास्त परिणाम तळाशी असलेल्या वस्त्यांमध्ये झाला. पायथ्यामध्ये वसलेल्या गणेशपुरीच्या मागील बाजूस बांधलेल्या एनिकुटची (छोट्या धरणाची) भिंत पाण्याचे दाब सहन करू शकली नाही, आणि धरणाच्या पाण्याने जवळच असलेल्या, दोन महाकाय वाळूचे ढिगारे सोबत घेऊन त्या तीन छोट्या कच्च्या वसाहतीत प्रवेश केला. 




 

जेसीबीच्या मदतीने माती काढून प्रशासनाने आपले कर्तव्य संपवले, परंतु परिस्थिती सामान्य होईपर्यंत संघाचे स्वयंसेवक तेथे आठ दिवस राहिले. जवळच्या लाल डुंगरी गणेश मंदिरात तात्पुरती  स्वयंपाकाची व्यवस्था करुन, सर्वात आधी वसाहतीतील लोकांच्या जेवण खाण्याची व्यवस्था करण्यात आली. संघाचे सामाजिक कार्यकारिणी सहप्रमुख मनोज जैन म्हणाले की , संघाचे स्वयंसेवक येथेच थांबले नाहीत, तर काहींनी माती काढण्यासाठी व वस्त्र व भांडी सुकविण्यासाठी तेथील लोकांसह कुदळ व फावडे हातात घेतले. काही जोड़ी कपडे अणि काही भांडी कुण्डी शहरातून एकत्र करुन गणेशपुरी अणि जवळच्या वसाहतीतील लोकांना देण्यात आली. एव्हढेच नव्हे तर दहा दिवस पुरतील अशी शिध्याची पाकिटे सुद्धा त्यांना देण्यात आली. आठ दिवस चाललेल्या या श्रमदानाने माती घराबाहेर गेली होती. वस्तू सुकल्या होत्या आणि लोकांचे जीवन हळूहळू रुळावर येऊ लागले होते.  मग जेव्हा त्यांची काळजी घ्यायला काही राजकीय लोक आले, तेव्हा त्यांनी आणलेली जेवणाची पाकिटे नाकारून तेथील लोक त्याना स्पष्ट शब्दांत म्हणाले,   "आता हा दिखावा दाखवू नका, जेव्हा आम्हाला  सर्वात जास्त गरज होती, तेव्हा या स्वयंसेवकांनीच आमच्या सर्व अडचणी दूर केल्या.

 

नशिब आणि मानव यांच्यातील लढाई आजही सुरू आहे. जेथे जेथे निसर्गाद्वारे मानवतेचा नाश होतो, तेथे तेथे देवदूतानंप्रमाणे अवतरून त्या अवशेषांवर विश्वासाची फुले वाढवण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, स्वयंसेवक देशभर करीत आहेत.

765 Views
अगली कहानी