सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

आयुष्याच्या संधिप्रकाशात शेकड्यांनी सावरलेले बालपण

माधुरी आफळे | मेहसाणा | गुजराथ

parivartan-img

भूतकाळातल्या अंधारात आपलं दुर्दैवी आणि कुपोषित बालपण न्याहाळताना मिठाराम चा गळा भरून येतो. आठ वर्षाचा मोठा,व  सहा वर्षाचा छोटा भाऊ आणि आई, यांच्यासह रस्त्याच्या कडेच्या फुटपाथ ला आपलं घर मानणारा मिठाराम, आकाशाच्या उघड्या चादरीखाली रात्रभर कुडकुडताना अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधायचा. प्रत्येक सकाळी सूर्योदयाच्या पहिल्या किरणापासूनच गुन्हेगारी आणि व्यसनी लोकांपासून स्वतः वाचत, आणि भावंडांना वाचवत, आपल्या भावांबरोबर भीक मागताना, शिव्याशाप व तुच्छतेचे कटाक्षही काही नाण्यांबरोबर त्याच्या ओंजळीत पडायचे. भीक मागणारे  तेच छोटे हात आज भीलवाडा येथील देवनारायण हॉटेलमध्ये स्वादिष्ट पदार्थ तयार करून सगळ्यांचे पोट भरत आहेत, यावर त्याचा स्वतःचाही विश्वास बसत नाही.


स्वतःच्या जीवनात झालेल्या या परिवर्तनाचे श्रेय तो 66 वर्षाचे वय असलेले संघ स्वयंसेवक, जयंतीभाई आणि त्यांची पत्नी अरुणाबेन यांना देतो.देशभरात ज्या ठिकाणी पूर भूकंप आणि कोरोनासारख्याआपत्तिंचा कहर असेल,त्या ठिकाणी राहून सेवा देणारे गुजरात मधील हे ज्येष्ठ जोडपे, सर्वांच्यासाठी एक प्रेरणास्थान  आहे.आयुष्याच्या सायंकाळी दुसऱ्याचा आधार घेऊन जगणाऱ्या जगात, त्याच वयामधेजयंती भाई आणि अरुणाबेनमेहसाणा गुजरात मध्ये “बाल भिक्षुक मुक्त शिक्षित समाज” हा उपक्रम चालवतात. जयंतीभाई सांगतात की2000 पासून मेहसाणा प्रांतात चालू असलेल्या या उपक्रमात आज जवळजवळ 245 तात्पुरती घरे बांधली गेली आहेत, ज्यामध्ये राहणारी, कधीकाळी भीक मागत असलेली ही मुलं, आता समाजाच्या सहाय्याने आपले शिक्षण पुरे करीत आहेत. त्यांच्याकडून राहणे,जेवण ,शिक्षणाचे कुठलेही शुल्क घेतले जात नाही,तरइथे राहून ही मुले गुन्हेगारीच्या जगापासून, आणि भीक मागण्याच्या मानसिकतेपासून स्वतःला दूर ठेवून आत्मविश्वासाने, नव्या आयुष्याकडे वाटचाल करत आहेत.

गुजरातचे सह प्रांत सेवा प्रमुख अश्विन कडेचा सांगतात की 1984 ते 1992 पर्यंत पालनपुर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह असलेले जयंतीभाई पटेल,2000 पर्यंत लघुउद्योग भारतीत सेवारत होते. पालनपुरमधेच विविध विद्यालक्ष्मी मंदिर मधे अभिभावक समितिचे अध्यक्षपद भुषवणारे जयंती भाई पटेल, यांना लहान मुलांसंबंधी अतिशय कळवळा आहे.  अरावली पर्वतरांगेच्या पायथ्याशी राहणारी वनवासी मुलं, धनुष्यबाण घेऊन उघडी-नागडी हिंडताना बघितल्यावर, या सेवाभावी जोडप्याचे हृदय भरून यायचे.अरुणाबेनसांगतात,की त्यांनीत्या काळात प्रत्येक महिलेकडून दरमहा दहा रुपये घेऊन जवळ-जवळ  500 भगिनींचे एक मंडळ तयार केलं, आणि सेवा वस्तीत बालसंस्कार केंद्राला सुरुवात केली. जे आज सरस्वती शिशु मंदिराच्या नावाने ओळखले जाते. 

खऱ्या स्वयंसेवकाची द्रष्टिनेहमीच आपण उत्तमोत्तम सेवा कशी देऊ, याच्याकडे असते. सन 2000 मध्ये मेहसाणा येथे  आल्यानंतर, जयंती भाईंच्या मनात रस्त्याच्या कडेला फूटपाथवर राहणाऱ्या अणिभीक मागणाऱ्या मुलांना बघून, कणव उत्पन्न झाली.पोटाची भूक हीच दुसऱ्या समोर हात पसरायला अगतिक करते, नाहीतर भीक मागण्यात कुणाला आनंद होतो का? असे बधिर करणारे प्रश्न समोर आल्यावरजयंतीभाईंनी आपल्या आसपास असणाऱ्या पणवेगवेगळ्या शहरातून आलेल्या, सहा ते पंधरा वर्षेवयोगटाच्या 16 बाल भिक्षेकरी मुलांना गोळा करून, जिल्हा कलेक्टर च्या परवानगीनेसरकारी जमिनीवर 16 तात्पुरती घरे बांधून त्यात 45 मुलांना पालकांबरोबर रहायची संधी मिळवून दिली. पोटाच्याभूकेचीसोय आणि डोक्यावर छप्पर मिळाल्यावर,मुलांची हुशारी समोर दिसून आली. शिक्षण पूर्ण करण्यासाठी या मुलांचा योग्य त्या शाळेत प्रवेश करवला गेला.आज तात्पुरत्या घरात राहताना भीक मागून जगण्याची वृत्ती सोडणाऱ्या, तीनशेहून जास्त मुलांना शाळेत जाताना बघून प्रसन्नतेने भरून आलेले जयंती भाई आणि अरुणाबेन दरवर्षी त्यांच्यासाठी चप्पल,दप्तर,वह्या पुस्तके यांचा खर्च स्वतःहून करतातच, पण त्याच बरोबर वर्षातून एकदा सर्व मुलांना आपल्या खर्चाने शैक्षणिक सहलीलासुद्धा घेऊन जातात.

गेल्या वीस वर्षापासून चालू असलेल्या या योजनेत मिठाराम प्रमाणेच अनेक मुलं लाभान्वित झालीआहेत, त्यातील दोनशेहून जास्त तरुणआचारी, ड्रायव्हर, प्लंबर तसेच वेगवेगळ्या फॅक्टरीत काम करून, स्वतःच्या पायावर उभी आहेतच, पण त्याच बरोबर दुसऱ्या मुलांना ही मदत करतात.जवळ जवळ दहाहून जास्त कुटुंबे स्वतःच्या मालकीच्या घरात राहतात, तर आणखीन 22 कुटुंब याच दिशेने वाटचाल करीत आहेत.


सेवाभावी व्यक्तीला कुठलेच क्षेत्र वर्ज्य नसते. वृक्षारोपणापासून सुरुवात केलेल्या आणि आता जवळजवळ वीस हजाराहून जास्त झाडे दरवर्षी सार्वजनिक ठिकाणी लावणारे जयंती भाई पटेल 2016 सालच्या गुजरात सरकारच्या ग्रीन ब्रिगेडियर या पुरस्काराने सन्मानित आहेत. अन्नाचे महत्त्व समजणाऱ्या अरुणाबेनयांनाजेव्हा आपल्या ओळखीच्या विवाह समारंभातगेल्यावर उरलेलं स्वच्छ अन्न बघून एक आगळा वेगळा विचार सुचला,आणि त्यातूनच 2015 साली अक्षय व्रताची सुरुवात झाली. या उपक्रमाच्या अंतर्गत एका वाहना मार्फत कुठल्याही मोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उरलेलं स्वच्छ अन्न एकत्रित करून दोन तासात ज्यांना जरूर आहे,त्यांच्याकडे आणि सेवा वस्तीत पोहोचवलं जात.रोज जवळ जवळ पाचशे ते पाच हजार लोकांपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अक्षयरथाच्या माध्यमाने जेवण पोहोचवलं जातं . हा अक्षय रथ बोलावण्यासाठी जो मदत नंबर आहे, तो इतका प्रसिद्ध झाला की त्याचा परिणाम म्हणून आजूबाजूच्या पाच-सहा शहरात याच धर्तीवर अन्न वाटपाशी संबंधित संस्था, आणि लोक अशाच प्रकारेकाम करत आहे. प्रत्यक्ष सेवा करणे हीच सेवेची प्रेरणा आहे. आज जवळजवळ 60 हुन जास्त व्यक्ती जयंतीभाईंना बघून या निस्वार्थ सेवेत सहभाग देतात.


“भीक मागणं चांगलं नाही असे  सांगणारे खूप जण असतात, परंतु त्यांना तात्पुरत्या घरात आश्रय देणारे,हात धरून स्वाभिमान आणि आत्मनिर्भरते ची वाट दाखवणारे, त्यांच्या अडचणीं मुळापासून उखडून टाकणारे काही वेगळेच”.

1559 Views
अगली कहानी