सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

सेवेचा पर्याय-श्री विष्णु कुमारजी

सौ. विद्या सतिश कुंटे | मध्यप्रदेश

parivartan-img

50च्या दशकात शुगर टेक्नॉलॉजीतील अभियंताची पदवी आणि हिंदुस्थान एअरक्राफ्ट कंपनीत नोकरी..... 23 वर्षाच्या युवकासाठी ह्या पेक्षा चांगली अशी आयुष्याची सुरुवात काय असू शकेल? परंतु कदाचित बेंगलोर पासून 90  किलोमीटर दूर अक्कीपुरम येथील संभ्रांत राजौरिया कुटुंबातील सातवा मुलगा विष्णू, ह्याची स्वप्ने जगापेक्षा वेगळी होती। त्याला हलाखीत जीवन जगणाऱ्या साधनहीन लोकांचे जीवन सावरायचे होते, रस्त्यांवर टाकून दिलेल्या  अर्भकांना एक मानाचे जीवन द्यायचे होते, आणि म्हणूनच 1962 साली विष्णू राजोरिया यांनी  जेंव्हा आपले पिता " श्री अनंत राजोरिया" यांच्याकडे संघ प्रचारक म्हणून निघायची ची परवानगी मागितली तेंव्हा त्यांना कळून चुकले की आपला मुलगा आता परत कधी घरी परतणार नाही। दक्षिण भारतात जन्म घेऊन उत्तर भारतात दिल्ली ते भोपाळ पर्यंत सेवा कार्यांची एक विशाल साखळी तयार करणाऱ्या विष्णुजींना आयुष्याच्या अंतिम दशकात सेवेचा पर्याय मानण्यात आले होते।

विष्णूजींना जाणीव होती की गरिबांना औषधें मिळत नाहित आणी मिळाली तर त्यासाठी एक दिवसाची  मजुरी जाते । विष्णूजींच्या मनातील ह्या वेदनेनेच दिल्लीतील पहिल्या मोबाईल मेडिकल वाहनाला जन्म दीला , आणि आज आज देशात शेकडो मोबाईल वैद्यकीय वाहने सेवा भारती च्या माध्यमातून मलीन वस्त्यांमध्ये जाऊन मोफत औषधे, आणी प्राथमिक उपचार पुरवत आहेत । विष्णजींच्या प्रेरणेनेच रस्त्यावर सोडून देण्यात आलेल्या निर्दोष बालकांना सन्मानाचे जीवन देण्यासाठी प्रथम दिल्ली येथे, आणि नंतर भोपाळ येथे "मतृछाया" ची सुरुवात झाली। आज देशभरात जवळ जवळ 36 मातृछाया प्रकल्पांच्या मध्यामातून शेकडो अनाथ मुलांना आईवडिलांची ची माया मिळाली आहे, तर अनेक अपत्यहीन जोडप्यांना मुलांचे सुख मिळाले आहे। 



याचप्रमाणे वस्तीतील तरुणांसाठी संस्थेतर्फे रोजगार प्रशिक्षण केंद्र, महिलांसाठी शिवणकाम काम व भरतकाम केंद्र,  आणि मुलांसाठी संस्कार केंद्राची स्थापना केली गेली। जेंव्हा विष्णुजी दिल्लीहून मध्य प्रदेशला आले तेंव्हा त्यांना लोकांची साथ मिळत गेली, ज्यामुळे मध्यप्रदेशातील कोपऱ्या कोपऱ्यात सेवा प्रकल्प ऊभे राहिले। मध्यप्रदेशाचे क्षेत्र सेवा प्रमुख श्री गोरेलाल बारचे सांगतात की गुरुजींच्या ( तेथे त्यांना गुरुजी असेच संबोधित केले जात असे )  प्रेरणेनेच मध्यप्रदेशा मध्ये 21वसतीगृह, 6 मातृछायां सहित 400 सेवाकार्य सुरू झाली। 

जेंव्हा विष्णुजी कानपूरहुन दिल्लीला पोहोचले तेव्हा संघातर्फे ह्या सूचना रुजू झाल्या  की, वंचित वर्गांकरीता  काम सुरु करायची आहे। कुठलाही भरीव आराखडा तयार होई पर्यंत, ते स्वतः फुटपाथवर एका झाडाखाली गोणपाटावर बसून एक  मुलाला शिकवू लागले। विष्णूजीना शिकवताना बघून एक सद्ग्रहस्त श्री लाला सिंग राम गुप्ता खुर्ची घेऊन आले, आणि पुढे त्यांच्याच आर्थिक मदतीने , आज दिल्लीतील सावन पार्क येथे  हुशार गरीब मुलांकरिता तीन मजली वसतीगृह बनले आहे,  जेथे आज दिल्ली सेवा भारती मार्फत अनेक प्रकल्प राबविले जातात।

असे म्हटले जाते की, विष्णू जींच्या पाच फुट सडपातळ शरीरात एक एक विराट व्यक्तीत्व होते, ज्याने प्रभावित होऊन काहींनी आपले तन समर्पित केले, काहीं मनाने जोडले गेले, तर कित्येक जणांनी सेवेसाठी आपले जीवनच अर्पण केले। विश्व हिंदू परिषद चे अंतरराष्ट्रीय  महामंत्री श्री श्यामजी गुप्त, श्री स्वांत रंजन असे अनेक तरुण विष्णूजींच्या प्रेरणेने संघ प्रचारक बनले, आणि त्यांनी विलक्षण यंत्रणा उभी केलि।  विष्णूजींचा अनेक वर्ष सहवास लाभलेले वरीष्ठ प्रचारक आणि सेवा इंटरनॅशनल चे संयोजक श्री श्याम परांडे ह्यांचे तर असे म्हणणे आहे की, विष्णुजी  हे दानशूर लोकांच्या मनावर राज्य करीत असत। ते ज्यांच्याकडून जितकी देणगी  मागत तेवढे त्यांना मिळत असे। दिल्लीतील गोपाल धाम वसतिगृह असो की भोपाळचे सेवाधाम मंदिर असो, विष्णूजींच्या विनंतीवरून कोणी फुकट स्टील, कोणी वीटा, कोणी साळ्या तर कोणी पूर्ण जमीनच प्रकल्पासाठी दान दिली। घोर आजारपणात मृत्युशय्येवर असतानाही  ते फोन वरून प्रकल्पांसाठी पैशांची  व्यवस्था करीत होते।

विष्णुजी सेवेत इतके रमले होते, की सेवा भारती शिवाय ते वेगळी ओळख स्वीकारु शकत नव्हते। दिल्लीत एक जुने स्वयंसेवक मायाराम मतंग यांनी जेंव्हा त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याची इच्छा व्यक्त केली, तेंव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला। ते म्हणत असत, की मी जीवंत आहे तोपर्यंत हे शक्य नाही। जोपर्यंत मी जीवंत आहे, तोपर्यंत सेवा भारती हीच माझी ओळख असेल। ह्याच समर्पित वृत्तीने आणि सेवा भावनेने केलेल्या बीजारोपणाचा, आज एक विशाल वृक्ष झाला आहे , आणि देशभरात वेगवेगळ्या प्रकल्पांद्वारे आपली सेवा देत आहे।




विष्णूजींना जर खाऱ्या अर्थाने समजायचे असेल तर संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी ह्यांच्या ह्या शब्दांनी जाणता येईल, ते म्हणतात..... “विष्णुजी साधनांसाठी कधी थांबले नाहीत, सहयोगाच्या अभावाने कधी थकले नाहीत, आणी परिस्थिती समोर कधी झुकले नाहीत"।

1296 Views
अगली कहानी