सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

बाळासाहेब देशपांडे- एक मूक तपस्वी

छत्तीसगड

Play podcast
parivartan-img

वनवासी कल्याण आश्रमाचेजनक - बाळासाहेब देशपांडे

७४ वर्षांपूर्वी नागपूरहून एक तरुण ७०६ किलोमीटरचे अंतर पार करून जशपूरला पोहोचला. ही काही साधीसुधी घटना नव्हती. समृद्ध सांस्कृतिक वातावरणाचे प्रतीक असलेल्या नागपूरमुळे सांस्कृतिक अस्मितेच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या जशपूरच्या दिशेने टाकलेले हे एक ऐतिहासिक पाऊल होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिल्या पिढीचे स्वयंसेवक बाळासाहेब देशपांडे १९४८ मध्ये तत्कालीन मध्य प्रांतातील (सध्याचे छत्तीसगड) दुर्गम वनक्षेत्र जशपूर येथील वनवासींना शिक्षित करण्यासाठी, त्यांना त्यांच्या संस्कृतीशी जोडण्यासाठी आणि त्यांचा आत्मसन्मान परत आणण्यासाठी तेथे गेले होते. जशपूर हेकेंद्र ठेवून देशविघातक घटकांच्याआव्हानांना तोंड देत वनवासीकल्याणाचे मोठे कार्य त्यांनी केले. सुरुवातीलासरकारच्या सहकार्याने आणि नंतर स्वतंत्रपणे वनवासींना त्यांच्या मुळाशी जोडण्याच्या या अविरत कार्यादरम्यान १९५२ मध्ये "वनवासी कल्याण आश्रम" हीदेशातील सर्वात मोठी वनवासी संस्था उदयाला आली.आज देशभरात वनवासींसाठी १९३९८ सेवा प्रकल्प राबवणाऱ्याकल्याण आश्रमाचे जनक बाळासाहेब देशपांडे हे एकनि:स्वार्थी कर्मयोगी होते.

कधीकाळी आपल्या वीणावादनाने इतरांना मोहवून टाकणाऱ्याबाळासाहेबांचा जन्म २६ डिसेंबर १९१३ रोजी अमरावती येथे झाला. केशव देशपांडे आणि श्रीमती लक्ष्मीबाई यांचे सुपुत्र रमाकांत (बाळासाहेब) यांनी निर्माण केलेले ऐतिहासिक कार्य संघाच्या अनेक पिढ्या आपल्या कृतीआराखड्यासाठी आधारभूतमानतील.

रमाकांत लहानपणापासून मन लावून अभ्यास करायचे. नागपूरयेथे एम.ए., एल.एल.बी.पर्यंतचे शिक्षणघेतल्यानंतर त्यांनी रेशनअधिकाऱ्याचीनोकरीहीकेली. पण एकाप्रसंगात सरकारकडून योग्य न्याय न मिळाल्याने त्यांनी नोकरी सोडून रामटेकमध्ये वकिली सुरू केली. ज्यांना मोठी कामे करावी लागतात, त्यांचे आयुष्य सामान्य माणसांसारखे असत नाही, हेच खरे!

कदाचित त्यामुळेच रमाकांत यांनी आपलीचालू असलेली वकिली सोडली आणिएकाआव्हानालाते सामोरे गेले. प्रसिद्ध समाजसेवक वाणीकर यांच्या आवाहनावरून व संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या संमतीने ते मागासक्षेत्र विकास अधिकारी म्हणून जशपूरला पोहोचले.

वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संघटनमंत्री गुणवंतसिंह कोठारी सांगतात की, बाळासाहेब जशपूरला पोहोचले तेव्हा तिथला वनवासी समाज आपली अस्मिता आणि अस्तित्व जपण्यासाठी धडपडत होता. नक्षलवादी घटकांच्या समांतर सत्तेपुढेस्वातंत्र्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ल यांचे सरकारहीहतबलहोते. वनवासींना केवळ आपल्या परंपरेचा विसर पडतहोता, असे नाही; तर देशाप्रती बंडाची भावनाही त्यांच्यात रुजत होती. या समाजाला आपल्यामुळाशी जोडण्यासाठीसेवेच्या माध्यमातून त्यांना आपलेसेकरून, त्यांचा विश्वास जिंकावा लागेल" गुरुजींच्या या वचनाला बाळासाहेबांनी आपला जीवनमंत्र मानला.  बाळासाहेबांनी १९४८ मध्ये जशपूर येथे शिक्षणक्षेत्राच्या माध्यमातून आपल्या कार्यालासुरुवात केली. प्रवाहाविरुद्धपोहण्यापेक्षा प्रवाहाला दिशा देण्याचा मार्ग त्यांनी निवडला.

वर्षभरात शासनाच्या माध्यमातून आश्रमाच्या १०० प्राथमिक शाळा व  ८ माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. या शाळांसाठी त्यांनी जातीने निरोगी, कणखर आणि चारित्र्यवान शिक्षकांची नेमणूक केली. शिक्षण क्षेत्रातील चर्चची मक्तेदारी संपुष्टात आणल्यानंतर बाळासाहेबांनी वनवासींना त्यांच्या धार्मिक परंपरेशी जोडण्याची मोहीम सुरू केली. त्यांनी त्या वेळच्या उरांव व कंवर जमातीचे नेते व साधुसंत यांच्यासमवेत सनातन धर्म सभेची स्थापना केली. जशपूर व आजूबाजूच्या गावांमध्ये ठिकठिकाणी भजनमंडळे स्थापन करून संकीर्तनाला सुरुवात झाली. अवघ्या वर्षभरात विलक्षण बदल झाला.

कुनकुरीयेथे मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ल यांना या भागात प्रवेश न देणाऱ्या वनवासींनी १९४९ मध्ये कांसाबेल येथे ठक्कर बाप्पाचे फुलांनी आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले आणि 'भारत माता की जय'चा जयघोष केला.

आपल्या तत्त्वांवर ठाम असणाऱ्या या तरुण कार्यकर्त्याचाखरा कसोटीचा काळ सुरू झाला, जेव्हा१९५१ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आलेले तत्कालीन सरकार वनवासींच्या कल्याणाबाबत पूर्णपणे उदासीन झाले. बाळासाहेबांना कुठल्याही प्रकारचंसहकार्य मिळणं बंद झालं. नाईलाजानेत्यांनानोकरीचा राजीनामा द्यावा लागला आणि पुन्हा वकिली सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तेव्हाबाळासाहेबनागपूरमध्ये परमपूज्य गोळवलकर गुरूजींना भेटले आणि तिथेच त्यांना त्यांच्या पुढील कामासाठीची दिशा मिळाली. "समाजकार्यहीकेवळ सरकारच्या पाठिंब्यावर होतनसतात. संस्थेची नोंदणी करा आणि वनवासींचे कार्य पुढे न्या,” गुरुजींचेहे वाक्य आपलं जीवनध्येय करून ते परत नागपूरला आले.यावेळी ते एकटे नव्हते, त्यांच्यासोबत खंडवा विभागाचे विभागप्रचारक मोरूभाऊ केतकरही होते. बाळासाहेब आणि मोरूभाऊ दोघेमिळून इथल्या खडतर जंगलातमैलोन् मैल सायकल चालवत घरोघरी जाऊन संपर्क करत वनवासींना आपलंसकरीतहोते.

जशपूर संस्थानाचे राजे विजय भूषणसिंह जुदेव या कार्यकर्त्यांमुळे इतके प्रभावित झाले की, त्यांनी आपल्या जुन्या राजवाड्यातील दोन खोल्या या कामासाठी दान केल्या. एवढेच नव्हे तर समाजकल्याणाचे हे कार्य मधेचथांबू नये यासाठी महाराजांनी वेळोवेळी निधीची व्यवस्थाही केली. अखेर तो ऐतिहासिक दिवस आला जेव्हा २६ डिसेंबर १९५२ रोजी वनवासी कल्याण आश्रमाचे पहिले वसतिगृह राजासाहेबांच्या जुन्या राजवाड्यात स्थापन झाले. अडचणी असंख्य होत्या, पण या तपस्वी साधकांचा निर्धार कधीच डळमळीत झाला नाही. वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख प्रमोद पैठणकर सांगतात की, वसतिगृहाची सुरुवात १३ मुलांपासून झाली. सुरुवातीच्या काळात या मुलांसाठी जेवण देणंही खूप अवघड होतं. बहुतेक खर्च बाळासाहेबांनी त्यांच्यास्वत:च्या उत्पन्नातून केला होता.


प.पू.बाळासाहेब देवरसजी आणी राजा विजयभूषणसिंग जुदेव जीं सोबत 

मोकळ्या ढाकळ्या, स्वच्छंद वनवासी मुलांना शिस्तीत बांधणे फार अवघडहोते; तरीपण बाळासाहेब आणि मोरूभाऊ यांनी त्यांना अत्यंत आपुलकीने विशिष्ट दिनचर्या आणि सुसंस्कृत शिक्षणाची सवय लावली. हळूहळू वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्याही वाढू लागली. बाळासाहेबांच्या पत्नी प्रभावती देवी यांनी या खडतर प्रवासात प्रत्येक पावलावर बाळासाहेबांना खंबीर साथ दिली. बाळासाहेबांचे धाकटे चिरंजीव सतीशजी सांगतात की, त्यांची आई प्रभावती देवी यांना सर्व मुले आणि कार्यकर्तेही‘आई’ म्हणत असत.

दिवसेंदिवस बाळासाहेबांचा वनवासींच्या कल्याणाचा संकल्प दृढ होत चालला होता. काम पुढे नेण्यासाठी सातत्यपूर्णप्रवासआणि नवे कार्यकर्ते उभे करणे आवश्यक होते. त्यासाठी बाळासाहेब आणि मोरूभाऊ वाहन नसलेल्या, हिंसक प्राणी असलेल्या,दाट खडतर जंगलात सायकलवरून२५-२५ किलोमीटरचाप्रवास करत होते. वनवासींना कामाचे महत्त्व पटवून देत होते.१९५६ मध्ये जेव्हा वनवासी कल्याण आश्रमाची रीतसर संस्था म्हणून नोंदणी झाली; तोपर्यंत पुष्कळ संख्येनेकार्यकर्ते आश्रमात जोडले गेले. काही नवीन शाळाही सुरू झाल्या होत्या.

पण नियतीने पुन्हा एकदामोठी परीक्षा घेतली. १९६२ मध्ये कल्याण आश्रमाचीजुनी जीर्ण झालेली वास्तू कोसळली. मग यावेळी महाराजा विजय भूषणसिंह जुदेवदेवदूतासारखे पुढे आले, त्यांनी वनवासी कल्याण आश्रमासाठी आपल्या संस्थानातून चार एकर जमीन दान दिली. येथे आश्रमाची भव्यवास्तू उभीराहिली. ज्यामध्ये आजही कल्याण आश्रमाचेमुख्य कार्यालय आहे. या वास्तूतआयुर्वेदिक रुग्णालयसुरू झाल्यानंतर बाळासाहेबांच्या तत्त्वांनुसारशिक्षणक्षेत्रानंतर आश्रमाने आरोग्य क्षेत्रातही पहिले पाऊल टाकले होते.

वनवासी समाजाला एकत्र आणायचे असेल तर या समाजातील संतांना कल्याण आश्रमाशी जोडावे लागेलहे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी वनवासी कंवर समाजाचे संत पूज्य गहिरा गुरुजी महाराज यांच्या हस्ते या भव्य वास्तूचे उद्घाटन केलेआणिकंवर समाजाला आपुलकीच्या धाग्याने बांधले.

कल्याण आश्रमाच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले; पण तो प्रवास लोककल्याणाचा होता.  त्यामुळे कार्यकर्ते मिळत गेले आणि काम वाढतच गेले, अशी माहिती कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संघटनमंत्री अतुलजी जोग यांनी दिली. दक्षिण बिहारमधील लोहरदगा(झारखंड), ओरिसातील बालेशंकरा आणि मध्यप्रदेशातील सेंधवा येथे आश्रमाची नवीन वसतिगृहे सुरू करण्यात आली. १९६९ पर्यंत बाळासाहेबांची तपश्चर्या फळाला आली होती आणि  देशातील १४ जिल्हे आणि ३९ गावांपर्यंतआश्रमाचे कार्यपोहोचले होते. मध्यप्रदेशातहीवनवासी कल्याण परिषदेची स्थापना करण्यात आली होती.


राष्ट्रीय वनवासी कीडामहोत्सवात बाळासाहेब

काम जसजसेवाढत होते तसतसे बाळासाहेबांचा प्रवासही वाढत होता. प्रत्येक केंद्रापर्यंत पोहोचणे, कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविणे आणि सातत्याने नियोजन-बैठका घेणे हा आता दैनंदिन दिनक्रमाचा भागहोता. मगआणीबाणी आली. स्वातंत्र्यलढ्यात इंग्रज सरकारविरुद्ध झालेल्या रामटेक बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एकअसूनही तुरुंगात जाण्यापासून बचावलेले  बाळासाहेब आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेले. मात्र १९७५ मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि प्रथम रायगढ आणि नंतर रायपूर तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले. जिथे ते१९ महिने राहिले. तत्कालीन सरकारच्या दडपशाही धोरणामुळे कल्याण आश्रमातील कार्यकर्त्यांना तुरुंगात तर डांबलेच, शिवाय आश्रमाची जमीनही जमीन कमाल मर्यादा कायद्यानुसार ताब्यात घेऊन मालमत्तेचेही मोठे नुकसानकेले. वसतिगृहातील मुलांनाही घरी पाठविण्यात आले. पण भट्टीत तापवलेल्या कोळश्यापासून जसं कुंदन तयार होतं तसं बाळासाहेब तुरुंगातून बाहेर आल्यावर अधिक लोकप्रिय झाले.

आणीबाणीनंतर संघाने कल्याण आश्रमाच्या विस्ताराचे काम रामभाऊ गोडबोले यांच्यासारख्या अनेक प्रचारकांना दिले. बाळासाहेबांनी देशभर दौरे करून हे काम देशव्यापी केले. ईशान्येकडील राज्यांतील मुलांना देशाच्या सांस्कृतिक अभिमानाची ओळख व्हावी आणि त्यांच्यात राष्ट्रवाद निर्माण व्हावा, यासाठी त्यांनी वसतिगृह स्थापन करण्याचीमोहीम सुरू केली.

आश्रमाने आपल्यापितृतुल्य बाळासाहेबांचा ७१ वा वाढदिवस देशभर साजरा करण्याचा निर्णय घेतला. देशभरात बाळासाहेबांच्या सत्काराचे वेगवेगळे कार्यक्रम झाले. यातत्यांना जो निधी देण्यात आला, त्याचाविनियोग भविष्यात आश्रमाचे विविध प्रकल्प राबविण्यासाठी वापरलागेला.

वनप्रतिभा देशासमोर आणण्यासाठी बाळासाहेबांनी एकलव्य क्रीडा प्रकल्पाची स्थापना केली. या प्रकल्पामुळे देशाला नामवंत तिरंदाज आणि सुवर्णपदक विजेते खेळाडू मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षातबाळासाहेबांनीकेलेल्या अथक प्रयत्नांचे फलित म्हणून छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर येथे ३०,००० वनवासींची भव्य वनवासी परिषद पार पडली.


कामाच्या विस्तारासाठी प्रकल्प उभारण्यापेक्षा त्या प्रकल्पासाठी वातावरण तयार करणे महत्त्वाचे आहे,असे बाळासाहेब म्हणत असत आणि तेच त्यांनी आयुष्यभर केले.

शरीर कमकुवत होत चालले होते. तरीही १९७९ ते १९९३ या काळात त्यांनी देशभरातील प्रत्येक प्रकल्पातजाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. शेवटच्या वीस वर्षांत एक वनवासी बाळासाहेबांसोबत सावलीसारखा देशभर फिरला. कारण बाळासाहेबांना वनकल्याणाचे हे महान कार्य एका वनवासीकडेच सोपवायचे होते.

१९९३ मध्ये तब्येत साथ देत नसल्यामुळे कटक येथे झालेल्या आश्रमाच्या अखिल भारतीय परिषदेत कल्याण आश्रमाचे नेतृत्व जगदेव राम उरांव यांच्याकडे सोपवून बाळासाहेब स्वत: प्रत्यक्ष कामातून बाजूला झाले.

२१ एप्रिल १९९५ रोजी अनंताच्या यात्रेला निघताना या वनयोग्याच्या डोळ्यात अपार शांतता होती. कारण आता गिरी, डोंगर, जंगल यांमध्ये राहणारा वनवासी समाज जागृत होऊ लागला होता. त्याची सांस्कृतिक अस्मिता आता त्यांच्यासाठी अभिमानाचा विषय होता.

901 Views
अगली कहानी