सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

देव तारी त्याला कोण मारी

मध्यप्रदेश

parivartan-img

आगीच्या विक्राळ रूपापुढे मनुष्यही हतबल होतो. पण, याच मानवाच्या अचाट धैर्यासमोर अग्नीदेखील कधीकधी नमतो. २३ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या घटनेत असेच अचाट साहस पाहण्यास मिळाले आणि अग्नीदेखील या साहसापुढे मागे हटला. या दिवशी आगीमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून काही व्यक्तींनी ४८ मुलांचे प्राण वाचविले नसते, तर हा दिवस मध्य प्रदेशातील इंदूर येथील एम. वाय. या सर्वांत मोठ्या सरकारी रुग्णालयाच्या इतिहासात काळा दिवस ठरला असता. मुलांच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीने भीषण रूप धारण करण्याआधीच वॉर्डच्या काचा फोडून तिघांनी प्रसंगावधान राखून तेथील मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यांचे साहस बघून रुग्णालयातील इतर कर्मचारीदेखील मदतीसाठी पुढे सरसावले. दिनेश सोनी, रमेश वर्मा व गजेंद्र रसीले हे तिघे रुग्णालयात चालणाऱ्या ‘सेवाभारती सेवाप्रकल्पा’चे कार्यकर्ते आहेत. गरीब व गरजू रुग्णांच्या तपासणीपासून ते उपचारांपर्यंत लागणारी कुठल्याही प्रकारची मदत ‘सेवाभारती सेवाप्रकल्प’तर्फे केली जाते. ‘सेवाभारती इंदूर’तर्फे हे मदत केंद्र गेल्या तीन वर्षांपासून रुग्णालय परिसरात कार्यरत आहे. या प्रकल्पातून सहारा वॉर्डमध्ये प्रत्येक असहाय रुग्णाची सर्व प्रकारची मदत केली जाते.




२३ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेविषयी बोलताना गजेंद्र रसीले भावुक झाले. ते म्हणाले, ‘आग लागल्याचा आरडाओरडा ऐकल्यावर माझ्या दोन साथीदारांसह मुलांच्या त्या वॉर्डजवळ मी पोहोचलो, तेव्हा सर्वत्र कोलाहल माजला होता. वातावरण मुलांच्या किंचाळयांनी भरुन गेले होते. पालकांची अवस्था तर भयावह झाली होती. अशा वेळी एका क्षणाचाही विलंब न करता आम्ही तिघे काचा फोडून अतिदक्षता विभागात शिरलो आणि मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. बघता बघता सर्वांच्या मदतीने सर्वच्या सर्व म्हणजे ४८ मुलांना आगीपासून सुरक्षितपणे बाहेर काढले.’ सेवाप्रकल्पाचे प्रमुख महेंद्र जैन यांच्या मते येथील सर्व संबंधित कार्यकर्ते सेवाभावाने व मनापासून आपला वेळ येथील असहाय रुग्णांच्या देखभालीसाठी देत असतात. ते म्हणतात, ‘दुसऱ्याला दुःखात मदत करण्याच्या या सद्भावनेमुळेच कार्यकर्त्यांना आगीचा सामना करण्याचे साहस दिले असावे. या प्रकल्पांअंतर्गत ज्यांचे नातेवाईकांनी आणि जवळच्या माणसांनी सोडून दिलेल्या सर्व रुग्णांची सर्व प्रकारची सहायतादेखील केली जाते. प्रकल्पाकडे आपली स्वतःची रुग्णवाहिका आहे. गरजू रुग्णांसाठी ती २४ तास इंदूरमध्ये कार्यरत असते.

1076 Views
अगली कहानी