सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

जैविक शेतीने बदलले शेतकऱ्यांचे जीवन

कर्नाटक

parivartan-img

शेतकी तंत्रात सुधारणा केली आणि शेतीमाल विक्रीमधील दलाल दूर केले तर छोटे आणि मध्यम शेतकरी बरीच कमाई करू शकतात. कर्नाटकातील सादयव कृषी परिवार या संस्थेने ही गोष्ट प्रयोगानिशी सिद्ध करून दाखवली आहे. श्री चन्द्र प्रकाश हे एक सर्वसामान्य शेतकरी, तुमकुर जिल्ह्यातील बिलगेरेपाल्या नावाच्या एका खेडेगावात राहतात. आतोनात काबाडकष्ट करूनाही त्यांचे आर्थिक नष्टचर्य दूर होत नव्हते. एकेकाळी त्यांना एक क्विंटल नाचणीपासून जेमतेम अडिच हजार रु. मिळत असत, आज त्याच नाचणीचे त्यांना 22 हजार 500 रु. मिळतात. चंद्रप्रकाश यांच्याप्रमाणे हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात सादयव कृषी परिवाराने आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ प्रचारक श्री उपेंद्र शेणॉय यांच्या प्रेरणेने एक सधन शेतकरी श्री पुरुषोत्तम राव यांची 1990 साली हा संस्था स्थापन केली. आज जैविक शेतीच्या क्षेत्रात काम करणारी ही जगातील ती सर्वात मोठी संस्था आहे. कर्नाटक प्रांतातील 175 तालुक्यामधील 15 हजाराहून अधिक शेतकरी या संस्थेचे सभासद असून, ते जैविक शेती करत आहेत, आणि त्याद्वारे त्यांनी आपली लक्षणीय आर्थिक प्रगती साध्य केली आहे. ही संस्था म्हणजे जैविक शेती करणाऱ्या संघटनांचे महासंघ आहे, जिथे केवळ जैविक शेती करण्याची प्रेरणा मात्र दिली जात नाही, तर शेतमाल विक्रीसाठीही शेतकऱ्यांनां मार्गदर्शन व सहाय्य केले जाते .

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक स्वयंसेवक श्री आनंद जी हे या संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ता आहेत. त्यांनी सांगितले की संस्थेतर्फे शेतकऱ्यांना जैविक खताची निर्मिती, बायोगॅस, मधमाशीपालन, गोमूत्र आणि गोमयाचा व्यवसाय यांचे प्रशिक्षण देण्यात येते. याशिवाय प्रत्येक महिन्यात दोन वेळा कृषी ग्राहक मेळावा भरवण्यात येतो, त्यात सर्व शेतकरी आपला शेतमाल विकू शकतात. 




श्री मलयर श्रानप्पा हे शेतकरी बंधू शेती विकून मजुरी करण्याचा विचार करीत होते, आता ते जैविक भाजीपाला पीकवतात आणि तो थेट  ग्राहकांना विकून वर्षाला साडेचार पाच लाख रुपये मिळवत आहेत. बैल्लारी जिल्ह्यातील हूलीकरई हे त्यांचे गाव, ते सांगतात की सादयव कृषी परिवार या संस्थेची सदस्यता घेतल्यावर त्यांचा जीवनात फार मोठा बदल घडून आला. ते असेही सांगतात की तालुका पातळीवरील कृषी ग्राहक मेळाव्यात प्रत्येक महिन्याला वीस लाख रुपया हून जास्त किंमतीचा शेतमाल विकण्यात येतो.

संस्थेने अनेक छोटे-छोटे उपक्रम केले परंतु त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात फार  मोठे बदल घडून आले. शेतकरी देशी गाईचे दूध 80 रुपये किलो या दराने विकत असत, परंतु संस्थेच्या प्रोत्साहनाने त्यांनी दुधापासून तूप तयार करायला सुरुवात केली, आणि एक किलो तुपाचे त्यांना 2000 रुपये मिळू लागले. शेतकरी कुटुंबातल्या महीलानां जैविक कुंकु बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, त्यालाही  बाजारात चांगली मागणी आहे.

 शेतकऱ्यांना उत्तम बियाणे मिळावे आणि त्यांची रेताड होत चाललेली जमीन पुन्हा सुपीक व्हावी यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणे जलसंवर्धन करून शेतकरी सिंचनाबाबत स्वावलंबी व्हावा, यासाठीही मार्गदर्शन करण्यात येते. देशात प्रत्येक सव्वा दोन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो असे भयाण वास्तव आहे, या  पार्श्वभूमीवर सादयव कृषी परिवाराचे कार्य ठळकपणे ऊठून दिसते. या कार्याला बंगलोर येथील राष्ट्रोत्थान परिषद आणि युथ  फोर सेवा या संघ परिवारातील संस्थांतर्फे सर्व प्रकारे मदत करण्यात येते.

927 Views
अगली कहानी