सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

गुजरातचा पूर आणि स्वयंसेवकांचे भागीरथ प्रयत्न

गुजराथ

parivartan-img

नैसर्गिक अरिष्ट कधीही सांगुन येत नाही पण कधी कधी अपवाद म्हणून अशा आपत्ति दवंडी देवून सुद्धा येतात. 2017 साली जुलै महिन्यात असेच झाले । राजस्थान मधील जैतापूर येथील बंधाऱ्यातून गुजरातच्या दिशेने पाण्याच्या मोठा लोंढा रोंराबत आला। हा हा म्हणता त्याने महापुराचे भयानक रूप धारण केले। गुजरातमधील त्या भागातील लोकांनी, आपल्या आयुष्यात कधी कमरे एवढेही ही पाणी पाहिले नव्हते, ती जनता महापुरा बाबत सरकार देत असलेली धोक्याची सूचना थोडीच मनावर घेणार , मात्र महापुरा बाबत सरकारने धोक्याची घंटा वाजवताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, मदत आणि आणि बचाव कार्यासाठी सिद्ध झाले । 23 जुलै, रात्री एकचा सुमार,  पालनपुर जिल्ह्याचे संघाचे सेवा प्रमुख श्री गोविंद भाई प्रजापती यांनी तातडीने धानेरा, बनासकांठा, डीसा येथील प्रमुख कार्यकर्त्यांची मोबाईलवरच बैठक घेतली, आणि संकट निवारण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली। निरोप मिळताच ठिकठिकाणचे स्वयंसेवक पूर संभाव्य भागात पोहोचले , आणि त्यांनी रात्रभर फिरून ध्वनिक्षेपकावरून लोकांना धोक्याची कल्पना द्यायला सुरुवात केली। या एका कृत्या मुळे एकट़या धानेरा  तालुक्यातच 8000 लोकांचे प्राण वाचवण्यात यश आले।




या महापुराचे संकट इतके भीषण होते की धानेरा, दंतीवाडा, अमीरगड, डिसा, लाखनी या गावांमध्ये 100 हुन अधिक लोक आणि एक लाखा पेशा जास्त  गुरेढोरे रात्री झोपेतच मरण पावली। मरणारे अभागी जीव असे लोक होते, ज्यानीं स्वयंसेवकांच्या धोक्याच्या सूचनेवर विश्वास ठेवून घर सोडण्यास नकार दिला, अथवा ज्यांच्यापर्यन्त दुर्देवाने धोक्याचा इशारा पोहोचलाच नाही ।  कांकरेज तालुक्यातील खारिया या गावात तर एकाच कुटुंबातील17 जणांना झोपेतच जलसमाधी मिळाली। पूर ओसरल्यावर या अभागी जीवांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वयंसेवकांचे डोळेही अश्रुंनी भरले होते। या संपूर्ण पूर परिस्थितीत 1879 स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम करून साडेपाच लाख अन्न पाकिटे, 23 हजाराहून अधिक किराणा भुसार मालाच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, तंबू, कपडे,अंथरुण / पाघंरुण इत्यादींचे वाटप केले । संघाशी संबंधित असलेल्या 123 डॉक्टरांनी वेगवेगळ्या ठिकाणी 202 आरोग्य शिबिरे भरवली, आणि आणि त्याद्वारे 23242 रुग्णांवर उपचार केले

पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे  हे सरकारचे  पुढिल सर्वात कठीण आव्हान होते। मेहसाणा जिल्ह्याचे संघाचे संपर्कप्रमुख डॉक्टर निखिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बचाव कार्यातही संघाचे स्वयंसेवकच सर्वांच्या आधी पोचले। सैन्य दलांच्या पोहोचण्यापुर्वीच स्वयंसेवकांनी दोरखंडाच्या आधाराने लोकानां पाण्याबाहेर काढण्याचे काम सुरु केले होते । राष्ट्रीय आपदा निवारण दलालाही बचाव आणि मदत कार्यात स्वयंसेवकांनी सर्व प्रकारे सहकार्य केले। अडानी वैद्यकीय महाविद्यालयातील एक विद्यार्थी आणि संघाचा स्वयंसेवक , जय पटेल आपल्या सहकारी डॉक्टर मित्रांसह औषधे व इतर इतर आवश्यक उपकरणे घेउन पूरग्रस्त भागातील आदेशपुरा आणि राधनपुर या गावांमधे गेला, तेव्हा त्या सर्वांना कित्येक वेळी चिखलातुन आणि राडारोडयातुन डोक्यावर सामान घेवुन पायी चालावे लागले । त्यानंतर त्यांनी पूरग्रस्त भागात अपार कष्ट करून  दिवसरात्र लोकांची सेवा केली, आणि संघ शाखेत शिकवलेल्या मानव सेवेच्या मंत्राची पुर्णपणे अमंलबजावणी केली. पुरामुळे अनेक गावांमध्ये वीज गेली होती, आणि मोबाईल सेवा ही बंद पडली होती, तरीही त्याची तमा न बाळगता, टॉर्चच्या उजेडात रुग्णांवर उपचार करण्यात आले।  

या संपूर्ण मदत कार्यात संघ स्वयंसेवकांना ,गायत्री परिवार, सलाराम मंदिर डीसा -धरा, संतराम मंदिर नडीयाद, आर्ट ऑफ लिविंग, रामदेव बाबांची पतंजली संस्था, रामकृष्ण मिशन, जय गुरुदेव दादांनीवाडी, इत्यादी सामाजिक, धार्मिक संस्था संघटनांनीही मोलाचे सहकार्य केले, अशी माहिती विभाग सेवा प्रमुख श्री नंदू भाई जोशी यांनी दिली आहे।

1321 Views
अगली कहानी