नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
भालचंद्र जोशी | उत्तर प्रदेश
विनाशाकडून विकासाकडे वाटचाल कशी केली जाते, स्वप्ने साकार कशी केली जातात, निर्धार आणि प्रयत्न यांच्या बळावर विधायक कार्यांची उभारणी कशीकेली जाते, हे पाहायचे असेल, तर या गावाला अवश्य भेट दिली पाहिजे. या गावात जलसंधारणाचे तंत्र गेल्या कित्येक वर्षांपासून राबवण्यात येत असून तेथे उघडीगटारे, डबकी, चिखल यांचा मागमूसही दिसणार नाही. प्रत्येक घरापाशी शोषखड्डा, अणि सांडपाण्याची सोय उपलब्ध आहे. संपूर्ण गाव आंबा, डाळींब, फणस, पेरू, आवळा, इत्यादी फळाझाडांनी त्याचप्रमाणे तुळशीसारख्या औषधी वनस्पतींनी बहरून गेले आहे. गावात साक्षरतेचे प्रमाण शंभर टक्के असून हे गाव उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यात आहे.
या गावाला देशातील सर्वाधिक विकसित गावांपैकी एक म्हणता येईल. या गावाचे नाव आहे रवींद्रनगर. उत्तर प्रदेशात लखीमपुर खिरी या जिल्ह्यातील महंमदी तालुक्यात हे गाव आहे. गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मदिनी हे गाव वसविण्यात आले. त्यामुळेत्याचे नाव रवींद्रनगर असे ठेवण्यात आले आहे. 1947 साली देशाची फाळणी झाली. त्या वेळी बंगालमधून विस्थापित झालेले काही बंगाली बंधू येथे वस्तीलाआले. येथे त्यांना राहण्यासाठी घर, खायला अन्न, कपडेलत्ते, काहीच नव्हते.
शिवाय, निर्वासितांच्या छावण्यांमधे कॉलरा, अतिसार, इत्यादी रोगांच्या साथीपसरल्या होत्या. पुनर्वसनाच्या नावाखाली या दुर्देवी कुटुंबांना गोमती नदीच्या किनारी भागातील अत्यंत दुर्गम अशा या भागात पाठविण्यात आले. १९६४मध्ये याठिकाणी आलेल्या लोकांनी आठ वर्षे हालअपेष्टांध्ये काढली. तांदळासारख्या दिसणाऱ्या रानावनात उगवणाऱ्या गवताच्या बिया उकळून ते मासळीबरोबर हे लोकखात असत. हाच त्यांचा आहार होता,
अशी माहिती तेथील स्थानिक संघ स्वयंसेवक आणि ग्रामीण विकास समितीचे जिल्हाअध्यक्ष श्री. तपन कुमार देतात. सर्वप्रथम गावकऱ्यांनी स्वयंसेवकांच्या मदतीने जवळपासची जमीन शेतीयोग्य केली. हे काम अर्थातच सोपे नव्हते. त्यासाठी सर्वांनीच अपार कष्ट उपसले. रवींद्रनगरचे नाव पूर्वी मियाँपूर असे होते. 1969 साली श्री. भैरवचंद्र राय यांनी तेथे संघाची शाखा शुरू केली. त्यानंतर तेथे विभिन्न ठिकाणी शाखा कार्य सुरू झाले. तेव्हापासून या ठिकाणी नियमितपणे शाखेचे काम सुरू आहे.
गावातील लोकांनी दिलेल्या जमिनीवर स्वयंसेवकांनी तेथे पहिली शाळा शुरू झाली. या शाळेला कालांतराने सरकारची मान्यताही मिळाली. अजूनही तेथे संजयविश्वास, मोनिका मंडल, मिलन, शंभू इत्यादी कार्यकर्ते शिक्षक म्हणून काम करत आहेत. ते मोफत शिकवतात. त्यांच्या अथक प्रयत्नांनी संपूर्ण गाव साक्षर झालेआहे. गावातील लोक परंपरानिष्ठ असून घरातील जमिनी गायीच्या शेणाने सारवण्यात येतात आणि दररोज सकाळी शंखनाद केला जातो. गावातील महिलाअर्थार्जनासाठी विड्या वळण्याचे काम करतात. मात्र, विशेष म्हणजे गावात कुणीही धूम्रपान करत नाही. गावात महिलांचे चार बचतगट असून तेथे महिलांनाशिवणकाम, भरतकाम, इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते. संपूर्ण गावात कमालीची स्वच्छता दिसते. तेथील शाळेहून स्वच्छ आणि सुंदर शाळा राज्यात इतर ठिकाणीकुठेही कदाचित आढळून येणार नाही.
शाळा, पंचायतीचे कार्यालय, घरे, देवालये, रस्ते, क्रीडांगण, सर्व स्वच्छ आणि नीटनेटके. यामध्ये स्वयंसेवकांचा सिंहाचावाटा आहे. शाळेच्या क्रीडांगणाचे रूपांतर एका देखण्या स्टेडियममध्ये करण्यात आले आहे आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने पक्के रस्ते बांधण्यात आले आहेत. रा. स्व. संघाच्या ग्रामविकास कार्याचे विभागीय प्रमुख श्री. प्रेमशंकर अवस्थी यांनी 2009पासून या गावाच्या विकासाची जबाबदारी पत्करली आहे. गावात एकहीव्यक्ती बेरोजगार नाही, असे ते सार्थ अभिमानाने नमूद करतात. रवींद्रनगर हे व्यापारी धुराड्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्याशिवाय, देवदेवतांच्या मूर्ती तयार करणे, बांधकाम, विणकाम, मोटर वाइंडिंग हे उद्योगही तेथे जोरात चालू आहेत. तेथील तरुणांनी कष्ट आणि कौशल्याच्या आधारावर जीवनात समृद्धीखेचून आणली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. चित्तरंजन विश्वास यांचे उदाहारण उल्लेखनीय आहे. डॉ. विश्वासयांच्यासह गावातील इतर अनेक तरुण शिकून खूप मोठे झाले आहेत.
कणखर परिश्रम आणि निश्चयाच्या जोरावर एखाद्या गावाचा कायापलट कसा घडवून आणता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्रनगर गाव, यात शंका नाही.
संपर्क कार्यकर्ता :- श्री. तपन कुमार
भ्रमणध्वनी :- +91 6394671084
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।