सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

अजित जी - एक सेवाग्रणी

कर्नाटक

parivartan-img

तेविसाव्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग यात सुवर्णपदक आणि तेही 65 वर्षांपूर्वी. यात काहीच आश्चर्य नाही की अशा या हुशार युवकाचे भविष्य अतिशय उज्वल होते .परंतु त्याची स्वप्न मात्र वेगळीच होती. असे म्हणतात की इतिहास निर्माण करणारी व्यक्ती, नेहमीच सर्वसामान्य वाटेपेक्षा वेगळी वाट शोधून काढते. हे सिद्ध केलं बेंगलोर मधील गुडीवंडेयवर या जिल्ह्यातील कोलार नगर येथील गॅजेटेड ऑफिसर असलेल्या ब्रह्म सुरय्या आणि त्यांची पत्नी पुट्टतायाम्मा यांच्या दुसऱ्या सुपुत्र अजितने .


कुठल्याही मोठ्या कंपनीत सहजपणे मिळणारी नोकरी सोडून 1957 साली हा युवक रातोरात घर सोडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून बाहेर पडला. संघातील अनेक अनुभवी प्रचारकांपैकी एक अजित , ज्याने आपल्या अत्यंत अल्प आयुष्यात बंगलोर येथे सेवा क्षेत्रातील एक आदर्श अशा 'हिंदू सेवा प्रतिष्ठान' ची निर्मिती केली, ज्या ठिकाणी नवीन संकल्पना उदयाला येतात , सेवा करणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देऊन तयार केले जाऊ शकते, ज्यात महिला सुद्धा आपले पूर्ण आयुष्य सेवाव्रत्ती म्हणून समाजाला देऊ शकतात. ही कल्पना साकार करण्यासाठी त्यांनी संघटनेच्या सहमतीने 1980 मध्ये हिंदू सेवा प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली .सुरुवातीच्या पहिल्याच गटात सेवाव्रती बनण्यासाठी उत्सुक अशा 23 युवक युवतीनी 40 दिवसाचं प्रशिक्षण घेतले. नेले ,अरुण ,चेतना ,प्रसन्ना कौन्सिलिंग सेंटर ,सेवा मित्र सुप्रजा अशा अनेक प्रकल्पांना चालवण्यासाठी या प्रतिष्ठान मधून सेवाव्रती मिळाले .कैलासवासी अजितजींची ही संकल्पना आता एक मोठा वटवृक्ष बनली आहे. स्थापने पासून 2022 पर्यंत जवळजवळ 42 वर्षात इथून प्रशिक्षण घेऊन चार हजाराहून जास्ती लोकांनी आपलं जीवन सेवाकार्यांसाठी वाहिले आहे, ज्यात 3500 महिला आहेत. यातील काहींनी आपल्या तारुण्यातील तीन ते दहा वर्ष तर काहींनी आपले पूर्ण जीवन सेवा कार्यासाठी समर्पित केले आहे .


बंगलोर मध्ये BE करत असताना  कंबनपेटे येथील कल्याण शाखेतून संघ जीवनाला सुरुवात करणाऱ्या अजितने नंतर पुन्हा कधीही मागे वळून बघितले नाही .कदाचित त्यांचा संघ प्रवेश  उशिरा झाला  परंतु कॉलेज जीवनात संघाचे  प्रथम वर्ष केल्यानंतर त्यांच्या जीवनाची दिशाच बदलून गेली 1957 मध्ये संघाचे प्रचारक झाल्यानंतर 1960 ते 75 पर्यंत संघाच्या विविध जबाबदाऱ्या पूर्ण करत ते आणीबाणीच्या वेळेला  मिसा  बंदी म्हणून दोन वर्ष तुरुंगातही होते तिथे त्यांनी तुरुंगात असलेल्या कैद्यांना योगाचे प्रशिक्षण दिले . संघ शिक्षा वर्गाच्या अभ्यासक्रमात योग सामील करण्याचे श्रेय अजितजींनाच जाईल . त्यासाठी प्रसिद्ध योगाचार्य  श्रीपट्टाभी तसेच श्री अय्यंगार यांच्याकडे त्यांनी योगासनांचा अभ्यास केला.


हिंदू सेवा प्रतिष्ठानच्या सेवाव्रतींच्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्यात महत्त्वपूर्ण सहभाग असलेले सध्याचे सरकार्यवाह दत्तात्रय जी होसबळे म्हणतात की अजितजी सतत विचार करत  असायचे ते म्हणायचे की ज्यांना सेवेची आवश्यकता आहे, अशी संख्या  लाखांमध्ये आहे, परंतु सेवा करणारे  मात्र बोटांवर मोजण्या इतपत आहेत. यांच्या मूळ स्वभावात सेवा आहे अशी मातृशक्ती मात्र  सेवा कार्यापासून कित्येक मैंल दूर  आहे. कदाचित याच त्यांच्या विचार मंथनातून सेवाव्रती संकल्पनेचा जन्म झाला असेल.


सेवेसाठी उत्तम व्यक्ती निर्माण करून त्यांना वंचित समाजाच्या पुनरुत्थनासाठी सहभागी करणे याच्यासाठी प्रतिष्ठानप्रशिक्षण घेणाऱ्या सेवाव्रतीना भारताची वैभवशाली परंपरा, महापुरुषांची चरित्रे ,सेवाची आवश्यकता, योग आणि शिस्त अशा महत्त्वाच्या वेगवेगळ्या विषयांवर 40 दिवसाचे प्रशिक्षण देते. यानंतर सेवाव्रती तीन वर्ष आपल्या आवडीनुसार कार्यक्षेत्रात जाऊन सेवा देतात. या कालावधीत त्यांच्या राहायची ,खाण्यापिण्याच्या व्यवस्थे बरोबरच अल्प मानधनही प्रतिष्ठान त्यांना देते. युवा अवस्थांमध्ये आपल्या जीवनाची तीन वर्ष सेवा कार्यांसाठी देणारे कित्येक सेवाव्रती नंतर  आपले  पूर्ण जीवन सेवेसाठी समर्पित करतात. 1989 मध्ये इथून प्रशिक्षण घेऊन सध्या प्रतिष्ठान मध्ये महिला विभागाची प्रमुख असलेली वनिता हेगडे, जीने आपले सर्व जीवन सेवेसाठी दिले आहे ती सांगते," अजित जी  संघटनेच्या स्थापनेनंतर केवळ नऊ वर्ष होते परंतु या नऊ वर्षात त्यांनी आपली सारी शक्ती या उपक्रमाला परिपूर्ण करण्यासाठी लावली . प्रशिक्षणाच्या काळात ते पूर्ण वेळ तिथेच  राहत असत त्यामुळे सर्व सर्व सहभागी  लोकांशी त्यांचा अतिशय आपलेपणाचा संबंध येत असे. कोण सेवा वस्तीत काम करू शकेल, कोणाची योग्यता योग केंद्रासाठी आहे हे अजितजींना बरोबर समजायचे .फक्त सेवाव्रती कार्य क्षेत्र  नियोजन नाही, तर त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामाचे नियोजन निश्चित करण्यासाठी अजित जींची महत्त्वपूर्ण भूमिका राहायची .एवढेच नाहीतर एक दिवस तरी कार्यक्षेत्रात त्यांच्या बरोबर राहण्याचा अजित जींचा  प्रयत्न असायचा. त्यांच्या या सहज अकृत्रिम  प्रेमाने आणि तेजस्वी विचारांनी प्रभावित होऊन अनेक युवक युवती आयुष्यभर सेवा देण्याचा संकल्प करण्यासाठी प्रेरित होत असत. सेवेसाठी योग्य व्यक्ती निर्माण हा एकच विचार हिंदू सेवा प्रतिष्ठानचे प्रथम संचालक अजितजींनी आपल्या सहकाऱ्यांमध्ये सुद्धा निर्माण केला होता. परंतु   काळाच्या एका क्रूर फटकाऱ्याने  त्यांना अवेळी आपल्यातून ओढून नेले. केवळ 56 वर्षाचे वय असताना तीन डिसेंबर 1990 ला बंगलोरच्या संघ कार्यालय केशव कृपातून तुमकुरला जाताना सकाळी चार वाजता एका कार अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहताना नानाजी देशमुख म्हणाले होते सोळा वर्षाची एखादी युवती सेवा कार्य करण्यासाठी स्वतःहून एक फॉर्म भरून प्रशिक्षण घेईल हा आपल्या देशात अशक्य  वाटणारा विचार  अजितजींनी एका परिपूर्ण प्रकल्पाच्या रूपात साकार केला .

666 Views
अगली कहानी