सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

बुडत्या केरळसाठी संघ तारणहार

के. प्रसाद | केरळ

parivartan-img

जुलै २०१८चा मध्य. मान्सूनची नुकतीच नुकतीच सुरुवात झाली होती. देशाच्या इतर भागात पाऊस बरसत होता. पण, केरळमध्ये काही ठीक नव्हते. केरळ, ज्याला 'देवभूमी' म्हणतात, तेथे मुसळधार पावसाने मागील सर्व रेकॉर्ड तोडून थैमान घातले होते. हवामान तज्ज्ञांच्या चेहऱ्यावर चिंतेचे जाळे पसरले होते. शेवटी 8 ऑगस्ट 2018 ला, सायंकाळ होत असताना केरळमधील सर्व 54 धरणांचे पाणी धोक्याच्या रेषेपर्यंत पोहोचले होते. ...आणि 24 तासांत यातील 34 धरणांचे गेट उघडावे लागले होतें. गेल्या 26 वर्षांत पहिल्यांदा इडदुकू धरणाचे 5 गेट एकाच वेळी उघडण्यात आले. त्यामुळे केरळ अभूतपूर्व जलमय झाला.




चेंगन्नूर, पंदानद, एदानद, अरणमूला, कोजहंचेरी, आईरूर, पंडालम, कुट्टनद, अलूवा आणि चलाकुडइ हे सर्व परिसर जलमय झाले होते. चहूकडे पाण्याशिवाय काहीच दिसत नव्हते. पाण्याने 380हून अधिक लोकांना गिळंकृत केले होते. असे प्रतीत होते की जणूकाय या देवभूमीवर प्रलयकारी पुराच्या रूपात कोणी भयंकर दैत्याने हल्ला केला आहे. सर्वत्र त्राही माम, विध्वंस, मृत्यू व मानवी विवशतेचे दारूण दृश्य दिसत होते. अशा परिस्थितीत, पौराणिक कथांनुसार, वासुकी - ज्यास भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी सहावा अवतार, परशुरामने या देवभूमीचा रक्षक म्हणून नियुक्त केले होते, तो संघाच्या स्वयंसेवकांच्या रूपाने देवभूमीच्या रक्षणासाठी प्रलयाशी दोन हात करण्यासाठी धावून आला होता.




राष्ट्रीय सेवा भारतीशी संबंधित स्थानिक सेवाभारतीच्या मार्गदर्शनाखाली हजारो स्वयंसेवक खांद्याला खांदा लावून सेवाकार्यात सहभागी झाले. चेंगान्नुर जिल्ह्याचा चोवीस वर्षांचा विशाल नायर त्यापैकी एक होता. दुसऱ्यांच्या हितापेक्षा म्हणजेच परहित धर्मापेक्षा दुसरा कोणताच धर्म नाही, हे संस्कार त्यांच्यावर शाखेत झाले होते. त्याने पुरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी आपला जीव पणाला लावला होता. केरळमधील बचाव कार्याचे संचालन करणारे सेवाभारतीचे त्रिवेंद्रम विभागाचे प्रमुख श्री. जयकृष्णन यांनी सांगितले की, विशाल नायरने आपले वडील वेणूगोपाल नायर, माता जयश्री व बहीण अथिरा नायर यांना सुरक्षित स्थानी पोहोचविले. नंतर सोळा ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता पुरात अडकलेल्या इतर पन्नास परिवारांतील लोकांना वाचविणाऱ्या मोहिमेत पहिल्या पंक्तीतील सुरक्षा स्वयंसेवकांबरोबर विशाल होता. एवढ्यात त्याने मोरीअप्पा पुलाजवळ एका व्यक्तीस बुडताना पाहिले. विशालने विद्युत वेगाने त्याला वाचविण्यासाठी उसळत्या पाण्यात उडी मारली. प्रत्यक्षदर्शी लोकांच्या कथनानुसार त्या वेळी पाण्याला इतका वेग होता, की त्याने विशालला पूर्ण गिळंकृत केले. त्या बुडणाऱ्या व्यक्तीला इतर ग्रामीण लोकांनी बाहेर काढले. पण, ते विशालला बाहेर काढू शकले नाहीत. तीन दिवसांनी शंभर मीटर अंतरावर विशालचे पार्थिव सापडले. विशालची बहीण अथिरा म्हणाली, निस्संदेह, माझ्या वृद्ध माता पित्यांनी आपला मुलगा गमावला आहे. पण, विशाल आमच्या सर्वांच्या हृदयात सदैव जीवित आहे. त्यांच्या बलिदानाचा आम्हाला अभिमान व गर्व आहे.

पूरग्रस्तांच्या या अभूतपूर्व सेवाकार्यात स्थानिक सेवाभारतीच्या आठ हजार पाचशे स्वयंसेवकांनी दिवस रात्र या पीडितांना वाचविण्याच्या कामात आपल्या जीवाची बाजी लावून झोकून दिले होते. पूरग्रस्तांमधील सर्वांत जास्त प्रभावित अलपुझा जिल्ह्यात सेवाभारती द्वारा पंचवीस मेडिकल कॅम्प लावले होते. या व्यतिरिक्त इतर जागी एकशे पंचवीस रिलीफ कॅम्प चालविले होते. तसेच, 150 होड्या व चोवीस अॅम्ब्युलन्सच्या ताफ्याने चोवीस तास उत्साही स्वयंसेवकांनी आपले बचावकार्य सुरू ठेवले होते. आतापर्यंत सत्तर हजार पीडितांना स्वयंसेवकांनी सुरक्षित ठिकाणी पोहोचवले होते. थ्रिसूर जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक केंद्रीय मदत केंद्र पण सेवा भारती द्वारा उभारले होते.

भारत सरकारने केरळमधील या अभूतपूर्व जलप्रलयाला 'लेव्हल तीन' च्या संकटाचा दर्जा दिला आहे व 'अति गंभीर प्रसंग' असे संबोधले आहे. संकट आणि बचावकार्य आता संपत आहे. आता निर्वासित झालेल्या जनतेच्या पुनर्वसनात स्वयंसेवक कार्यरत आहेत.

880 Views
अगली कहानी