नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
माधुरी आफळे | केरळ
निसर्ग सौंदर्याची लयलूट असलेल्या,तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांसाठी आणि धार्मिक लोकांसाठी पवित्र असलेल्या देवभूमी केरळ मध्ये 16 ऑक्टोबर 2021 ला पावसाने इतके प्रचंड थैमान घातलं, की गावच्या गाव पाण्यात बुडल. सकाळी पाच वाजता सुरू झालेला पाऊस आपल्याबरोबर कच्ची मातीची घरं,भांडीकुंडी अंथरूण-पांघरूण सगळं काही वाहून नेत होता. जमीन खचल्याने रस्ते प्रवास करण्यासाठी योग्य राहिले नव्हते. मोठे मोठे दगड व झाडे मुळापासून उन्मळून रस्त्यात पडल्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. सगळीकडे फक्त चिखल आणि चिखलच होता.21 जणांचे प्राण गेले होते तर बाकीचे लोक तर आपलं सगळं काही गमावल्याने असहाय्य होवून देवाची करुणा भाकत होते.
या संकटाला कसं तोंड द्यावं या विचारात सरकार असतानाच, सगळ्यात जास्ती ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, अशा इडुक्की कोक्कायन थानाबीटा या भागात केरळ सेवा भारती चे कार्यकर्ते देवाप्रमाणे धावून आले.सहाशेहून अधिक कार्यकर्त्यांनी या नुकसानग्रस्त भागात घर विहिरी रस्ते स्वच्छ करण्याबरोबरच, अन्नधान्य, भांडी कुंडी,अंथरूण पांघरूण यांचेही वाटप केले. इतकेच करून हे स्वयंसेवक थांबले नाहीत,तर दिवस-रात्र श्रम करून त्यांनी येण्या-जाण्यासाठी तात्पूरते पूल बांधले.17 ऑक्टोबरला अतिवृष्टी थांबल्यानंतर जी 16घरे या सगळ्यात वाचली होती, त्यातले कुटुंबीय आपल्या घरी परत आले तर त्यांना असं दिसले, की चिखलाने भरलेल्या त्यांच्या घरातील सामान खराब झालं आहे, किंवा पावसाने वाहून गेले आहे. आयुष्यभर कष्ट करून जमा केलेल्या सामानाची ही अवस्था बघून त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबतच नव्हते. स्वयंसेवकांनी मग हातात कुदळ फावडी घेऊन यांच्याही घराची स्वच्छता मोहीम सुरू केली,ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली होती, तेही कुटुंबीय या मोहिमेत युद्धपातळीवर सामील झाले. सेवा भारती च्या कार्यकर्त्यांनीकोट्टीकल,कोकायर ,मनी मेल यांच्यासह सर्व 8 ग्रामपंचायतीतील अनेक घरांची स्वच्छता करून त्यांना राहण्यास योग्य असे बनवले. सेवा भारती चे पूर्णवेळ कार्यकर्ते जीडीनरमेश म्हणाले 450 घरे, 310 विहिरी आणि छोट्या-छोट्या फॅक्टरीच्या स्वच्छतेबरोबरच रस्त्यावरची झाडे,मोठे मोठे दगड, यांना बाजूला करून रस्ता वाहतुकीस योग्य बनवला गेला. सैन्यातील जवानाप्रमाणेच सवयंसेवकांनी हे काम कोकायारमध्ये गावकऱ्यांच्या मदतीने केले. कोकायार गावाचा संपर्क उर्वरित जगाशी ज्या पुलामुळे होत होता, तोच पुल पावसात वाहून गेला होता या गावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य नीचुर तंगचन हे बघून आश्चर्यचकित झाले, की कुठून हे खाकी चड्डी वाले संघस्वयंसेवक आले, आणि बघता बघता त्यांनी हा पूल दुरुस्त करून दिला. दिवस-रात्र अत्यंत कष्ट घेऊन पाच फूट रुंद आणि 12 मीटर लांब असा एक तात्पुरता पूल लाकडं,बांबू आणि आजूबाजूच्या वस्तू घेवुन बनवला गेला.असे तीन पूल कार्यकर्त्यांनी तयार केले. निचुर म्हणतात पूल तयार झाले ते गावातील वस्तूंमुळे नाही, तर ते तयार झाले, सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नानी.नारायणधर्म योग आश्रम चे साधक तर कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानत होते. मंदिराच्या आजूबाजूला जवळजवळ चार फूट चिखल जमा झाला होता, त्यामुळे मंदिराचा दरवाजा उघडणेही शक्य नव्हतं, पण कार्यकर्त्यांनी मंदिराबरोबरच मंदिराच्या जवळपास असलेल्या विहिरी पण स्वच्छ केल्या. हे काम बघून तेथील एका ज्येष्ठ नागरिक पालिकात्थबुद्धांनी आपले पंप,मजूर आणि लागणारे काही साहित्य, विहिरी साफ करण्यासाठी सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांच्या हवाली केले.
सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या कामाबरोबरच या भागातील संकटात सापडलेल्या दोनशे ते अडीचशे जणांना दररोज भोजन वाटप केले भांडीकुंडी अंथरूण-पांघरूण स्वयंपाकासाठी लागणारा गॅस मच्छरदाणी इत्यादी आवश्यक वस्तू पण दिल्या.
धर्म जात या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मानवाची सेवा करण्याच्या कामात मग्न कार्यकर्त्यांना बघून शैली थामस नावाच्या एका ख्रिश्चन महिलेने आपले घर सेवा भारतीचे कार्यालय बनवण्यासाठी कार्यकर्त्यांना सुपूर्त केले.
रस्त्यांची परिस्थिती अजूनही
सुधारली नव्हती कारण या रस्त्यांवर मोठे
मोठे दगड, झाडे यांच्यामुळे रस्ता वाहतुकीस योग्य नव्हता, त्यामुळे या 600 कार्यकर्त्यांनी,आपापले
गटबनवून रस्ता नीट करण्याचे काम सुरू केले. सततच्या परिश्रमानंतर 12 रस्ते
वाह्तुकीसाठी योग्य झाले.सेवा भारती च्या कार्यकर्त्यांच्या या सततच्या
प्रयत्नांमुळेच पावसात सगळ्यात जास्ती नुकसान झालेले कोट्टायम, इड्डूकी, थानाबिट्टा येथील जनजीवन आता
सुरळीत सुरू झाले आहे.
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।