सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

हिमालयाचे सुपुत्र-डॉ. नित्यानंद

हिमाचल प्रदेश

parivartan-img

उत्तराखंडला निसर्गाचे अद्भुत वरदान लाभले आहे. पर्वतीय प्रदेश आणि मसुरीसारख्या ठिकाणी असलेल्या निसर्गसौंदर्याला पाहायला या ठिकाणी लाखो पर्यटक येतात. पर्यटनासाठी महत्त्वाच्या असलेल्या या दुर्गम प्रदेशातील नागरिकांच्या समस्याही कमी नाहीत. या दुर्गम भागातील लोकांना खऱ्या अर्थाने समजून घेऊन त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न कुणी केला असेल, तर त्यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक नित्यानंद यांचे नाव घ्यावे लागते. नित्यानंद हे देहराडूनमधील भूगोलाचे प्राध्यापक होते. त्यांचे पूर्ण जीवन म्हणजे समर्पण व त्यागी वृत्तीचे अनोखे दर्शन. गढवालमध्ये 1991मध्ये दसऱ्याच्या दिवशी आलेल्या भूकंपाचा फटका शेकडो नागरिकांना बसला. या भूकंपग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाच्या कामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या नागरिकांचे पुनर्वसन आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी नित्यानंदजी यांनी मनेरीला आपले केंद्र बनवले व संघाच्या स्वयंसेवकांनी 50 गावांमध्ये सुरू केलेल्या सेवाकार्यांना मार्गदर्शन केले. कर्मयोगी नित्यानंदजींना 1975मध्ये पार्शल पॅरालिसिस झाला. डॉक्टरांनी पर्वतीय प्रदेशात न फिरण्याचा सल्ला त्यांना दिला. मात्र, त्यानंतरही त्यांनी या ठिकाणी येणे सोडले नाही. भूकंपग्रस्त कुटुंबांना भांडी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, त्यांच्या मुलांना शिकविणे या कामांखेरीज चारशेहून अधिक कुटुंबांना भूकंपरोधक घरे बांधून देण्यात आली. डॉ. नित्यानंद हे 1945पासून त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत संघाचे पूर्ण वेळ (त्यांनी दीर्घ काळ प्रांत कार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळली.) स्वयंसेवक होते. डॉ. नित्यानंदजींनी ‘उत्तरांचल नैसर्गिक संकट सहायता समिती’ स्थापन केली. या समितीद्वारे देशामध्ये कुठल्याही ठिकाणी नैसर्गिक संकट आले, तर पीडितांना हरप्रकारे मदत करण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या 14 वर्षांपासून हे काम अविरत सुरू आहे.



 

नित्यानंदजी यांनी आपले पूर्ण जीवन संघकार्यासाठी समर्पित केले. 9 फेब्रुवारी 1926 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील श्योवरणजी हे रेल्वेत कर्मचारी होते. त्यांचा जन्म तीन बहिणींपाठोपाठचा. कुटुंबामध्ये एकुलता एक मुलगा असल्याने मोठे झाल्यावर कुटुंबाचे नाव पुढे चालू ठेवण्यासाठी इतरांप्रमाणे विवाह आणि पारंपरिक आयुष्य त्यांनी व्यतीत करावे, अशी त्यांच्या कुटुबीयांची अपेक्षा होती. पण, नित्यानंदजी हे एक वेगळेच रसायन होते. त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहून सेवाकार्यामध्ये स्वतःला वाहून घेतले. नित्यानंदजींना गरीब मुलांच्या भविष्याची चिंता असायची. मनेरीनंतर उत्तरकाशीमध्ये लक्षेश्वर, देहराडून जिल्ह्यातील मागटी पोखरी, पाटिया आणि लटेरीमध्ये त्यांनी अशा मुलांसाठी छात्रावास सुरू केला. या ठिकाणी शिकून शेकडो विद्यार्थी आज यशस्वी झाले आहेत. 

नित्यानंदजींना हिमालयाचे सुपुत्र म्हणूनही ओळखले जाते. आधुनिक काळातील ते खरेच एक संत होते. नित्यानंदजींनी जवळपास आयुष्यभर प्राध्यापकी केली. पण, कधीही स्वतःचे घर त्यांनी उभारले नाही आणि स्वतःसाठी पैसा ठेवला नाही. त्यांच्या आई होत्या, तोपर्यंत मुलगा म्हणून उत्तम कर्तव्य त्यांनी पार पाडले. आईंच्या निधनानंतर त्यांनी ‘श्रीमती भगवती देवी चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती’ सुरू केली. या ट्रस्टकडून दर वर्षाला 40 गुणवान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.




डॉ. नित्यानंदजींनी उत्तराखंडला नक्षलवाद्यांच्या तावडीत जाण्यापासूनही वाचविले. वेगळ्या उत्तराखंड राज्यासाठी सुरू असलेले आंदोलन परमोच्च बिंदूवर असताना ते नक्षलवाद्यांच्या हातात जाण्याचा धोका निर्माण झाला. त्या वेळी त्यांनी आंदोलनाला हिंसेपेक्षा राष्ट्रवादी वळण दिले आणि उत्तरांचलाची मागणी केली. प्रा. नित्यानंद यांना त्यांच्या ग्रामविकास कार्यासाठीदेखील ओळखले जाते. अल्मोडामधील पटिया, थेया, टिहरीमधील भिगून किंवा देहराडूनमधील माटी पोखरी अशा जवळपास 50 गावांना आदर्श गाव म्हणून ओळखले जावे, या स्वप्नासाठी ते कायम कार्यरत राहिले. यासाठी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सेवाकार्यांना जोडून घेतले. कोलकातामधील बडा बाजार कुमार पुस्तकालय समिती व बनारसमधीस भाऊदेवरस न्यास यांनी त्यांना त्यांच्या सेवाकार्यासाठी सन्मानित केले, तेव्हा हा पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कमही त्यांनी सेवाकार्याला अर्पण केली.




नित्यानंदजींनी इतिहास व भूगोलाच्या पुस्तकांचेही लेखन केले. हिमालयावरदेखील त्यांनी संशोधन केले. देहराडूनमध्ये सध्या ‘डॉ. नित्यानंद हिमालय शिक्षण आणि संशोधन केंद्र’ या नावाने विद्यापीठ उभारत आहे. डॉ. नित्यानंद यांनी देहराडूनमधील संघाच्या कार्यालयात 8 जानेवारी 2016 रोजी अंतिम श्वास घेतला. त्यांच्याबरोबर दीर्घ काळ काम करणारे वरिष्ठ प्रचारक व देहराडूनच्या विश्व संवाद केंद्राचे निदेशक विजयजी सांगतात, की नित्यानंदजी हे आधुनिक युगातील दधिची होते. समर्पित भावनेने काम करून त्यांनी उत्तराखंडमध्ये सेवाकार्यांचा मार्ग प्रशस्त केला.

1264 Views
अगली कहानी