सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

संकटात संघ कामास येतो

भालचंद्र जोशी | महाराष्ट्र

parivartan-img

कोरोना महामारीने समाजात पावलोपावली विविध समस्या निर्माण केल्या आहेत. कोविडमुळे मरण पावलेल्या अभागी जीवांचे अंत्यसंस्कार असोत की मृतांच्या मुलाबाळांच्या खाण्यापिण्याचा, संगोपनाचा प्रश्न असो. गंभीर अवस्थेतील आजारी रुग्णांना प्राणवायू पुरवण्याचा असो, कि रुग्णालया च्या बाहेर विकल मनाने वाट पाहत बसलेल्या नातेवाईकांच्या भोजनाचा प्रश्न असो, या प्रत्येक अडचणीच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तत्परतेने आणि समर्पण भावनेने समाजाच्या साहाय्याला धावून आले आहेत.




झारखंड राज्यात जमशेदपूर पासून १२६ कि. मी. दूर, रांचीच्या सर्वात मोठ्या रिम्स या सरकारी रुग्णालयात आपल्या कोरोना पीडित वडिलांना (नाव - सुबोध शर्मा ) दाखल करायला त्यांचा मुलगा 'आकाश ' आला होता . घरून येताना त्याने सातूचे पीठ आणि पाव आणला होता, पण हे पदार्थ संपून गेल्यावर काय खायचे हा प्रश्न उभा राहिला. आकाशने रा. स्व. संघाच्या. रांची महानगर झारखंडच्या हेल्पलाइनवर मदत मागितली. २२ एप्रिल २०२१ रोजी रांची येथे टाळेबंदी लागू झाली होती . दुपारी दोन नंतर एकही खाणावळ अथवा उपाहारगृह सुरु नसायचे. अशा काळात रुग्णांच्या नातेवाइकांना रात्री भोजन कसे मिळणार? ही अडचण रांची येथील संघाचे विभाग सेवा प्रमुख श्री कन्हैय्याजी यांच्या लक्षात आली त्यांनी आकाशबरोबरच इतर रुग्णांच्या नातेवाईकांसाठीही भोजनाची व्यवस्था केली .




सेवा विभागातर्फे रोज रात्री भोजनाची दीडशे ते दोनशे पाकिटे वाटण्यास सुरुवात झाली. जम्मू कश्मीरमध्ये राजौरी, किश्तवाड, डोरा आणि किस्तवाड येथेही सरकारी रुग्णालयाबाहेर भोजन पाकिटांचे वाटप सुरू करण्यात आले. असाच एक प्रसंग प्राणवायू पुरवण्याबद्दलचा. २७ एप्रिल २०२१ रोजी रात्री सेवा भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री पन्नालाल भन्साळी यांना श्री रहिती राय यांचा फोन आला. त्यांची बहिण महुआ, तिचे पती आणि त्या दोघांची छोटी मुलगी या तिघांना कोरोनाची लागण झाली होती, पण महुआ हिची स्थिती फारच गंभीर झाली होती. प्राणवायूची पातळी ६७ पर्यंत कमी झाली होती, तिला तातडीने प्राणवायू देण्याची गरज होती. त्याकाळात दिल्ली शहरात सर्वत्र प्राणवायूचा सर्वत्र प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. सेवा भारतीच्या कार्यकर्त्यांनी धावपळ करून २ तासांच्या आत कालकाजी येथे राहणाऱ्या महुआ यांच्या घरी प्राणवायू उपलब्ध करून दिला. या प्राणवायू मुळेच त्या रात्री महुआचे प्राण वाचले, आणि नंतर दवाखान्यात राहून १५ दिवसांनी आवश्यक ते सर्व उपचार घेऊन ठणठणीत बरी होऊन महुआ आणि तिची मुलगी स्वस्थ होऊन घरी परत आल्या.




कोरोना संकटकाळात जेंव्हा भाऊही भावाला मदत द्यायला कचरतो आहे, त्यावेळी संघाच्या स्वयंसेवकांनी दाखवलेला सेवाभाव अतुलनीय आहे . केरळमध्ये कोथमंगलम येथे रस्त्याच्या कडेला एक वृद्ध गृहस्थ एकाकी, असहाय तापाने फणफणलेल्या अवस्थेत खोकत पडला होता. (बहुधा त्याचा घरच्या लोकांनी त्याला तेथे आणून सोडले असावे ) त्यावेळी सेवा भारतीचे कार्यकर्ते पुथेम पुरक्कळ यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्या वृद्ध गृहस्थाला सेवाभारती च्या रुग्णवाहीकेतून तालुका रुग्णालयात नेले, तेथे कोरोना चाचणीत त्या वृद्धाला कोरोना झाल्याचे लक्षात आले. त्यांचेवर सर्व उपचार व्यवस्थित सुरु होईपर्यंत सेवा भारती चे कार्यकर्ते तेथे उपस्थित राहिले. रामगढ येथे बस स्थानकावर संतोष नावाचा मजूर जखमी अवस्थेत पडला होता .




रा. स्व. संघाच्या कार्यकर्तांनी त्याला रुग्णालयात तर नेलेच पण तो पूर्ण बरा होईपर्यंत त्याची काळजी घेतली . आकडेवारी सांगायची तर सेवा भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री श्री सुधीरजी यांच्या सांगण्यानुसार, देशभरात ३०३ रुग्णवाहिका, १२४२ सल्ला केंद्रे, ३७७० हेल्पलाइन्स आणि २९०४ लसीकरण केंद्रे, सेवा भारतीतर्फे चालवण्यात येत आहेत. या शिवाय २८७ शहरांमध्ये कोरोना विलगीकरण केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर काढा वितरण, प्लाझ्मा दान, आणि कोरोनाने मरण पावलेल्यांवर अंत्यसंस्कारही करण्यात येत आहेत. कोरोनाच्या नवीन लाटेचा परिणाम शहरांपेक्षा ग्रामीण भागात जास्त जाणवतो आहे. त्या संदर्भात संघ- स्वयंसेवकांच्या अनेक तुकड्या पी. पी. ई . किट सह खेडोपाडी जाऊन काम करीत आहेत. भोपाळ येथील जितेंद्र पटेल प्रवीणसिंह दिखित, हरीश शर्मा, शैलेंद्र, प्रसन्नजीत, इत्यादी प्रमुख कार्यकर्तांसह २४ स्वयंसेवक कोरोना रुग्णसेवेचे प्रशिक्षण घेउन पी.पी. ई . किट सह ग्रामीण भागात गेले आहेत, अशी माहिती भोपाळचे विभाग प्रचारक श्री श्रवणजी यांनी दिली आहे. हे सर्व कार्यकर्ते ग्रामीण भागात नागरिकांच्या कोरोना चाचण्या करीत आहेत. १५ दिवसांच्या या मोहीमेत १२ गावे ३० सेवावस्त्या आणि ८ कॉलोनीमधील ५ हजाराहून अधिक लोकांची तपासणी आणि कोरोना चाचणी करण्यात आली आहे .

669 Views
अगली कहानी