सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

ध्यास मातृभूमीचा

मध्यप्रदेश

parivartan-img

कधी कधी माणसावर दुःखाचे डोंगर कोसळतात काय करावे ते समजत नाही, भोपाळमधील कल्पना विश्वकर्मा यांची तशीच अवस्था झाली होती. त्या अरेरा कॉलनी या उच्चभ्रू, वस्तीत एका भाड्याच्या खोलीत राहत होत्या. एका पायात गॅंग्रीनचा प्रादुर्भाव झाल्याने त्या जवळजवळ अपंगच झाल्या होत्या. त्यात त्या जरोदर राहिल्या. हे कमी म्हणून की काय कोरोनाची साथ आली. एका मागुन एक अडचणी वाढत गेल्या. त्यांचे सासरे द्वारकाप्रसाद विश्वकर्मा यांना कोरोना झाला आणि त्यांचा जीवनमरणाचा लढा सुरु झाला. दुसरीकडे त्यांचे पती सोनू यांचा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय लॉकडाउन मुळे बंद पडला. गरोदरपणामुळे त्या स्वतः काही कामधंधा करून पैसे मिळवू शकत नव्हत्या, त्यांना स्वतः लाच दोन वेळा पोटभर जेवण मिळण्याची मारामार निर्माण झाली. त्यांची करूण कहाणी सेवा भारतीच्या भोपाळ महानगर महिला संयोजिका आभा दीदी यांच्या कानी पडली, आणि त्या देवदूतासारख्या कल्पना विश्वकर्मा यांच्या मदतीला धावून गेल्या।




सेवा भारतीच्या कार्यकर्त्यांनी कल्पनाचे सासरे द्वारका प्रसाद विश्वकर्मा यांच्या उपचारांसाठी आवश्यक ती सर्व आर्थिक आणि अन्य प्रकारची मदत केली। दुर्दैदाने द्वारकाप्रसाद यांचा मृत्यु झाला, तेंव्हा त्यांच्या अन्त्यसंस्कारांची सर्व व्यवस्थाही सेवाभारतीतर्फे करण्यात आली। याशिवाय लॉकडाउन संपेपर्यन्त सर्व कुटुंबासाठी, शीधा आणि कल्पना विश्वकर्मा या गरोदर असल्यामुळे, त्यांच्यासाठी विशेष, असा पोषक आहार पाठवण्यात आला। अशीच दुर्दैवी कहाणी ज्योति हिची देखील आहे. तिची आठ वर्षांची मुलगी मनीषा हिला कर्करोग झाला होता, आणि ती मृत्युशी झुंज घेत होती। ज्योति ही घरोघरी धुण - भांडी करत असे तर तिचे पती रिक्षाचालक होते. लॉकडाउनमूळे दोघांचाही रोजगार बंद झाला, त्यात पोटच्या मुलीला कर्करोग! ज्योती हिने इंदूर सेवा भारतीच्या हेल्पलाइनवर प्रांत संयोजिका सुनीता दीदी हिला आपली अडचण सांगितली त्यानंतर रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण लॉकडाउनच्या काळात या सर्व कुटुंबाची राशनसह सर्व प्रकारे काळजी घेतली . मणिकर्णिका या चित्रपटातील " में रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिये" हे गीत जणू काही संघ स्वयंसेवकांना डोळ्यापुढे ठेवूनच लिहिले आहे ! सिधी जिल्ह्याचे सेवा प्रमुख श्री आशीष जी यांची कहाणी अशीच प्रेरक आहे. कोरोना ग्रस्तांसाठी रात्रंदिवस मदत कार्य करत असतानाच आशीष यांना स्वतः लाच शेवटी कोरोनाची लागण झाली. त्यांना कुशाभाऊ ठाकरे स्मृती रुग्णांलयात भरती करण्यात आले त्यावेळी एका अत्यंत गंभीर स्थितीतील महिलेला काही तासांसाठी तरी प्राणवायूची गरज आहे, हे त्यांना एका परिचारिकेकडून कळले, तेव्हा स्वतः चा जीव धोक्यात घालून आशीष यांनी आपला सिलिंडर त्या रुग्णासाठी तीन तासांसाठी उपलब्ध करून दिला.




सुदैवाने आशीषजी आणि ती रुग्ण महिला हे दौघेही कोरोनातून पूर्णपणे बरे झाले . संघाचे मध्य क्षेत्र कार्यवाह श्री अशोक अग्रवाल यांची दिलेल्या माहितीनुसार संघातर्फे ५८९ मदतकेंद्रे चालवल्यात आली, १२३ विलगीकरण केंद्रे, आणि १७ करोना उपचार रुग्णालये चालवण्यात झाली. ६४९ स्थानी ४० हजार ६२४ भोजन पाकिटे वाटण्यात आली. या सर्व कार्यात ११ हजार ७७ स्वयंसेवक तहानभूक विसरून सहभागी झाले होते. रतलाम जिल्ह्यातील पंचेड या गावी शंभर टक्के लसीकरण करून संघाच्या स्वयंसेवकांनी एक इतिहासच घडवला. या गावात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ३० झाली. तेव्हा तेथील एका जुन्या शाखेतील तरुणांनी करोनाला हद्दपार करण्याचा निश्चय केला . सर्वप्रथम त्यांनी गावाच्या सर्व सीमा बंद केल्या, आणि गावाशी इतर कुणाचाही संपर्क येगार नाही, याची काळजी घेतली. यामुळे गावात कोरोनाचा संसर्ग वाढणे पूर्णपणे थांबले. त्यानंतर घरोघर जावून स्वयंसेवकांनी प्रत्येक व्यक्तीला लसिकरण केंद्रात नेवून लस लाववुन घेतली. करोनाची साथ यावेळी घनदाट जंगलांमध्येही पोहोचली होती. मध्यप्रदेशातील खांडवा हा वनवासी क्षेत्रातील जिल्हा, तेथील वनवासी बांधव अज्ञानामुळे करोनाची चाचणी करून घेण्यास त्याचप्रमाणे कोरोना झाला तरी रुग्णालयात भरती होण्यास तयार नव्हते. मृतांची संख्या झपाट्याने धाढत होती, यातून मार्ग काढण्यासाठी इंदूरमधील प्रसिद्ध गोकुळदास रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी ग्रामीण भागातील डॉक्टरांना उपचाराचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले आणी करोना उपचारसाठी काही उपयुक्त औषधेही पाठवली, यामुळे वनवासी बांधवाची त्यांच्या भागातच चाचणी करून त्यावर उपचार करणे शक्य झाले, यात गुडी, सिंगोत, बोरगाव, गुलाईमाल रोशनी इत्यादी वनवासी गावांमध्ये १४ बाह्य रुग्ण विभाग सातत्याने चालवण्यात आले, आणि हजारो वनवासी बांधवांचे प्रांत वाचवण्यात आले अशी माहिती खांडवा विभाग सेवा प्रमुख श्री अतुल शाह यांनी दिली आहे.

764 Views
अगली कहानी