सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

जेथे प्रत्येक श्वासामध्येही सेवाभाव आहे

महाराष्ट्र

parivartan-img

अंधाराची भीती वाटणे नविन नाही परन्तु एखाद्या व्यक्तिला उजेडाची भीती वाटते ह्यावर विश्वास बसणे तसे कठीणच. पण इथे असेच काहीसे घडत होते. खोलीमधील दिवा लावताच खोलीमधील ती महिला "बंद करा तो दिवा", "मला तो प्रकाश सहन होत नाही", "जाऊ द्या मला येथुन", "नाही रहावयाच मला इथे" असे जोरजोरात किंचाळु लागली. नवऱ्याच्या निधनानंतर ह्या वृद्ध महिलेची देखभाल करणारे कोणीच नव्हते. राहत्या घरातील वीजपुरवठा पैश्या अभावी बंद झाल्यानंतर नऊ वर्षे अंधारात राहिल्यामुळे रजनीदेवीला प्रकाशाची जणु भीतीच वाटु लागली होती. त्यावेळी त्यांना मदतीचा हात दिला तो विजया ह्यांच्या परिवाराने. नागपुरपासून ६० किलोमीटर अंतरावरील छोट्याश्या डोंगरमौथा गावातील ह्या सेवाश्रमात असाध्य रोगांनी ग्रस्त झालेल्या पीडितांची अगदी शेवटपर्यंत काळजी घेतली जाते. राष्ट्रीय सेवाभारतीशी संलग्न असलेल्या ह्या संस्थेची स्थापना स्वतःला संघाचा पाहुणा स्वयंसेवक म्हणविणारे डॉक्टर शशिकांत रामटेके यांनी फेब्रुवारी १९९७ मध्ये नागपुर येथे (आता डोंगरमौथा ) भाड्याच्या दोन खोल्यांमधे केली होती.




तब्येतीमध्ये काहीही सुधारणा होण्याची आशा नसलेल्या आणि नातेवाईकांनीच नव्हे तर डॉक्टरांनीही मनोरुग्ण म्हणुन घोषित केलेल्या गरिमाजींना (नाव बदललेले आहे) आशेचा किरण कुठेच दिसत नव्हता. मनावरील ताबा सुटल्यावर त्यांना पलंगाला बांधुन ठेवावे लागत असे. परिस्थिती अशी हाताबाहेर गेल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी नाइलाजास्तव त्यांना विजया हेल्थ व एजुकेशन सोसाइटीच्या ह्या अधिकृत आश्रमात दाखल केले. ह्या आश्रमात दाखल होण्यासाठी जातपातीचे अथवा धर्माचे कुठलेही बंधन पाळले जात नाही. ही तर एक अनोखी सेवायात्रा आहे ज्याचा आत्तापर्यंत तीन वर्षे वयाच्या बालकापासून ते ९८ वर्षे वयाच्या वृद्धांपर्यन्त ३०१ रुग्णांनी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लाभ घेतला आहे. अनाथ व शरीराने अशक्त अशा २२ वर्षीय मुकेशला सर्व परिचित व नातेवाईकांनी बेदखल केले होते. ह्या सेवाश्रमात जर थारा मिळाला नसता तर मुकेशचे संपूर्ण आयुष्य रस्त्यांवर भीक मागण्यातच गेले असते. मुकेशसारख्या कितीतरी असहाय्य व निराश्रित रुग्णांना आपल्या ह्या सेवाश्रमाने आधार व आश्रय दिल्यामुळे त्यांचे आयुष्य जगण्यायोग्य तरी झाले आहे. शशिकांतजी सांगतात सेवाश्रमाची कित्येक वर्षांची ही वाटचाल संघर्षपूर्ण होती. आश्रमाच्या सुरुवातीच्या काळात आश्रमासाठी लागणारे धनधान्य गोळा करताना आश्रमाच्या स्वयंसेवकांना कित्येकदा अपमान व तिरस्कारही सहन करावा लागला आहे. सरकार दरबारीही आम्हाला फारशी मदत मिळू शकली नाही कारण ह्या उपक्रमाकडे सर्वांनी आणखी एखादा वृद्धाश्रम ह्या दृष्टीनेच बघितले. परंतु कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छाशक्ती व कठोर परिश्रम ह्यांना अखेरीस यश आले आणि भाड्याच्या खोलीमधे सुरु झालेला हा सेवाश्रम आज १३ गुंठे जमिनीवर वीस सुविधायुक्त खोल्यांसहित कार्यरत आहे. ३० ते ३५ रुग्ण आज येथील सेवांचा लाभ घेत एक नवीन जीवन जगत आहेत.

शशिकांतजी म्हणतात विजया परिवार ह्या आपल्या सेवाश्रमात साधारण रोगी व असाध्य रोग जडलेले रुग्ण ह्या दोघांनाही प्रवेश दिला जातो. असाध्य रोग जडलेल्या रोग्यांचे भारतीयत्वाशी नाते न तुटता जुळलेलेच राहावे याची सेवाश्रमात विशेष काळजी घेतली जाते. रोग्यांच्या निधनानंतर त्यांचा अंतिम संस्कार सन्मानाने व आपुलकीने आपल्यातीलच एक समजुन केला जातो. शशिकांतजींच्या ह्या सेवायात्रेमध्ये प्रत्येक पावलावर कधी आई होऊन तर कधी परिचारिका बनुन रोगी जनांची सेवा करणाऱ्या श्रीमती निशिगंधा रामटेके आपल्या ह्या वाटचालीतील अनुभव वेगळ्याच प्रकारे वर्णन करतात. त्या म्हणतात आश्रमात येण्यापूर्वी रुग्ण कोणत्या परिस्थितीत होते हे आम्हाला पूर्णपणे ठाऊक नसते पण आश्रमात आल्यानंतर त्यांचे मलमूत्र स्वच्छ करण्यापासूनची सर्व काळजी आम्ही घेतो. रुग्णांची तपासणी व सेवा करत करत आश्रमातील कार्यकर्त्यांसोबत ह्या दांपत्याने एखाद्या दिव्याप्रमाणे तेवत राहुन रुग्णांच्या नीरस, शुष्क व दुःसह्य जीवनात माणुसकीचा ओलावा व ऊब निर्माण करण्यात आपल्या आयुष्यातील २२ वर्षे समर्पित केली आहेत. ह्या बावीस वर्षांमधे संघ परिवाराने सेवाश्रमाला वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे.

कोणाच्याही स्वाभिमानाला अथवा भावनांना धक्का पोहोचु नये म्हणुन वृत्तांतातील नावे बदलेली आहेत.

827 Views
अगली कहानी