सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

जन सेवा ही ईश्वर भक्ती

प्रदीप पाटिल | महाराष्ट्र

parivartan-img

दीड वर्षाची गीता व सहा महिन्याचा आयुष्य यांच्या शिरावरील आईचं कृपाछत्र केवळ चार महिन्यापूर्वीच हरवलेलं.या दोन चिमुकल्यांचे वडील रिक्षाचा व्यवसाय करून कसंबसं घर चालवत असतानाच कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडॉउन मुळे त्यांचा रिक्षाचा व्यवसायही बंद झालेला. त्यामुळे दोन वेळच्या जेवणासाठी लोहार कुटुंबियांना वेगवेगळ्या जागी सुरू असलेल्या अन्नछत्रातून मिळणाऱ्या कढी व भातावर कसाबसा उदरनिर्वाह करावा लागत होता. आईचे छत्र हरवलेल्या छोट्याशा आयुषच्या दुधाची गरज आजी जुलिया मिंज ही शेजाऱ्याकडून तांदूळ आणून त्याच्या पिठात पाणी व साखर एकत्र करून भागवत होती. लोहार कुटुंबियांची जगण्यासाठीची ही अगतिकता शिवाजीनगर येथील राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह श्री विजयजी यांना कळल्या नंतर, मलहोराकोचा, बाबानगर, चढरी,वर्धमान कंपाऊंड इतकेच नाही तर रांची शहरातील तीनशेहून अधिक गरजू मुलांच्या घरी जाऊन, राष्ट्रिय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये म्हणजे जवळपास दोन महिने घरोघर जाऊन दूध पोहोचवण्याची व्यवस्था केली.




नाशिक येथील एका कोविड रुग्णालयात एक फलक लावण्यात आला होता त्यावर लिहिले होते की, मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्य विधीसाठी राष्ट्रिय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा'.कोरोना कालावधीत मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंतिम संस्काराची अगतिकता व त्यासाठी संघ कार्यकर्त्यांनी सेवाभावाने केलेली व्यवस्था, हे एकरूप समाजाच्या असीम भावनेचं एक वेगळं प्रतीक होय. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांना आपण शेवटच्या क्षणी तरी आपल्या चार नातेवाइकांच्या खांद्यावरुन स्मशानभूमी पर्यंत जावे, हे त्यांचं अर्ध राहिलेले स्वप्न कधी वडील ,कधी भाऊ बनून संघाचे नाशिक जिल्हा कार्यवाह मंगेशजी व त्यांच्या सहकारी स्वयंसेवकांनी पूर्ण केलं. इतकंच नाही तर चितेवर असलेल्या त्या मृतांना शेवटचा मुखाग्नि देण्यासाठी संघ परिवारातील सोनाली दाबक, शुभांगी देसाई, दीपाली गडाख या भगिनींनी अंगावरती पीपीई घालून व स्वतः चा जीव धोक्यात घालून ही अंतिम जबाबदारी सांभाळली.




जेव्हा संकट मोठं असतं तेव्हा संघर्षही मोठाच करावा लागतो. कोरोनाच्या कालावधीत हजारो किलोमीटरची पदयात्रा करीत आपल्या घराकडे परतणाऱ्या लाखो पादचाऱ्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात जेंव्हा प्रशासनही हतबल झालं तेंव्हा सेवा भारती व संघ कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी मोठ्या निष्ठेने सांभाळली. देशभरामध्ये एकूण 1778 जागी 44 लाख मजुरांना अन्न पाणी औषधे या मूलभूत गोष्टींचे वितरण करण्यात आले. या सेवा कार्याबाबत माहिती देताना संघाचे अखिल भारतीय सहसेवा प्रमुख राजकुमार मटाले जी म्हणाले की, हा देश, हा समाज आमचा आहे ! या भावनेतून संकट जेवढे मोठे होते तेवढेच संघ स्वयंसेवकांनी स्वतःवर अधिक जबाबदाऱ्या घेऊन सेवाकार्य केले. कोरोना कालावधीत गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना रक्ताची कमी पडू नये म्हणून 5 जून 2020 पर्यंत 60,229 एवढ्या स्वयंसेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रक्तदान केले. केरळमधील कोविड रुग्णालयापासून ते हरियाणा पर्यंतच्या सेवा वस्त्यांमध्ये साफसफाई, सॅनी टायझर फवारणी यासारखी कामे स्वयंसेवकांनी मनापासून केली. मेरठ मधील अमरोहा येथे सुरू असलेली मेडिकल हेल्पलाइन असो, किंवा सेवा भारतीची देशभरात चोवीस तास सुरू असलेली हेल्पलाईन असो, यामुळे शेकडो पिडीत रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला. 




सुरत मध्ये फेरी मारून कपडे विकणाऱ्या मोहम्मद यांना जेव्हा स्वतःबरोबरच आपल्या तीन वर्षाचा मुलगा व गर्भवती असलेल्या पत्नीला दररोजच्या जेवणाची भ्रांत पडू लागली, तेव्हां मोहम्मद यांनी तेराशे चार किलोमीटर एवढा दूरचा प्रवास करून आपल्या मूळ गावी अमेठीला जाण्यासाठीचा रस्ता पकडला. परंतु जळगाव हायवेने पायी प्रवास करत असताना गर्भवती असलेल्या पत्नी इशरतला प्रवासाचा त्रास होऊन तिला अकालीच प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. तिची ही अवस्था पाहून या हायवेवर प्रवाशांना राशन वाटपाची सेवा करणारे संघाचे कार्यकर्ते रवी कासार यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने इशरतला तात्काळ नगरचे माजी संघचालक विकास गोळे यांच्या रुग्णालयात तात्काळ दाखल करून तिचे बाळंतपण सुखरूप होईल याची व्यवस्था केली. 


कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटात अशा निर्माण झालेल्या अनेक गंभीर प्रसंगात संघ स्वयंसेवकांनी धैर्याने तोंड दिले व सेवाकार्य चालू ठेवले .

पुढील सेवायात्रा पुढील सेवागाथे मध्ये नक्की वाचा - 

1066 Views
अगली कहानी