सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

चिरतरुण कर्मयोगी-किशाभाऊ पटवर्धन

महाराष्ट्र

parivartan-img

सरकारी नोकरी करणाऱ्या कुठल्याही शिक्षकाच्या सेवानिवृत्तीचा दिवस म्हणजे भरपूर आराम आणि वेळ घेऊन आलेला असतो. पण, काही व्यक्ती चिरतरुण असतात. त्यांना सेवानिवृत्ती नसते. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्यरत असतात. स्व. किशाभाऊ पटवर्धन हेदेखील असेच एक विरळ व्यक्तिमत्त्व होते. पुण्यातील एका सरकारी शाळेतून प्रिन्सिपल म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी आपल्यासाठी एक नवीन कार्यक्षेत्र निवडले. आपल्या आयुष्यातील दुसरी इनिंग मधे त्यांनी गरीब व वंचित हुशार विद्यार्थ्यांना, शिक्षित करण्यास व पुढे आणण्यासाठी स्वरूपवर्धिनी या संस्थेची स्थापना केली. आपल्या जीवनातील दहा वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेल्या किशाभाऊंनी स्वरूपवर्धिनी शाळेला व्यावसायिक शिक्षणाची जोड देऊन त्याला बहुआयामी केले.




किशाभाऊंचा जन्म २५ डिसेंबर १९२० रोजी पुण्यात झाला. त्यांच्यात उपजतच अष्टपैलू प्रतिभा होती. आदरणीय गोळवलकर गुरुजींच्या राष्ट्रकार्यात सहभागी होण्याच्या आवाहनाला साद देऊन कॉलेज शिक्षण अर्धवट सोडून ते संघप्रचारक बनले. दहा वर्षे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात काम केल्यानंतर त्यांनी एमएसस्सी व बीएड परीक्षा दिली व ते एका सरकारी विद्यालयात प्रिन्सिपल झाले. शिक्षक असूनसुद्धा आपल्यातील विज्ञानाच्या विद्यार्थ्याला त्यांनी कायम जिवंत ठेवले आणि म्हणूनच ते नवीन नविन प्रयोग कायम करीत असत. हुशार विद्यार्थ्यांना शोधून त्यांना समाजाप्रती संवेदनशील बनविण्यात अग्रेसर असलेल्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेशी यांचे नाते नोकरी करीत असतानादेखिल  कायम जोडलेले असायचे. तेथे काम करीत असताना त्यांच्या मनात विचार आला, की "योग्यता"  ही कोणा एका वर्गाची मक्तेदारी नाही, झोपडपट्टी आणि निर्धन परिवारातील हुशार मुले केवळ त्यांना योग्य मार्गदर्शन व आधार न मिळाल्यामुळे पुढे येऊ शकली नाहीत. फी भरता न आल्यामुळे त्यांच्यावर शिक्षण अर्धवट सोडण्याची नामुष्की येते. हा त्यांच्या प्रतिभेवर अन्याय आहे. याच विचाराने प्रेरित होऊन १३ मे १९७९ रोजी त्यांच्या स्वरूपवर्धिनी संस्थेचा जन्म झाला.

पुण्याच्या मंगळवार पेठेत रामकृष्ण थ्रेड वाइंडिंग इंडस्ट्रीज वर्कशॉपच्या शेडमध्ये त्यांची बारा मुलांची पहिली शाखा सुरू झाली. पुण्यात आज स्वरूपवर्धिनीच्या १६ शाखा आहेत. यात आठशेहून अधिक मुलामुलींना दंड अभ्यास, देशभक्ती गीते, याबरोबर गणित, विज्ञान व इंग्रजी शिकविले जाते. संस्थेत अन्य कामेही शिकविली जातात. १९८८ मध्ये संस्थेची स्वतःची इमारत झाल्यावर किशाभाऊंनी तेथे (दिवसभर काबाडकष्ट व मोलमजुरी करणाऱ्या कामगारांची मुलांसाठी) " पाकोळी " नावाची शिशू शाळा सुरू केली. तीन ते पाच वर्षांच्या मुलांना तेथे प्राथमिक शिक्षण दिले जाते. वाढत्या वयाबरोबर किशाभाऊंचा उत्साहही वाढत गेला आणि स्वरूपवर्धिनीत नवीन नविन अभ्यासक्रम आणले गेले. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी शिवणकाम, भरतकाम याबरोबर नर्सिंगचेपण व्यावसायिक शिक्षण सुरू केले. गेल्या दहा वर्षांत आजूबाजूच्या गावांतील तीन हजारांहून अधिक मुली आता नर्स म्हणून काम करीत आहेत. किशाभाऊंचा प्रवास येथेच संपला नाही, तर त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत कमी दरात कोचिंग क्लासेस सुरू केले. गेल्या सतरा वर्षांत दोनशेहून अधिक विद्यार्थी, अधिकारी बनून तयार झाले आहेत.




किशाभाऊंची संघटनक्षमता त्यांचे विरोधकसुद्धा मानतात. स्वरूपवर्धिनी संस्थेच्या इमारतीचा शिलान्यास सरसंघचालकांच्या हस्ते करवून घेणाऱ्या या स्वयंसेवकाने संघाच्या विरोधकांनासुद्धा या कार्यात सहभागी करून घेतले आहे. संघाच्या सेवा विभागाचे पालक अधिकारी श्री. सुहास रावजी हिरेमठ यांच्या कथनानुसार किशाभाऊ एक समर्पित व ध्येयनिष्ठ कार्यकर्ता होते, जे आपल्या आचरण आणि व्यवहाराने लोकांना लवकर आपलेसे करीत होते.

1631 Views
अगली कहानी