नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
श्रीमती वंदना पूणताम्बेकर | मध्यप्रदेश
नियतीतील एक.... फक्त ...एक धक्का.... माणसांच सर्वकाही नष्ट करू शकतो. नियतीनेही भोपाळ मध्ये असाच एक खेळ मांडला, आणि पैसा पैसा करून उभारलेल्या घरकुलांचे एका क्षणात भस्म झाल . 9 एप्रिल 2018 रोजी 12 वाजता तापत्या दुपारी, भोपाळच्या साकेत नगर ह्या पॉश कॉलोनी च्या शेजारच्या झोपडपट्टीत गैस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आगीचा गदारोळ झाला. जेव्हा येथे राहणाऱ्यां असहाय लोकांची छोटी-छोटीशी स्वप्ने राखेच्या ढिगात रुपांतरित होत होती त्याच वेळेस तरुणांचा एक गट देवदूता सारखा प्रकट झाला. आता ह्या असहाय लोकांच्या आणि निर्दयी नियतीच्या दरम्यान भिंतीसारखे उभे होते ते हे खाकी नेकर घातलेले गणवेशधारी स्वयंसेवक, ज्यांनी आपल्या धेर्याने आणि सेवेने ह्या वस्तीच्या लोकांवर नियतीच्या झालेल्या आघाताचा परिणाम कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. काही स्वयंसेवक झोपडपट्टीवासी यांच्या वस्तु आगीतून बाहेर काढण्यास मदत करीत होते, तर कोणी तंबू लावण्यात मग्न होते. मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळच्या साकेत नगराशेजारी 25 वर्षांपासून तिथे असलेल्या गरीब लोकांच्या वसाहती मध्ये लागलेल्या भीषण आगीत एकूण 31 झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या. प्रभावितांच्या मदतीसाठी प्रथम आलेल्या स्वयंसेवकांनी आगीच्या काही तासातच सर्व आवश्यक वस्तू, कपड़े आणि संध्याकाळच्या जेवण्याची व्यवस्था केली. भोपाळ विभाग बौद्धिक प्रमुख नितीन जी केकरे ह्यांच्या कथनाप्रमाणे स्वयंसेवकांनी काहीं तासातच प्रशासनिक यंत्रणे पासून मंदिर समिती पर्यंत सर्वांशी बोलून प्रभावित लोकांसाठी सर्व मदत गोळा केली.
25 वर्षापासून घरो-घरी मोलकाम करणारी अणि ह्या झोपडपट्टी मध्ये तरुणवया पासून राहणारी अणि आता म्हातारी झालेली शांताबाई, दुःखी चेह-याने अश्रू गाळित सांगित होती की मी कपाळावर हात देऊन नशिबाला श्राप देत होते, तेव्हां ह्या तरुणांनी मला धीर दिला, अणि दोन दिवस एखादा आपल्या माणसां सारख रात्रं-दिवस माझी प्रत्येक गरज भागविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. सगळ्यात आधी येथे पोहोंचणारे अश्विन चढ़ार, गौरव शुक्ला, कार्तिक वर्मा, आशुतोष नामदेव, अतुल विश्वकर्मा यांनी पहिल्या दिवसाचे जेवण हॉटेल, व दुसऱ्या दिवशी वस्ती शेजारील साकेत नगर सेक्टर 2 ए च्या 150 कुटूंबां कडून अन्न एकत्र करून वाटले. ह्या तरुण मुलांनी योग्य व्यवस्थे साठी मंदिर समितीच्या व् सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली. सेवाभारती महिला मंडळाच्या भगिनींनी परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी पुस्तके व जीवनावश्यक वस्तू एकत्र केल्या व अभ्यासासाठी मंदिरांच्या खोल्या उघडल्या.
आगीच्या 24 तासातच सेवाभारती मेडिकल व्हेन चे डॉक्टर दिनेश शर्मा आणि डॉ राम अवतार यादव ह्यांनी रहवाश्यांच्या वैधकीय तपासणीनंतर गरजे प्रमाणे औषधे पुरविली. आता शासनाने ह्या पीडित कुटुंबांना एक बहुमजली इमारतीत हलवले आहे. आता मदत करण्यासाठी बऱ्याच संस्था देखील सामिल झाल्या आहेत. सेवाभारती साकेत मंडळाच्या सर्व महिला पुरुषानीं स्वयंसेवकांच्या सहकार्याने व् समन्वयाने, गरज असलेल्या सर्व गोष्ठी योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची जवाबदारी घेतली आहे।
आपदा प्रबंधन (डिजास्टर रिलीफ) म्हणजे का्य असते, त्याच हे प्रात्यक्षिक उदाहरण भोपाळ च्या
तरुणांनी दाखवून दिले.